गाव कुठे हरवलं माझं?
गाव कुठे हरवलं माझं?
गावात एक वटवृक्षाचे बुलंद झाड होते.त्याला चहूबाजूंनी समांतर करून घेणारा एक कट्टा होता.जणू तो म्हणजे गावकऱ्यांसाठी मैत्रीचा कट्टा होता.गावातील पांढऱ्या टोपीची व केसांची म्हातारी माणसे गावची शोभा होती.दिवसभर घडलेल्या घडामोडी ते चर्चा करत कट्ट्यावर बसायचे आणि आपली मते व अनुभवे मांडायचे.यांत शंकर आप्पा त्या सगळ्याचे प्रमुख होते . त्यांचा अनुभव भला मोठा होता. काय करावे ? काय करू नये? यावर त्यांचे बारकाईने निरीक्षण होते. त्यांची पत्नी प्रभावती बाई त्यांना प्रेमाने आम्ही सगळेच मोठी आई म्हणत असत. पोरी बायकांना उठता बसता अनुभवाचे ज्ञानामृत ज्ञानामृत देत असत. शेतकरी असल्यामुळे रानमेवा मात्र पोट भरून खायला मिळायचा. त्यात पेरू, बोर, मोसंबी, हरभरा, पालेभाज्या याचा समावेश असत.आप्पा दररोज येताना आपल्याबरोबर काही ना काही आपल्या सोबत घेऊन यायचे आणि तो रानमेवा आपल्या नातवंडांना आणि...









