📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

‘मार्शल’

On: October 7, 2025 12:29 PM
आम्हाला फॉलो करा:
गणेश रा. लांडगे यांची ‘मार्शल’ कविता – संविधान आणि जागृतीवर आधारित मराठी कविता
गणेश रा. लांडगे यांची ‘मार्शल’ कविता – संविधान आणि जागृतीवर आधारित मराठी कविता

मार्शल.!
एकमेकांची उणीदुणी काढत वेळ घालवण्यापेक्षा
आपण आपले काम पूढे रेटत राहू
बुध्दगयेच्या बोधिवृक्षाखाली
सारेच एकत्र भेटत राहू ……….
मार्शल ……
गल्लीबोळातून धोक्याचे सायरन
सर्रास आदळत आहेत कर्णपटलावर
आता आपण अलर्ट झालो पाहीजे
आपल्या छावण्यांमध्येही
रेड अलर्ट घोषित केला पाहीजे
शत्रु हल्ल्याची तयारी करत आहे
आपल्या छावण्या उध्वस्त करण्यासाठी
रणगाड्यात धर्माची बारूद भरत आहे ……….
मार्शल ……
कुठली वेळ कशी येईल सांगता येत नाही
रात्र वै-याची नसून
दिवसही वै-याचा आहे आपल्यासाठी
आरपारचे युध्द लढणे गरजेचे आहे
संविधानाच्या संवर्धनासाठी
आता आपण आपल्याच दिशेने
बंदुकीच्या फैरी झाडण्यात अर्थ नाही
शत्रुसैनिक सिमापार करत असतांना
आपण एकमेकांचे कपडे फाडण्यात अर्थ नाही ………
मार्शल …….
वेळ अजूनही गेली नाही
सुर्य अस्तास जायचा आहे अजून
निरंजनेच्या निर्मळ पाण्याने
सारेच जाऊ भिजून
तुम्ही तिकडून या….आम्ही इकडून येऊ
श्रावस्तीच्या जेतवनात
एकमेकांची गळाभेट घेऊ ………
गणेश रा.लांडगे

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now