नागपूरच्या कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी
8 मार्च 2025 जागतिक महिला दिन सप्ताह निमित्त तिसरा लेख. अशा प्रकारचे महिला आयएएस आयपीएस आय आर एस सनदी व राजपत्रित महिला अधिकाऱ्यांवरील विशेष लेखमाला आठ मार्च पर्यंत दररोज आम्ही मिशन आयएएस अमरावती यांच्या सौजन्याने वाचकांना उपलब्ध करून देणार आहोत. त्या मालिकेतील हा तिसरा लेख.- संपादकनागपूरच्या विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांचा पहिला माझा परिचय आमच्या अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या कोरोना काळातील ऑनलाइन मिटिंगमध्ये झाला. कोरोना काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही जवळपास 1100 ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केले होते. त्या कोरोना काळामध्ये मिशन आयएएस अमरावती व ज्ञानदीप महाविद्यालय खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करण्यात आला होता.त्या कार्यक्रमात तेव्हा श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी ह्या सिंधुदुर्ग...









