माझ्या मायमराठीची बोलू किती कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके
किती वर्णाव्या त्या गाथा माझ्या मायमराठीच्या …
अवघ्या महाराष्ट्रात२७ फेब्रुवारी हा दिवस* मराठी भाषा गौरवदिन* म्हणून साजरा केल्या जातो… नाशिकच्या जन्मभूमीत जन्मलेल्या विष्णू वामन शिरवाडकरांनी मराठीला मोलाचे सांस्कृतिक योगदान दिले.ते उत्कृष्ट,कवी,लेखक,नाटककार आणि उत्तम समीक्षक होते.मराठी साहित्याचा उचित गौरव व्हावा, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून त्यांचे योगदान फार मोलाचे होते. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस * म्हणून साजरा होतो.
माझ्या मायमराठीचा इतिहास फार प्राचीन आहे… सोळाव्या शतकापासून ते आजतागायत मायमराठीचे गोडवे गाणाऱ्या कितीतरी समृद्ध गाथा याची ग्वाही देतात. श्री चक्रधर,म्हाईंभट यांनीही मराठीला प्रोत्साहन दीले. ‘लिळाचरित्र’ हा मराठीतला आद्य ग्रंथ. श्रीकृष्णचरित्र,भगवतगीता, चरित्रग्रंथ,ऋषीपूरवर्णन, इत्यादी, मराठी प्राचीन वाड:याची साक्ष देतात.
मायमराठीला लाभलेले संतसाहित्य हे इतिहासात अजरामर झाले आहे…अगदी जात्यावरच्या ओव्यांपासूनओव्यांपासून, लोकगीते,भारूड अभंग,पोवाडे, हरिपाठ ही संतांची धरोहर… संत जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा,महंदबा या महिलांचेही योगदान खूप मोलाचे आहे.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
‘श्रीरुक्मीणीस्वयंवराचे ‘ ११० अभंग कवणस्वरुपात लिहीणारी पहीली प्राचीन महिला कवयित्री ‘महदंबा‘होत.
‘ज्ञानदेवे रचिला पाया,तुका झालासे कळस’ वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार अभंग आणि किर्तनातून करीत मराठी ला सन्मान प्राप्त करून दीला. मराठीतून जनजागृती केली.* अमृताच्या पैजा जिंकणारी मायमराठी ….माऊलींनी मराठीचे दालन समृद्ध केले.
‘नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी‘ म्हणत हजारो दींड्या, पालख्या विठ्ठलाचा जयघोष करीत…मराठीचा भजन कीर्तनातून जागर करीत..संतांनी संत वाड: याचा मराठीतून प्रचार केला. मराठीला भरजरी किनार देऊन अभंग ओव्या मधून मराठीची गोडी वाढवली. देवनागरी लिपीतूनही संतसाहित्य प्रसिद्ध झाले. संत रामदासांचे ‘दासबोध*मनाचे श्लोक‘
आजही तेवढेच अजरामर आहेत. संतसाहित्याने मायमराठीची ध्वजा नक्कीच उंचावली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात संतसाहित्य आजही अजरामर आहे.
अवघ्या सोळाव्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’( भावार्थदीपिका) हा ग्रंथ लिहून ज्ञानेश्वरांनी संतसाहित्य अजरामर केले. ‘हे विश्वची माझे घर’ म्हणत पसायदान लिहत मायमराठीला समृद्ध केले. संत नामदेव, एकनाथ महाराज,संत तुकाराम , संत कबीर, गोरा कुंभार अलिकडच्या काळातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी *ग्रामगीता* घराघरात पोचवली. आजही खेडोपाडी ग्रामगीतेचे पठण केले जाते. ग. दी माडगुळकरांनी गीत रामायण मराठीतून लिहून अजरामर करून ठेवलेय.
शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला.पोवाड्यातून वीररसाच्या गाथा अजरामर केल्या…कलेला प्रोत्साहन देत मराठीतून राज्यकारभार केला.* दासबोधातून समर्थ रामदासांनी * मनाचे श्लोक* घराघरांत पोहचवले.अशी ही मायमराठी, सर्वांना वेड लावणारी….!!कधी नाट्यसंगितातून,कधी पोवाड्यातून, काव्यातून,नाटकातून गीतरामायणातून, तरकधी ठसकेबाज श्रृंगारीक लावणीतून भारूडातून मराठीला जरतारी नटवले. विविधांगी रुपात तीच रूपडं प्रत्येक मराठी माणसाला वेड लावणारं…!!प्रत्येक बारा कोसांवर आपली भाषा बदलते. फक्त महाराष्ट्रात अहिराणी, झाडीबोली, खानदेशी कोकणी, वैदर्भी, कोल्हापूरी, डोगरी मरहट्टी एवढे प्रकार आढळतात.
प्राचीन काळापासून ते आजतागायत कुसुमाग्रज,राम गणेश गडकरी, विंदा करंदीकर, नामदेव ढसाळ,इरावती कर्वे, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके,ना.धो महानोर इंदिरा संत ,ग.दी माडगुळकर इत्यादी अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्य अजरामर करून ठेवलेलं आहे…आणी ही धरोवर जतन करणे आधुनिक पिढीचे काम आहे म्हणूनच दरवर्षी साहित्य संमेलनातून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा… प्राचीन साहित्य पुढल्या पिढीला कळावे… यासाठी हा* मराठी राजभाषा दिवस *साजरा केला जातो. ग्रंथदिंडी काढली जाते.प्राचीन साहित्य संपदेचा , भगवद्गीतेचा सन्मान केल्या जातो. अशी ही आमची नऊ रसानी ओतप्रोत भरलेली मराठी, माणसांच्या मनात कायम घर करून राहाणारी. संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणारी.
वाजे महाराष्ट्राचा डंका
मायमराठी आमुची शान
गाऊ गोडवे मायमराठीचे
मायमराठीचा आम्हा अभिमान
- शब्दवैभवी पल्लवी उमरे