जा गा पंढरीशी
Contents
hide
चला चला पंढरीशी
गाऊ विठ्ठल विठ्ठल
चंद्रभागे न्हावू सुखे
टाकू वाळवंटी पाल
भीमेतीरी भक्तीरस
वैष्णवांची होय दाटी
वारकरी आसुसले
विठ्ठलाचे भेटीसाठी
विठ्ठल विठ्ठल नाद
टाळ मृदंग काढती
एकतारी चिपळ्याही
सारे विठ्ठल गर्जती
सान थोर भेद नाही
स्पृश्यास्पृश्य नाही भाव
पाया लागे एकमेका
मुखी विठ्ठलाचे नाव
नामदेव पायरीशी
धन्य झाले माझे पाय
समचरण पाहता
भासे विठ्ठलची माय
आता नाही उठाठेव
आता नाही दुजा देव
भाव पंढरीशी माझा
एक विठ्ठलची देव
–आबासाहेब कडू
(१६-७-२४)