📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

मी आंबेडकरी, RSS च्या विजयादशमीला जाणार नाही–कमलताई गवईंचे स्पष्ट स्पष्टीकरण

On: September 28, 2025 11:38 PM
आम्हाला फॉलो करा:
कमलताई गवई यांनी RSS विजयादशमी सोहळ्याला नकार देत दिलेलं स्पष्टीकरण – अमरावती बातमी
कमलताई गवई यांनी RSS विजयादशमी सोहळ्याला नकार देत दिलेलं स्पष्टीकरण – अमरावती बातमी

अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्यास आपण मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची बातमी ही धांदात खोटी असून आपण निमंत्रण स्वीकारलेलेच नाही, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी स्पष्ट केले आहे. कमलताई गवई यांनी समाजमाध्यमावर स्वहस्ताक्षरी पत्र प्रसारित करत आपली भूमिका स्पष्ट केली. “मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामाणिक आहे. मला विश्वासात न घेता वा लेखी संमती न घेता अशा बातम्या प्रसारित करणे हे RSS चे षड्यंत्र आहे,” असे त्यांनी पत्रात नमूद केले.

पत्रातील ठळक मुद्दे

  • आरएसएसच्या अमरावतीतील विजयादशमी सोहळ्यास मी जाणार नाही.
  • ही बातमी पूर्णतः खोटी असून अपप्रचार आहे.
  • दादासाहेब गवई चॅरिटी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझे घराणे आंबेडकरी विचाराशी निष्ठावान आहे.
  • आमच्यासाठी विजयादशमीपेक्षा धम्मचक्र प्रवर्तन दिन अधिक महत्त्वाचा आहे.
  • महाराष्ट्रासह देशातील जनतेने या अफवेला बळी पडू नये.
  • धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्वांना गवई परिवारातर्फे शुभेच्छा.

वादाची पार्श्वभूमी

५ ऑक्टोबरला अमरावतीतील श्रीमती नरसम्मा हिरेय्या महाविद्यालयाच्या प्रांगणावर संघाचा विजयादशमी सोहळा होत आहे. या कार्यक्रमात कमलताई गवई मुख्य अतिथी म्हणून येणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली होती. मात्र आता त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर चर्चांना वेगळे वळण लागले आहे.कमलताई गवई या राज्यपाल दिवंगत रासू गवई यांच्या पत्नी आहेत. रासू गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी चे अध्यक्ष होते. त्यांच्या योगदानामुळे दीक्षाभूमी उभारणीस गती मिळाली. त्यांचे चिरंजीव डॉ. राजेंद्र गवई हे देखील या समितीचे सदस्य आहेत.

—————————————–

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

—————————————–

मी आंबेडकरी, ‘आरएसएस’च्या विजयादशमी सोहळ्याला उपस्थित ..

—————————————–

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

कार आणि बाईक विमा क्लेमवर कडक तपासणी आणि बनावट विमा फसवणुकीविरोधातील कारवाई

कार-बाईक मालकांनो सावधान! बनावट विमा क्लेमवर आता कडक नजर; इन्शुरन्स कंपन्यांचा मोठा निर्णय.!

दूध भेसळखोरांवर मोक्का कारवाईच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना

दूध-खाद्यपदार्थांत भेसळ करणाऱ्यांना मोठा इशारा! मोक्का कारवाईच्या सूचनेने भेसळखोरांचे धाबे दणाणले.!

कर्जतच्या कोंदिवडे गावात छत्रीचा माईक घेऊन रस्त्यांची पाहणी करणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनी

छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या ‘रिपोर्टर’; कर्जतच्या रस्त्यांची अशी केली पोलखोल.!

पनवेल एसटी आगारात रील बनवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले एसटी कर्मचारी

प्रसिद्धीच्या नादात नोकरी धोक्यात! ST आगारात रील बनवणाऱ्या तिघांवर निलंबनाची कारवाई.!

गौरव प्रकाशन न्यूजच्या प्रतिनिधी सभेत दारव्हा तालुका प्रतिनिधी खुबराम चव्हाण आणि दारव्हा शहर प्रतिनिधी शशिकांत रोडगे यांची नियुक्ती करताना पदाधिकारी.

गौरव प्रकाशन न्यूजच्या प्रतिनिधी सभेत मोठ्या नियुक्त्या; खुबराम चव्हाण, शशिकांत रोडगे यांची निवड

कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत माहिती देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्त्वाची माहिती