Friday, March 6

Article

दिवाळी येता आठवतो मोती साबण.!
Article

दिवाळी येता आठवतो मोती साबण.!

मोती साबण..!   सत्तरच्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने मोती साबणाची निर्मिती केली. हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. चौकोनी वड्यांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती आकाराने मोठा आणि गोल होता. हा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता. गुलाब, चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवाती पासून शाही थाट दाखवला. त्याची २५ रु किंमत त्या काळाच्या तुलनेत अधिक होती.   या साबणाने सतत स्वत:ला उच्च आवडी निवडीशी, दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवलं. ऐंशीच्याा दशकातील मोतीच्या छापील जाहिरातीत समुद्रकिनारी भल्यामोठ्या शिंपल्यात विराजमान मोती साबण कित्येकांना आठवत असेल. एकूण हा साबण बऱ्यापैकी लोकप्रिय होता. मात्र १९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा अशा मंगल, उत्सवी, पवित्र संकल्पनेशी जोड...
नोकरी आणि कुटुंबाची जडणघडण
Article

नोकरी आणि कुटुंबाची जडणघडण

नोकरी आणि कुटुंबाची जडणघडणसध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. आज वाढलेली भस्मासूर महागाई पती-पत्नी दोघांनाही संसार सुखाचा करण्यासाठी नोकरी करण्यास प्रवृत्त करते. मानवी गरजा वाढल्या आहेत. जीवन सुखी समाधानी असावे या आशेने नोकरी करणे आज काळाची गरज आहे. नोकरी करणारा पुरुष घर सोडून जाताना त्याच्या जबाबदाऱ्या बऱ्याच अंशी घर सोडल्यानंतर संपतात पण, एका स्त्रीला घरात असताना व घरात नसताना दोन्ही ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या अगदी सावधगिरीने पूर्ण कराव्या लागतात.घरात वडीलधारी मंडळी सासू-सासरे असले तर त्यांच्या गरजा काय आहेत?  त्या  पूर्ण केल्याशिवाय, स्वयंपाक केल्याशिवाय तिला घर सोडता येत नाही. त्यावेळी तिच्या संयमाची फार मोठी परीक्षा सुरू असते. तिने कितीही मोठा पगार जरी घरात दिला तरी त्या पगाराबरोबर, तिची त्यागी वृत्ती तिला द्यावी लागते. तिला प्रत्येकाच्या गरजांसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तरच कुटुंब आ...
आरोग्यम धनसंपदा..
Article

आरोग्यम धनसंपदा..

आरोग्यम धनसंपदा..रोजच्या सवयीनुसार साडेपाच वाजता रनींगला निघाले आणि रोजचा रस्ता भयावह दिसला...  रस्त्यावर पडलेले फटाक्यांचे बॉक्सेस , प्लॅस्टिक पिशव्या ,  जळालेले फटाके सगळं पाहुन सफाई कामगार डोळ्यासमोर आले..  आपण चार दिवस सुट्टी घेउन दिवाळी साजरी करणार आणि ते आज आपण केलेली घाण साफ करणार... त्यांच्या सुट्टीचं काय ??त्यांच्या आरोग्याचं काय ??....गणपती , दिवाळी हे सण आपण साजरे करतो आणि त्याचा त्रास प्राणी , पक्षी म्हणजेच पर्यायाने निसर्गाला होतो..प्राणी घाबरून लपुन बसतात .. फटाक्यातुन पडणारं केमिकल्स प्राणी , पक्ष्यांच्या पोटातही जाऊ शकतं.. हजारो रुपयांचा चुराडा आणि एकीकडे अनेक लोक उपाशी किती विरोधाभास..  खरं तर आपण सण साजरे करण्यामागची कारणेच कधी जाणुन घेत नाही.. लक्ष्मी पूजन म्हणजेच धनाची पूजा म्हणजेच आरोग्याची पूजा.. कुटुंब नातेवाईक मित्र परिवार यांनी एकत्र येउन गप्पा ,,शेअरिंग केअरिं...
जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे.!
Article

जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे.!

जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे.!उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे आहे. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. अशात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्यायले पाहिजे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्या सोबतच पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.* नियमित पाणी पिण्याचे फायदे ◆ आपण अनेक तास कामाच्या गडबडीत पाणी न पिता राहतो. उन्हाळ्यात अनेकांना प्रचंड घाम येतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवू शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. प्रत्येकाने सकाळी उठल्यावर विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात पाणी प्यावे, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. ◆ सकाळी उठून सर्वप्रथम पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. तसेच पोटातील आम्ल शांत होण्यास मदत होते आणि स्टोन बनत नाही. ◆ सकाळी उठल्या बरोबर कमीत कमी दोन ग्लास ...
आई-वडील..!
Article

आई-वडील..!

आई-वडील..!मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला...अगं... छान लापशी बनव,तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..! आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली,"बघुया मला दाखवा." इतक्यात,मुलगा पटकन बोलला ,"बाबा तिला कुठे Result दाखवताय?तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!"भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली.मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले,"हो रे...! ते पण खरच आहे."तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुदृढ व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती अशिक्षित होती ना...तुला सकाळी सात वाजता शाळेत जावं लागायचं म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची. अशिक्षित होती ना...तु रात्री अभ्यास करता क...
अपेंडीक्स म्हणजे काय ?
Article

अपेंडीक्स म्हणजे काय ?

अपेंडीक्स म्हणजे काय ?अपेंडीक्स हा शब्द टॉन्सिल प्रमाणेच आपल्या परिचयाचा झालेला असतो आणि ऑपरेशन करून काढून संदर्भात तो येतो, त्यामुळे वरील प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. अपेंडीक्स हा पचनसंस्थेचा एक भाग आहे. मोठ्या आतड्याचा बारीक शेपटी सारखा वा करंगळी प्रमाणे दिसणारा हा भाग मोठ्या आतड्याशी लहान आतडे जिथे जुळते त्याजवळ असतो. तसे पाहता मानवामध्ये हा अवयव निरुपयोगीच. काही तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करण्यास याचा उपयोग होतो. जिवाणूंना अटकाव करण्याच्या याच्या कार्यामुळे यास पोटातील टॉन्सिल असेही म्हणतात. गायी-म्हशी सारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांमध्ये अपेंडीक्स बरेच मोठे असते व सेल्यूलोज पचन त्यात होते.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!अपेंडीक्सच्या आतील पोकळीत अन्नकण अडकल्याने, पोटातील जंतांमुळे (बंद झाल्यास) त्यात जंतुसंसर्ग होऊन अपेंडीक्सला सूज येते. त्यास अपे...
Article

जगातील सर्वात मोठे आणि जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन.!

जगातील सर्वात मोठे आणि जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन .!   रेल्वेचे जाळे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. जगातील जास्तीत जास्त देशांच्या आतील राज्य आणि शहरांच्या संपर्कासाठी ट्रेन हा सर्वात चांगला पर्याय मानतात. जगभरात अनेक रेल्वे स्टेशन असे आहेत ज्यांची एक वेगळी ओळख आहे. भारतातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्टेशनवर आहे. तर देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन हावडा जंक्शन आहे. इथे २६ प्लॅटफॉर्म आहेत.   जगातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असणारं रेल्वे स्टेशन अमेरिकेतील एका शहरात आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्टेशनवर सर्वात जास्त प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजेच हे स्टेशन त्याच्या दोन गुणांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेत असलेले हे स्टेशन १९०३ ते १९१३ या काळात बांधले गेले. या रेल्वे स्टेशनचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे.   ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर...
द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

द्वितीय महायुद्ध  आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर          जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पडले आहे. राजकारणाच्या स्वार्थी वृत्तीच्या फायद्यासाठी जगावर फार मोठे अरिष्ट लादल्या जात आहे. तिसरे महायुद्ध लढले जाईल का असा प्रश्न जगातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विस्फोटकांनी मानवाचा शाश्वत विकासाला उध्वस्त करण्याचे कुटील डाव जगामध्ये निर्माण होत आहेत. अहंकारी रानटी प्रवृत्ती अनेक नेत्यांच्या अंगात संचारली आहे .युद्ध व त्यांची किती गंभीर परिणाम असतात त्याची प्रचिती ज्यांनी द्वितीय महायुद्ध पाहिले त्यांना नक्कीच आले आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेल्या भूमिकेचा परिणाम जागतिक परीप्रेक्षात पडलेला दिसतो. अनेक नेत्यांना त्यांच्या विचारापर्यंत पोचता आले नाही.       द्वितीय महायुद्धातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयातून त्यांच्या भारतीय स्वात...
डॉक्टर तुम्ही सुध्दा ?
Article

डॉक्टर तुम्ही सुध्दा ?

डॉक्टर तुम्ही सुध्दा ?      अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक जण माझे मित्र आहेत.. Highly qualified म्हणावं तर फक्त डीग्रीने पण विचाराने ?.. मी लैगिंकतेवर जितकी बोलते लिहीते तितकीच अध्यात्मावर लिहीते बोलते..  दोन्हीत नक्कीच आनंद आहे पण अध्यात्मातील आनंद हा शाश्वत आहे.. जिथे दुख अजिबात नाही आणि त्यासाठी संसार सोडायची गरज नाही..  मग काय सोडायचय तर वाईट विचार .. चांगलं राहुन उत्तम संसार करुन आपल्याला नेमुन दिलेलं काम करत आपण भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर नुकसान नाही उलट आनंदच आहे.. अध्यात्माने आपण आतुन शांत होतो.. समाधानी, आनंदी राहायला हरीनाम खूपच उपयोगी आहे...        काल मी माझ्या डॉक्टर मित्राला भेटले.. जवळपास तासभर आम्ही सोबत होतो.. आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत त्यामुळे काही कॉमन विषय निघतात.. अनेक विषयांवर चर्चा होते .. कधी मला त्यांच्याकडून काही मिळतं , कधी ते माझ्याकडून क...
पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!
Article

पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!

पोसलेल्या कुत्र्यांचा आचरटपणा..!   "मला पडलेला प्रश्न , जे लोक स्वतःला सुशिक्षित समजतात कुत्रे वागवतात आणि सकाळी फिरायला निघतात आणि कोणाच्या घरासमोर , कोणाच्या दुकानासमोर ते कुत्र घाण करते, है योग्य आहे का , जर कुत्र वागवायची आवड आहे तर ते कुत्र्याला घाण सुद्धा स्वतःच्या घरातच करायला शिकवा, माझा हा विचार चुकीचा की बरोबर......"   समाजात संवेदनाशील लोक अजुनही आहेत. स्वतः बद्दलच्या इतकीच काळजी त्यांना समाजघटकाबद्दल असते. त्यांचे निरीक्षण अतिषय सूक्ष्म असते. समाजविघातक काही दिसले की काळजीपोटी ते उव्देगाने व्यक्त होत असतात. व्यक्त होण्याची भाषा वरदर्शनी मवाळ वाटत असली तरी एखाद्या किळस येणाऱ्या कृतीचा प्रचंड संताप आल्यावर ही ते संयमीत व्यक्त होत असतात. वरील पोस्ट कुणबी समाज बांधव, श्री. रविंद्र फाटे यांची आहे. त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. माहितीतल्या व्यक्तिंना ते चांगले ठाऊक आहेत...