Wednesday, May 6

Article

नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार
Article

नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार

नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार मानवाकडे सर्वात मोठा अवगुणाचा घटक म्हणजे इर्षा होय. हा मानवतेला लागलेला कलंक आहे. ईर्षेपोटी माणसाने माणसाचे फार मोठे नुकसान केले आहे. एकदा का माणूस ईर्षेपोटी लागला की तो सर्वनाशच करतो. त्याला कुठलेही भान राहत नाही. अशा इतिहासात अनेक घटना ईर्षेपोटी घडल्या आहेत. मानवानेच मानवाचे नुकसान केले आहे. इर्षा म्हणजे आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची ओढ होय. इर्षा म्हणजे कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख होय. ह्याचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनुभव येत असतो. ही इर्षा प्रत्येक ठिकाणी असते. ती कुटुंबात, समाजात, जाती-पातित, धर्मा-धर्मात व देशात-देशात सुद्धा असते आणि ह्या इर्षे पोटी मानवजातीचे फार मोठे नुकसान झाल्याचे इतिहासावरून आपल्याला बघायला मिळते. त्यातील एक मोठे उदाहरण म्हणजे विश्वख्यातीचे नालंदा विश्व विद्यापीठ आगीत भस्मसात झाले हे होय....
Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील
Article

Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील

Dr. Sujay Patil : शेतकरी आत्महत्या विरोधी अभियानाचे प्रणेते डॉ.सुजय पाटील                रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे मानवी आयुष्यातील सेवाधर्माला एक उदात्त,अत्युच्च अस्थान प्राप्त करून एक पवित्र रहस्यमयी ब्रिदवाक्य आहे.त्याला अनुसरून आजही अनेक उच्चशिक्षित सेवाव्रती जीवनातील मानवतावादी तत्वज्ञानाचा अंगीकार करून वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत.            रूग्णांना व्याधीमुक्त आणि त्यांच्यासोबत परिवारातील सदस्यांनाही नव्या जीवनाचा उपहार प्राप्त करून देणे हे समाजातील काही डॉक्टरांचे प्रभावी मानवसेवी कार्य आजही सुरू आहे.याच तत्वप्रणालीने विधायक आणि विनम्र सेवाभावी वृत्तीची कसं धरून आपण अत्यंत जटील अशा मानसिक आजार निवारणाच्या निदान आणि उपचार क्षेत्रात एक सामाजिक आणि आध्यात्मिक सेवक म्हणून सक्रिय आहात. आयुष्यात प्राप्त या मौलिक उपलब्धींबध्दल आपणास अभिमानंदनासह सन्मानित करण्यात येत आहे. हे ...
भेट : एका देव माणसाची
Article

भेट : एका देव माणसाची

भेट : एका देव माणसाचीगोष्ट एका प्रवासातली.4-5 दिवसांपूर्वीची.वर्ध्याहून पुढे10 मैलांवर गाडी अचानक बंद पडली. भर दुपारी,रखरखत्या ऊन्हात.दुरुस्तीच्या प्रयासात 1तास गेला.नाही जमले.मग नागपूरहून दुसरी गाडी बोलावली.यात 3 तास गेले.कसे? .... बाजूला एक शेत होतं.गेटवर वकिलाची पाटी.आत चौकीदार असावा.पाणी मागावं म्हणून आत गेलो.बनियन-पैजामा घातलेला एक गृहस्थ भेटला.त्याला विनवणी केली.बोलताना लक्षात आलं,तो मालकच होता.साधा-सरळ.मीही शेतकरीच.त्यामुळे बोलका झाला तो.त्यानं आपल्या शानदार कुटीत नेलं.झुल्यावर बसवलं.दरम्यान माझी मिसेस वर्षा व मुलगाही आला.थंडगार पाणी मिळालं.जीव तृप्त झाले!हे कुटुंबच इथं शेती- मातीत राहणारं..राबणारं.त्यानं आपली जीवनयात्रा सांगितली.दरम्यान बाईनं चहा आणला.तीही सुस्वभावी.म्हणाली,घरच्याच गायीच्या दुधाचा.तो बोलत राहिला.मन मोकळं करत राहिला.मग शेतातीलच पपई खायला दिली.वाटलं-आपण कोण, कुठल...
ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्ञानाचा तेजस्वी सूर्य ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर ---------------------------------------- भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपल्या नेत्रदिपक कार्यकर्तुत्वामुळे ज्या विद्वानाचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेले व संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचे स्थान अग्रस्थानी आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल रोजी संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आपल्या प्रखर वाणी व धारदार लेखणीतून ज्यांनी बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळावा, प्रत्येकाला त्याचे मूलभूत अधिकार मिळावे, यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्ची घातले त्या ज्ञान सूर्याचा आज जन्मदिवस.भारतीय संविधानाची निर्मिती करून या देशातील लोकांच्या जीवनात असलेल्या अंधाराला प्रकाशाकडे नेण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. ज्या महान व्यक्तीने आयुष्यभर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष...
मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Article

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवता रुजविणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरमाणूस जन्माला येतो तेव्हा तो एक पवित्र जीव असतो. त्या पवित्र जीवावर लहान वयात सर्वच जाती धर्माचे प्रेम करतात. जेव्हा सर्व धर्माचे जातीचे त्या पवित्र लहान जीवाचे लाड पुरवतात तेव्हा त्या पवित्र जीवाला हे संपूर्ण विश्व किती चांगले आहे आणि किती चांगले लोकं आहेत हे त्याला वाटू लागतं. परंतु तो जसा जसा मोठा होतो तस तसे त्यावर समाजाचे संस्कार होत असतात. त्याला लहानपणीचा अनुभव व मोठे होण्याचा अनुभव हा वेगळा जाणवत असतो. अशाच ह्या माणसाच्या जीवन चक्रातून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्मा पासूनच जातीय व्यवस्थेचे चटके सोसावे लागले. वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यावे लागले. काय वाटले असेल त्या कोमल जीवाला. एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय. परंतु शिकवण ही झाली होती की सर्व लेकरं देवा समान. सर्व लेकरं देवा घ...
स्त्री शिक्षणाचे प्रणेते – महात्मा फुले
Article

स्त्री शिक्षणाचे प्रणेते – महात्मा फुले

  स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा फुले _________________________ अंधश्रद्धेला कट्टर विरोध करणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ,संस्कारपीठ होते. त्यांनी भारतीय समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा समूह नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते नेहमी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून आपले कार्य करत होतेमहाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात महात्मा फुलेंची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. स्त्री शिक्षणाचे मूर्तमेढ रोवणारा आद्य क्रांतिकारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा 1848 साली पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात काढली. ते उत्कृष्ट मराठी लेखक, विचारवंत व समाज सुधारक ह...
बुड्याची मज्या
Article

बुड्याची मज्या

बुड्याची मज्या बोला आबा...... हप्ताभर दिसले नाही बॉ ...... कुठं गायब झाले होते बावा....का लपले होते बुडीच्या धाकानं.....! बुडीचा धाक......!अजुनई थरर भेते मतलं बुडी.....तुमच्या सारखं हाय काय..... बिनकामाचा लाळ....! मंग गेले कुठं होते थे त सांगा......! म्हंजे तुले काई माईतच नाई काय....? काय लेका बबन्या.....कोन्या घोरात अस्त तू.....!साऱ्या जमान्याले माइत हाय.....पुरा हप्ता गाजोला म्हतल बाबु...! बाप्पा आबा ! अस कुठं गेले होते बावा...? काय लेका ..... टीवी बिवी पायत अस्त का नाई....! आबा आता सांगता का जाऊ मी....! म्हंजे आता तुले पुरी हिस्टरी सांगाच लागते........ अरे बाबु कुकु लावन होत आमच्या नाताच.....! बापा ! आता कोणता नातू रायला हो लग्नाचा तुमचा....? आमच्या अंतू च कुकू लावन होत.....! अंतू म्हंजे तुमच्या पोराचं पोरग का पोरीच पोरग....! अरे बावा आमच्या मुकेस अंन निता च मोठं पोरग...! आ ssss...काय ग...
बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 
Article

बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 

गोरबंजारा अकादमी : बंजारा भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी ऐतिहासिक ठेवा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून बंजारा साहित्य, संस्कृती व कला ही भारतीय विविधतेला समृद्ध करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बंजारा लोकसाहित्य टिकून आहे. बंजारा भाषिकांची संख्याही राज्यात मोठयाप्रमाणात आहे. राज्यात सिंधी, ऊर्दू,  गुजराती अकादमी स्थापन केल्या गेली, परंतु बहुसंख्येने असलेल्या व समृद्ध लोकसाहित्य व संस्कृती असणाऱ्या बंजारा भाषिकांसाठी अकादमी नसल्याची वेदना प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांनी पुसद येथील एका बैठकीत बोलून दाखवली होती. त्यासाठी साहित्य संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्याचे त्याचवेळी ठरविण्यात आले.  बंजारा साहित्य संस्कृती व कलेसाठी एक शाश्वत मंच असावे. भारतीय विविधतेत इतर भाषिकासह सुसंवाद साधत बं...
Malavarchya Ranveli : माळावरच्या रानवेली
Article

Malavarchya Ranveli : माळावरच्या रानवेली

माळावरच्या रानवेली...तो प्रचंड वटवृक्ष कसा उन्मळून पडला म्हणे त्याला बीलगलेला सायलीचा वेल कुणीतरी खुडलायाप्रमाणे वरून खंबीर दिसणारी, पुरुषाच्या पाठीशी प्रत्येक संकटात साथ देणारी एक वेलरुपी स्री असते. गावाकडच्या या रानवेली अगदी चिवट होऊन आपल्या फाटक्या संसाराला सांधण्याचे काम मनापासून करत असतात. कितीही एकर शेती असू दे पण ती यांच्या नावावर कधीच नसते. यांच्या नावावर असतात त्या शेतीचे कष्ट. शहरातल्या मातीत या वेली कधीच प्रफुल्लित राहत नाही. त्यांना हवी असते गावाकडच्या शिवाराची आपली माती. यांच्या आयुष्यात निवांतपणा नसला तरी वखवख ही नसते. पहाटेपासून रुंजी घालणाऱ्या या जणू ग्रामीण ओव्याचं म्हणाव्या लागतील. आयुष्यभर कष्टच वाट्याला आलेले आणि रोजचे उन्हातले काम.फोटोजेनिक असा यांचा चेहरा कधीच नसतो.आयुष्यातील दुःखाचे काळे डाग यांच्या चेहऱ्यावर जागा मिळवतात, पण फेस क्रिम कशी असते ही यांना ठाऊक ...
 तीर्थक्षेत्र पंचधारा श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार
Article

 तीर्थक्षेत्र पंचधारा श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार

-महाशिवरात्री विशेष- तीर्थक्षेत्र पंचधारा  श्रीक्षेत्र शेंदूरजना बाजार     शेंदूरजना बाजार शिवारातील सुर्यगंगा नदीवर पंचधारा हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. मोझरी,तळेगाव ठाकूर,शेंदूरजना बाजार, अनकवाडी, रघुनाथपूर या पाच गावाच्या सीमेवर हे तीर्थक्षेत्र आहे. शिंदीपांडी म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आढळून आले आहेत त्यामुळे हे गाव उजाड गाव असल्याचा अनेकांचा कयास आहे.  शेंदूरजना बाजार पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील सूर्यगंगा नदीवरील उत्तर वाहिनीच्या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे.उत्तर वाहिनीच्या ठिकाणी असलेले मंदिर हे बहुदा शिवालय असतात असा पुरातन धर्मग्रंथात उल्लेख आहे.१९४५ पर्यंत हे तीर्थक्षेत्र हे विस्कळीत असे होते श्री संत अच्युत महाराज यांचे शेंदूरजना बाजार या गावी आगमन आणि वास्तव्या दरम्यान महाराज वन परिक्रमा करीत असताना त्यांना हे भग्नावस्थेतील शिवालय दृष्टीत पडल...