📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

गजघाटे यांची अध्यक्षपदी नियुक्तीच नाही; प्रसिद्धी दिशाभूल करणारी, ससाई यांचा दावा.!

On: June 29, 2026 9:22 PM
आम्हाला फॉलो करा:
विलास गजघाटे यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत ससाई यांनी केलेला दावा

नागपूर : न्यासाच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. डॉ. राजेंद्र गवई हे विलास गजघाटे यांच्या संगनमताने न्यासाचे व्यवस्थापन बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा गंभीर आरोप ससाई यांनी केला आहे.

ससाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, विलास गजघाटे यांची न्यासाचे अध्यक्ष म्हणून झालेली प्रसिद्धी पूर्णपणे चुकीची, वस्तुस्थितीविरुद्ध आणि जनतेची दिशाभूल करणारी आहे. गजघाटे यांची न्यासाच्या अध्यक्षपदी कोणतीही अधिकृत नियुक्ती झालेली नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

त्यामुळे अध्यक्षपदाबाबत प्रसारित होत असलेल्या बातम्या आणि दावे यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच न्यासाच्या व्यवस्थापनावर बेकायदेशीररीत्या नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याने संबंधित बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणामुळे न्यासाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काळात यासंदर्भात कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा