होळीचं सोंग घेवून..!
होळीचं सोंग घेवून..!होळी हा सण भारतभर आगदी उत्साहने साजारा होणारा सण आहे.हा भारतीय संस्कृतीचा सण आहे.संस्कृती जपण्याचं हा उत्सव आहे.जातीभेद,मनभेद विसरून जाण्याचा व आनंद उधळण्याचा हा सण आहे.उत्तर भारतात हा सण मोठया उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.महाराष्ट्रातही हा सण अतिशय आनंदाने मनभेद,मतभेद विसरून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील बंजारा समाज तर होळी सण साजरा करत तांडा संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतो.आज होळीचे कितीही आपण गुणगान केलो तरी चाळीस पन्नास वर्षापूर्वी होळी साजरी करताना जो जोम होता,उत्साह होता,आनंद होता,आपुलकी,प्रेम होतं ते आज दिसून येत नाही.रंगाचं सण असुन पूर्वीपेक्षा थोडसं रंगहीन झाल्याचं जाणवतं.चाळीस पन्नास वर्षापूर्वी तांडयावरची होळी जवळपास तब्बल एक महिना आगोदरपासुन साजरी केली जायची. लाकडाच्या टिपऱ्या तयार केल्या जायच्या.काही ...









