📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड

On: May 29, 2025 4:17 PM
आम्हाला फॉलो करा:
"येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड"
MG 1

“येवल्यात राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा: अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड”

KD

गौरव प्रकाशन येवला, (प्रतिनिधी) : येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदी डॉ. माहेश्वरी गावित, तर उद्घाटकपदी डॉ. कैलास दौंड यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ यांनी पत्रकाद्वारे दिली.

४ जून २०२५ रोजी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रभरातील निवडक साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार १ मे रोजी जाहीर करण्यात आले होते.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

अध्यक्षपदासाठी निवड झालेल्या डॉ. माहेश्वरी गावित या सध्या अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. त्या आदिवासी साहित्य, लोकसाहित्य व आदिवासी भाषेच्या अभ्यासक, समीक्षक असून २०१५ मध्ये नांदेड येथे झालेल्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांनी आदिवासी जीवनावर आधारित ‘महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य : एक शोध’, ‘आदिवासी साहित्य विचार’, ‘लोकसाहित्य : जीवनकला’ अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

उद्घाटकपदाची जबाबदारी घेणारे डॉ. कैलास दौंड हे पाथर्डी (अहिल्यानगर) येथील साहित्यिक असून त्यांच्या ६ कवितासंग्रह, ३ कादंबऱ्या, १ कथासंग्रह, १ ललित लेखसंग्रह आणि ४ बालसाहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या ‘गोधडी’ या कथेला महाराष्ट्राच्या इ. ८ वीच्या पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले असून ‘कापूसकाळ’ ही कादंबरी मुंबई विद्यापीठ व रुईया महाविद्यालयाच्या बी.ए. अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या दोन्ही मान्यवरांच्या निवडीचे साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार सोहळा साहित्यिक वाचकांसाठी एक मोठा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

दारव्हा तालुक्यातील कुपटी नदीच्या पुरात वाहून गेलेली अर्टिगा कार; बेपत्ता आई आणि दोन्ही मुलींचे मृतदेह

दारव्हा दुर्घटना : बेपत्ता आईसह दोन्ही मुलींचे मृतदेह अखेर सापडले; संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यावर शोककळा

कॅन्सरशी झुंज देणारे वडील आपल्या लहान मुलाला जीवनाचा शेवटचा भावनिक संदेश देताना

वडिलांचा अखेरचा संदेश ऐकून लाखो लोक भावूक! ‘आईची काळजी घे, कधीही हार मानू नको’ म्हणत मुलाला दिला जीवनाचा धडा

लाडकी बहीण योजनेची अंतिम लाभार्थी यादी, e-KYC पूर्ण झाल्यानंतर 1.66 कोटी महिलांना ₹1500 हप्ता

लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा! e-KYC पूर्ण; 1.66 कोटी महिलांच्या खात्यात ₹1500 जमा होण्याचा मार्ग मोकळा

सैराट फेम अभिनेता अरबाज शेख आणि त्यांचे वडील अस्लम शेख यांच्या निधनासंदर्भातील बातमी

‘सैराट’ फेम अरबाज शेख यांच्यावर दुःखाचा डोंगर; वडील अस्लम शेख यांचे ब्रेन हॅमरेजनंतर निधन

CJP आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश देताना देवेंद्र फडणवीस – महाराष्ट्रातील मोठा निर्णय

CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! फडणवीसांचा मोठा निर्णय; आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश