शेळीच्या दुधापासून आरोग्यवर्धक पनीर
शेळीच्या दुधापासून आरोग्यवर्धक पनीर
शेळीच्या दुधामध्ये असलेल्या काही घटकांमुळे प्रक्रिया करण्यामध्ये अडचणी येतात या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत वरुड (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी या दुधापासून पनीर तयार केले आहे. शेळीच्या दुधामध्ये असलेल्या औषधी, पोषणमूल्य, जैविक, रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पूरक गुणधर्मामुळे लोकांमध्ये मागणी वाढत आहे, अनेक दुर्धर आजारावरही शेळीचे दूध फायदेशीर ठरते. मात्र शेळीच्या दुधामध्ये असलेल्या काही घटकांमुळे प्रक्रिया करण्यामध्ये अडचणी येतात. वरुड (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक आणि डॉ. प्रवीण सावळे यांनी या संदर्भात संशोधन केले आहे. डॉ. प्रशांत वासनिक आणि प्रवीण सावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ...



