IFSC कोड बँकेत नेमका का आणि कश्यासाठी असतो..!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
IFSC कोड बँकेत नेमका का आणि कश्यासाठी असतो..!
IFSC कोड आपल्या बँकेच्या पासबुकवर छापलेला आपल्याला दिसतो परंतु तो का असतो हे तुम्हाला माहित आहे का ? नसेल तर चला मग जाणुन घेऊ.
इंटरनेट आणि संघनक ह्या मुळे बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आले.  त्यात रक्कम इतर खात्यात वर्ग करण्या साठी म्हणा अथवा एका बँकेतून दुसऱ्या बॅंक खात्यात  जर पाठवायची असेल तर पूर्वी ज्या पद्धतीचा वापर होत होता. त्या वेळ खाऊ, तर होत्याच त्याच बरोबर किचकट ही होत्या. त्या पूर्णतः बदल झाला असून आता चुटकी सरशी फँड इकडून तिकडं वर्ग होऊ शकतो.
आणि त्याच साठी हा IFSC कोड सर्वात महत्वाची भूमिका  बजावत असतो. तो NEFT  मध्ये काही तासात तर RTGS  व IMPS  मध्ये काही मिनिटात फँड ट्रान्सफर होतो. त्याच साठी दोन्ही ही बॅंका ना हा IFSC कोडRBI ने दिलेला असतो. तो प्रत्येक बँकेला वेगळा असतो. (शाखेलाही) ,त्या मुळे व्यवहार एकदम सुरक्षित व जलद तर होतोच परंतु कुठलाही घोटाळा  होण्याची शक्यता खूप कमी असते. आयएफएससी कोड हा ११ कॅरेक्टर असणारा अल्फान्यूमेरिक (अक्षरे व अंक) कोड नंबर असतो. हा नंबर बँकेच्या प्रत्येक शाखेसाठी युनिक कोड नंबर असतो. यातील पहिल्या ४ कॅरेक्टरनुसार कोणती बँक आहे समजते तर ५ वे कॅरेक्टर ० (शून्य) असते व उर्वरित ६ कॅरेक्टर बँकेच्या सबंधित शाखेचा कोड नंबर असतो व न्यूमेरिक (अंकात) असतो.
चुकीच्या खात्यात रक्कम जमा होत नाहीत व अल्पावधीतच रक्कम पाठवणाऱ्याच्या खात्यात जमा होते. आता सर्व सरकारी कार्यालये, मोठ्या कंपन्या यांना वरील पद्धतीने रक्कम ट्रान्स्फर करणे बंधनकारक आहे यामुळे होणारे आर्थिक व्यवहार बँका मार्फत पारदर्शीपणे होऊन काळ्या पैशाच्या वाढीस आळा बसण्यास मदत होऊ शकते व रोखविरहीत (कॅशलेस ) व्यवहार वाढीस लागतील.

Leave a comment