टिकेल का लोकशाही..?
Contents
hide
शायनिंग इंडिया म्हणणारा पक्ष
खरोखर वॉशिंग मशीन झालाय
भ्रष्ट नेत्यांना स्वच्छ करणारा जणू
स्व इच्छा ने स्वछता दूत झालाय
चांगुलपणाच्या कितीत्या
बोगस मोघम ,बाष्पळ बाता
जरा जपून बर ह्या वेळी
सरकार जाईल बरबटलेल्यानां धुता धुता
काँग्रेस नको म्हणून
तुम्हाला मत दिली
तुम्ही इतके पुरोगामी निघाले
तुम्ही भाजप ची काँग्रेस केली…..
जो नडणार जो भिडणार
त्याचा पक्ष फोडून टाकला
लक्षात ठेवा! हा सर्वात घातक पायंडा
लोकशाहीला मारक तुम्ही पाडला…
कोणताच पक्ष जण हिताला
हल्ली बांधील नाही…
अस जर होत राहील तर
टिकेल का हो लोकशाही….
टिकेल का लोकशाही…..
– अशोक पवार
गटेवाडी ता. पारनेर नगर
8367117148