माय बाप परेशान. येकटच पोट्ट त्याईले वाटे कां मोठं झाल्यावर आधार भेटन जराकसा. पन कायचा आधार नसता डोक्साले ताप. देवाले नवस करुन झाले. उपास तापास झाले. पन कायबी फरक नाई.
आखीर बापानं पोट्ट्याचा नाद सोडला. पन मन काई मानेना….
येक दिस बापाच्या मनात ईचार आला. अन त्यानं पोट्याले धडा शिकवाचा ठरुवलं. बापानं रमेश ले
लई दूर नेला. येक उची भिंत व्हती . रमेश मने बापु
येथ कायले आनल. बाप गुपचुप व्हता. त्यान रमेश ले भितीवर (दिवाल) चढासाटी सांगतलं पोट्ट पयले नाई मने. आखीर कसा बसा चढला त्याच्या मना मंदी भिती भरली आता बाप काय सांगते. येवढ मस्तेल पोट्ट पन चेहरा मोहरा पार उतरुन गेलता. भितीवर उभं राहून बापाकडं पाय. बापाचा जीव खालवर व्हत व्हता. पन त्यानं पोट्याले धडा शिकवाचा ठरुवलं व्हतं. बाप खालत उभा पोट्ट वरतं
वीस फुटांवर . बाप म्हने पोरा मार उडी खालत. पोट्ट
घाबरलं , खालत पायत जाय अन मांग सरकत जाय.
बाप जोरान वरडला मार उडी.. आखीर रमेश न डोये
घट बन केले अन मारली उडी बाप खालत उभा व्हता. खालत रेतीचा ढीग व्हता. रमेश न डोये हयुहयु
उघडले. बाप म्हने डोये बन नाई. डोये उघडे ठिवून
स्वताच्या बळावर काम कराले शिक. स्वताच्या पायावर उभा रायले शिक तवा तुले जगात दाल आट्याचा भाव पता चालन. अन माय बापाची किंमत समजन.
बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.