दुचाकी वाहनांपेक्षा इतर वाहने जास्त प्रमाणात रस्त्यावर धावत असताना दुचाकी वाहनांचे जास्त अपघात होण्याची कारणे खालील प्रमाणे असावीत.
* कमी वयातील तरूण मुलांना दुचाकी परवाना दिला जातो,तर काहीकडे परवाना सुध्दा नसतो अशी मुले काॅलेजला जाताना व पिकनिकसाठी दुचाकी वाहनांचा शर्यतीची मजा म्हणून एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघाताला सामोरे जातात.शक्यतो 20 वर्ष वयातील व्यक्तिलाच परवाना देण्यात यावा व ओव्हरटेक करणार्याला कडक शिक्षा असावी.
* दुचाकी वाहनावर बसण्यास दोन व्यक्तिंना परवानगी असताना फक्त एकाच व्यक्तिला हेल्मेटची सक्ती आहे,अपघाताच्या वेळी दुसर्याच्या डोक्यात हेल्मेट नसल्याने त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यासाठी वाहतूक प्राधिकरणाने(आर.टि.ओ) दोघांसाठीही हेल्मेट सक्तीची करावी.
* पावसाळा सुरू झाला की रस्ता ओला होतो अशावेळी अचानक ब्रेक लावल्यास वाहन तात्काल रस्त्यावर आडवे होते,याचे कारण म्हणजे वर्षभर रस्त्यावर वाहनांचे पडणारे वाॅईल व ग्रीस त्यामुळे रस्ता गुळगुळीत होतो.यासाठी पहिल्या पावसात शक्यतो दुचाकी वाहन रस्त्यावर काढू नये.”वेगाची मजा मृत्यूची सजा”काही चालक वेगाची मर्यादा पाळत नाहीत त्यामुळे त्यांना अपघाताला सामोरे जावे लागते.महाद्रुतगती मार्गावर(हायवेवर) काही दुचाकी चालक समोरील वाहनामध्ये जास्त अंतर ठेवत नाहीत,त्यामुळे काय होते पुढे असलेले मोठे वाहन रस्त्यावरील छोटे खड्डे व दगडावरून सहज जाऊ शकते परंतु मागील दुचाकी वाहन त्या खड्ड्यात आपटून रस्त्यावर आडवे होऊ शकते,अशावेळी मागे वाहन नसेल तर नशिब चांगलेच समजावे.यासाठी दुचाकी चालकांनी दोन वाहनांमधील अंतर जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करावा,जेणेकरून कमीत कमी अपघात होतील.
* काही वेळेस जड वाहनांना(बस,ट्रक)पाठीमागील दुचाकी वाहन दिसत नाही,अशावेळी डावीकडे किंवा उजवीकडे वळताना मागील दुचाकी वाहन अचानक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात होतात,यासाठी मागील दुचाकी चालकांनी हाॅर्न वाजवून पुढे आल्यास अपघात टळतील.
याव्यतिरीक्त अपघाताची अनेक कारणे आहेत, पण वरील कारणे अतिमहत्वाची आहेत. ही महत्वाची कारणे दुचाकी चालकांनी सदैव लक्षात ठेवली तर अनेक अपघात टळतील.हा लेख वाचून काही वाचक म्हणतील की, ‘आम्हाला हे सर्व माहीत आहे, आम्हाला सर्व कळतं आहे’.त्यासाठी मला सांगावेसे वाटते की,”अहो!मलापण माहीत आहे की तुम्हाला पण माहीत आहे आणि कळतं. पण वळत नाही,त्याच काय..? म्हणून सांगावस वाटतं की “मनावरील ब्रेक सर्वात उत्तम ब्रेक.”
- – सुरेश शिर्के