📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५

On: October 1, 2025 10:33 AM
आम्हाला फॉलो करा:
चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना जळगाव येथे राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार 2025 प्रदान
चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना जळगाव येथे राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार 2025 प्रदान

जळगाव : दिनांक २८ सप्टेंबर २०२५, रविवार रोजी जळगाव येथील अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस येथे सकाळी ११ वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रपूरचे ज्येष्ठ कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा सोहळा राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, प्रशासकीय व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सन्मानित करते. या पार्श्वभूमीवर, कवी एम. ए. रहीम बंदी यांच्या साहित्य क्षेत्रातील उपक्रमशील आणि बहुआयामी कार्याची दखल घेत, त्यांना यंदाचा साहित्यभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.

यापूर्वीही बंदी यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून, नुकताच दिनांक २७ जुलै २०२५ रोजी मुंबई (जोगेश्वरी पूर्व) येथे साप्ताहिक आम्ही मुंबईकरतर्फे आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक व साहित्यरत्न पुरस्कार २०२५ ने गौरविण्यात आले होते.

या कार्यक्रमात राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संदीपा वाघ व त्यांचे यजमान श्री. ज्ञानेश्वर वाघ यांच्या हस्ते कवी एम. ए. रहीम बंदी यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्रक प्रदान करून गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवर, साहित्यप्रेमी व चाहत्यांनी त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!