📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

पवार कुटुंबाच्या आधारवड कै. लक्ष्मीबाई नामदेव पवार यांचे निधन; गटेवाडीत शोककळा

On: June 21, 2026 7:00 PM
आम्हाला फॉलो करा:
कै. लक्ष्मीबाई नामदेव पवार यांच्या निधनानंतर गटेवाडी परिसरात शोककळा

गौरव प्रकाशन गटेवाडी, ता. पारनेर | प्रतिनिधी
गटेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक तथा पवार कुटुंबाच्या आधारवड कै. लक्ष्मीबाई नामदेव पवार यांचे शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांसह गटेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कै. लक्ष्मीबाई पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिक कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपला संसार उभा केला. साधी राहणी, उच्च विचार आणि माणुसकीची जपणूक ही त्यांच्या जीवनाची ओळख होती. त्यांनी आपल्या मुलगे व मुलींना समान संस्कार देत सचोटी, कष्ट, एकोप्याची भावना आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचे धडे दिले.

त्यांच्या संस्कारांचा प्रभाव आजही संपूर्ण पवार कुटुंबामध्ये दिसून येतो. त्या गटेवाडी येथील प्रसिद्ध व्यावसायिक दादाभाऊ नामदेव पवार यांच्या मातोश्री तसेच गावचे माजी सरपंच भाऊसाहेब नामदेव पवार यांच्या मातोश्री होत. त्यांच्या कन्यांनीही आपल्या संसारात कौटुंबिक मूल्ये आणि संस्कारांचा वारसा जपला आहे.

त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, मुली, जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावरील प्रेमळ मातृछत्र हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कै. लक्ष्मीबाई पवार यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी गटेवाडी (ता. पारनेर) येथे संपन्न होणार आहे.

त्यांच्या निधनाबद्दल ग्रामस्थ, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, “प्रामाणिक कष्ट आणि उत्तम संस्कार हीच त्यांची खरी संपत्ती होती,” अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत माहिती देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती

दारव्हा येथे विदर्भ मंडल यात्रेचे स्वागत करताना काँग्रेस पदाधिकारी व ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम

दारव्ह्यात विदर्भ मंडल यात्रेचे जल्लोषात स्वागत; ओबीसी जातीनिहाय जनगणनेच्या मागणीला काँग्रेसचा ठाम पाठिंबा

LPG सिलेंडरवर नवीन कर लागू होणार का? सरकारच्या प्रस्तावामुळे किंमत वाढण्याची शक्यता

LPG सिलेंडर महागणार? सरकार नव्या शुल्काच्या तयारीत असल्याची चर्चा; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

ग्रामीण वातावरणात आनंदाने नृत्य करणारे जोडपे – सोशल मीडियावर व्हायरल झालेला डान्स व्हिडिओ

ग्रामीण जोडप्याच्या साध्या डान्सने जिंकली लाखो मनं; सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा

छत्रपती संभाजीनगर येथे CJP बैठकीपूर्वी अभिजीत दिपके माध्यमांशी संवाद साधताना

CJP ची आज निर्णायक बैठक; अभिजीत दिपके म्हणाले – ‘राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण…’

₹2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर शुल्क लागू होणार? UPI Charges News Marathi 2026

UPI वर शुल्क लागू होणार? ₹2,000 पेक्षा जास्त ऑनलाइन पेमेंटवर चार्जचा प्रस्ताव; सरकारने दिले महत्त्वाचे संकेत