Monday, October 27

Tag: Article

बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 
Article

बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 

गोरबंजारा अकादमी : बंजारा भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी ऐतिहासिक ठेवा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून बंजारा साहित्य, संस्कृती व कला ही भारतीय विविधतेला समृद्ध करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बंजारा लोकसाहित्य टिकून आहे. बंजारा भाषिकांची संख्याही राज्यात मोठयाप्रमाणात आहे. राज्यात सिंधी, ऊर्दू,  गुजराती अकादमी स्थापन केल्या गेली, परंतु बहुसंख्येने असलेल्या व समृद्ध लोकसाहित्य व संस्कृती असणाऱ्या बंजारा भाषिकांसाठी अकादमी नसल्याची वेदना प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांनी पुसद येथील एका बैठकीत बोलून दाखवली होती. त्यासाठी साहित्य संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्याचे त्याचवेळी ठरविण्यात आले.  बंजारा साहित्य संस्कृती व कलेसाठी एक शाश्वत मंच असावे. भारतीय विविधतेत इतर भाषिकासह सुसंवाद साधत बं...
Malavarchya Ranveli : माळावरच्या रानवेली
Article

Malavarchya Ranveli : माळावरच्या रानवेली

माळावरच्या रानवेली...तो प्रचंड वटवृक्ष कसा उन्मळून पडला म्हणे त्याला बीलगलेला सायलीचा वेल कुणीतरी खुडलायाप्रमाणे वरून खंबीर दिसणारी, पुरुषाच्या पाठीशी प्रत्येक संकटात साथ देणारी एक वेलरुपी स्री असते. गावाकडच्या या रानवेली अगदी चिवट होऊन आपल्या फाटक्या संसाराला सांधण्याचे काम मनापासून करत असतात. कितीही एकर शेती असू दे पण ती यांच्या नावावर कधीच नसते. यांच्या नावावर असतात त्या शेतीचे कष्ट. शहरातल्या मातीत या वेली कधीच प्रफुल्लित राहत नाही. त्यांना हवी असते गावाकडच्या शिवाराची आपली माती. यांच्या आयुष्यात निवांतपणा नसला तरी वखवख ही नसते. पहाटेपासून रुंजी घालणाऱ्या या जणू ग्रामीण ओव्याचं म्हणाव्या लागतील. आयुष्यभर कष्टच वाट्याला आलेले आणि रोजचे उन्हातले काम.फोटोजेनिक असा यांचा चेहरा कधीच नसतो.आयुष्यातील दुःखाचे काळे डाग यांच्या चेहऱ्यावर जागा मिळवतात, पण फेस क्रिम कशी असते ही यांना ठाऊक ...
 तीर्थक्षेत्र पंचधारा श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार
Article

 तीर्थक्षेत्र पंचधारा श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार

-महाशिवरात्री विशेष- तीर्थक्षेत्र पंचधारा  श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार     शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.  शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडल...
धामंत्री येथील प्राचीन शिवमंदिर
Article

धामंत्री येथील प्राचीन शिवमंदिर

धामंत्री येथील प्राचीन शिवमंदिर    तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून  याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.  येथे दरवर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य असा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.      नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे  प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे. नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे. सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे (दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे. मंदिर...
अजिनोमोटो : आजारांचे दुसरे नाव आहे.!
Article

अजिनोमोटो : आजारांचे दुसरे नाव आहे.!

अजिनोमोटो: आजारांचे दुसरे नाव आहे.आजकाल अनेकांना चायनीज फूड आवडते. चाउमीन, मोमोजपासून ते मंचुरियन आणि फ्राइड राईसपर्यंत हे पदार्थ लोकांच्या ताटात नक्कीच पाहायला मिळतील. इतकेच नाही तर अनेकांना या गोष्टी खायला मिळाल्याशिवाय तृप्त होत नाही. दोन मिनिटांची चव तुम्हाला मृत्यूकडे ढकलू शकते. चायनीज फूडमध्ये असलेल्या अजिनोमोटोमुळे जेवण केवळ चवदार बनत नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. चाऊ में, फ्राईड राइस, मंचुरियन, मोमोज, पिझ्झा, बर्गर, स्प्रिंग रोल इत्यादी पदार्थांमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.बहुतेक चायनीज फूडमध्ये अशी वस्तू (अजिनोमोटो) टाकली जाते जी आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नसते. याचे रोज सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. बहुतेक चायनीज पदार्थांमध्ये अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते.अजिनोमोटोला मोनोसोडियम गॅल्युमेट (MSG) देखील म्हणतात आणि ते एक प्रकारचे पां...
सेवालाल : एक क्रांतीकारी संत 
Article

सेवालाल : एक क्रांतीकारी संत 

सेवालाल : एक क्रांतीकारी संत देश म्हणजे देशातील माणसं.मग देशात विविध जाती आहेत. जमाती आहेत. येथे अनेक वंश आहेत, येथे अनेक वर्ग आहेत. येथील विविध जाती विविध धर्मात वाटल्या गेलेल्या आहेत. एकाच धर्मात अनेक जाती जमाती आहेत. धर्म एकच पण जातीची भली मोठी उंच उंच उतरंड आहे. पुन्हा त्यात उपजाती.नारा देताना हम सब एक है. पण बोलणारे नेते, तथाकथीत समाजसुधारक जात पाहून, सोयरे धायरे पाहून, गणगोत पाहूनच व्यवहार करतात.काम पडलं की जातपात धर्म संगळ विसरून आपण एक आसल्याचं नाटक करतात. काम संपलं की गरज सरो वैद्य मरो. आसं पूर्वीपासून चालू आहे. कदाचीत पुढेही चालू राहील. आता तर आपण एकाच धर्माचे आहोत.हा आमचा धर्म आहे म्हणणारे आम्ही सर्व स्पष्टपणे जाती वाटून घेतल्या आहेत.जातीत जन्मलेल्या महापुरुषाला जातीच्या वर्तूळातच बंदी बनवत आहोत. हा आमचा.तो तूमचा.असं चालू आहे. अखील मानवजातीच्या कल्यानासाठी देह झिजविलेल्या सा...
विज्ञानवादी-संत सेवालाल महाराज
Article

विज्ञानवादी-संत सेवालाल महाराज

विज्ञानवादी-संत सेवालाल महाराज15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती. संत सेवालाल महाराज यांचे विज्ञानवादी दुष्टिकोन काय होता ते.आपण या लेखातुन पाहुया!संत सेवालाल महाराज जसे अहिंसावादी ,मानवतावादी होते. तसेच ते विज्ञानवादी सुद्धा होते. संत सेवालाल महाराज हे अठराव्या शतकातील अलौकिक व्यक्तिमत्व होते. ते जरी निरीक्षर असले तरी त्यांचे विज्ञानवादी विचार उच्च कोटीचे होते. त्यांचे व्यक्तिमत्व चिंतनशील होते .ते आपल्या बुद्धीच्या भरोशावर तर्क लावत असत. आणि गोरबंजारा समाजाच्या प्रगती करता ते समाजात असे विज्ञानरुपी विचार ते पेरत असत.....* तम सोता तमार जिवणेंम दिवो लगा सको छो! * कोई केनी भजो मत, कोई केनी पूजो मत. * कोई केती कमी छेणीं, सोतार ओळख सोता कर लिजो. * भजनेम पूजनेम वेळ घाले पेक्षा करणीं करेर शिको. * मारे सिकवाडी ध्यान दिजो, * जाणंजो... छांणजो.. पचचं ...माणंजो।।भावार्थ: संत...
अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्ड
Article

अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्ड

अनाथांचा नाथ-महनीय शंकरबाबा पापळकर व पद्मश्री अवार्डअनाथांचा बाप होणे सोपे काम नाही.सामान्य मुलांना जेथे सांभाळणे कठीण काम तेथे बेवारस सापडलेल्या अनाथ,मूक बधीर ,दिव्यांग,गतिमंद मुलांना सांभाळण्याचे काम शंकरबाबा अविरत करीत आहे.बाबा कोणत्याही पुरस्काराचे भुकेले नसले तरी बाबांच्या वझ्झर मॉडेलची योग्य ती दखल भारत सरकारने घेऊन त्यांना सामाजिक क्षेत्रातला 'पद्मश्री' सन्मान घोषित केला त्यामुळे बाबांच्या चाहत्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे.तसाच तो मलाही झाला आहे म्हणून बाबांचे मनापासून अभिनंदन.वझ्झर येथील शंकरबाबांची व त्यांच्या मुलांची दिनचर्या बघितली तरी नकळत तोंडात बोट जाते.त्या दिनचर्येची आपण फक्त कल्पनाच करु शकतो.अगदी संगणकीय प्रणालीसारखे तेथे काम चालत असते.अर्थात त्याचे सर्वच श्रेय बाबांना जाते.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदावझ्झरच्या आश्रमातील बाबांच्या ह...
नायलॉन मांजाचा ठरतोय फास.!
Article

नायलॉन मांजाचा ठरतोय फास.!

नायलॉन मांजाचा ठरतोय फास.!निर्बंधाकडे दुर्लक्ष करून मांजा विकणे अयोग्य'चढा ओढीत चढवीत होते..बाई मी पतंग उडवीत होते..'आई मी पतंग उडवीत होते. ही लावणी ऐकताना आपण मंत्रमुक्त होतो मात्र हाच मंत्रमुक्तपणा मुक्या पक्षांच्या प्राण्यांच्या तसेच मनुष्याच्या गळ्याचा फास होतो,याचा विचार कोणीच करताना दिसत नाही प्रत्यक्षात पतंग उडविण्याचा आनंद साध्या मांज्याने घ्यावा असे असतानाही सर्व विभागांच्या नाकावर टिच्चून चिनी नायलॉन मांजाची खुलेआम विक्री होत आहे. यातूनच पक्षी तसेच वाहन चालक जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत.नायलॉनच्या मांजामुळे गळा कापल्याने दर वर्षी लोक गंभीर जखमी होतात; तर शेकडो पक्ष्यांचा मृत्यू होतो आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) नायलॉन मांजावर चार वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशांमध्ये पुन्हा एकदा नायलॉन मांजांवरील बंदी कायम केली आहे. मात्र, स...
प्लास्टिकच्या बाटल्यांवर लाईन्स का असतात ?
Article

प्लास्टिकच्या बाटल्यांवर लाईन्स का असतात ?

प्लास्टिकच्या बाटल्यांवर लाईन्स का असतात ?शाळा, महाविद्यालय, कार्यालय अथवा कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी आपल्याला प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीची गरज भासते. कधीकधी घरातून पाण्याची बाटली विसरल्यानंतर आपल्याला बाहेरून पाण्याची बाटली कधी ना कधीतरी घ्यावीच लागते. कोणत्याही कंपनीची पाण्याची मोठी बाटली बघितल्या नंतर आपल्याला त्यावर मध्यभागी काही आडव्या लाईन्स दिसतात.पाण्याच्या बाटल्या सहसा प्लेन का नसतात? त्यावर लाईन्स अथवा कोणते ना कोणते तरी डिझाईन्स दिसून येतेच. पण मग असं का? वास्तविक आपण कोणतीही प्लेन वस्तू हातात पकडली की ती पटकन घसरून पडते. त्यामुळे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीवर पकड मजबूत करण्यासाठी या लाईन्स असतात. आपल्या हाताची पकड या लाईन्समुळे बाटलीवर अगदी घट्ट होते आणि बाटली सरकून पडत नाही. अर्थात लाईन्सच असायला हवे असेही नाही. कोणतेही डिझाईन्स असले तरीही पकड मजूबत होण्यास मदत मिळ...