येक पोट्ट रमेश नावाचं लाडात वाढलं. माय बाप साधारन कुटुंबातलं व्हतं. बाप खाजगी नोकरीत व्हता. पोरग चांगलं व्हावं, चांगलं शिकावं परतेक
माय बापाले वाटते. अन आपल्या पोट्यासाटी वाट्टेल
थे मेहनत करतेत. तसं रमेश च्या माय बापानं केलंत. पन पोट्ट्याले काई कदर नाई. मस्त आपल्याच मस्तीत राये. शान शौकीन ,दंगा मस्ती , पैसा उडवे,
माय बाप परेशान. येकटच पोट्ट त्याईले वाटे कां मोठं झाल्यावर आधार भेटन जराकसा. पन कायचा आधार नसता डोक्साले ताप. देवाले नवस करुन झाले. उपास तापास झाले. पन कायबी फरक नाई.
आखीर बापानं पोट्ट्याचा नाद सोडला. पन मन काई मानेना….
येक दिस बापाच्या मनात ईचार आला. अन त्यानं पोट्याले धडा शिकवाचा ठरुवलं. बापानं रमेश ले
लई दूर नेला. येक उची भिंत व्हती . रमेश मने बापु
येथ कायले आनल. बाप गुपचुप व्हता. त्यान रमेश ले भितीवर (दिवाल) चढासाटी सांगतलं पोट्ट पयले नाई मने. आखीर कसा बसा चढला त्याच्या मना मंदी भिती भरली आता बाप काय सांगते. येवढ मस्तेल पोट्ट पन चेहरा मोहरा पार उतरुन गेलता. भितीवर उभं राहून बापाकडं पाय. बापाचा जीव खालवर व्हत व्हता. पन त्यानं पोट्याले धडा शिकवाचा ठरुवलं व्हतं. बाप खालत उभा पोट्ट वरतं
वीस फुटांवर . बाप म्हने पोरा मार उडी खालत. पोट्ट
घाबरलं , खालत पायत जाय अन मांग सरकत जाय.
बाप जोरान वरडला मार उडी.. आखीर रमेश न डोये
घट बन केले अन मारली उडी बाप खालत उभा व्हता. खालत रेतीचा ढीग व्हता. रमेश न डोये हयुहयु
उघडले. बाप म्हने डोये बन नाई. डोये उघडे ठिवून
स्वताच्या बळावर काम कराले शिक. स्वताच्या पायावर उभा रायले शिक तवा तुले जगात दाल आट्याचा भाव पता चालन. अन माय बापाची किंमत समजन.
– हर्षा वाघमारे
नागपूर
९९२३८१९७५२