Monday, December 8

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

निवड योग्य पादत्राणांची

रोजच्या फॅशनमध्ये पादत्राणांचंही तितकंच महत्त्व आहे. पेहरावानुसार पादत्राणं घातली जातात. पण काही प्रकारची पादत्राणं वॉर्डरॉबमध्ये असावी. स्टायलश आणि क्लासी लूकसाठी पॉईंटेड टोजवाले शूज कॅरी करू शकता. पार्टी किंवा ऑफिस अशा ठिकाणी ते चालून जातील. पार्टीसाठी एंबेलश्ड शूजचा पर्याय आहे. हा प्रकार वेस्टर्न कपड्यांवर जास्त उठून दिसतो. ऑक्सफर्ड शूजचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ब्राईट रंगांपासून ब्राऊन, ब्लॅक, टॅन अशा रंगांमध्येही ते उपलब्ध आहेत.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजपादत्राणांचा आरामदायी पर्याय हवा तर क्रिस-क्रॉस सँडल्स निवडता येतील. ऑफिस किंवा कॅज्युअल ऑकेजनसाठी या सँडल्स चालून जातील. स्टाईल आणि कंफर्ट या दोन्हीचा मिलाफ या निमित्तानं साधता येईल. पीप टोज, पॉईंटेड हल्स, स्लीप ऑन्स अशा प्रकाराच्या हिल्स चलतीत आहेत. त्यामुळे पार्टीसाठी पादत्राणांची निवड करताना एंबेलश्ड हिल्सचा पर्याय आहे. हिल्स...
Gerenal

घरच्या घरी घ्या आपल्या डोळ्यांची काळजी

आपल्या सर्वांच्याच डोळ्यांपुढे कुठल्या न कुठल्या स्क्रीन्स सतत असतातच. टीव्ही स्क्रीन, कॉम्प्युटर स्क्रीन, मोबाईल फोनचा स्क्रीन अश्या अनेक स्क्रीन्सवर दिवसभर आपले डोळे लागून राहिलेले असतात. काही वेळा दिवसभराच्या कामानंतर डोळे पार थकून जातात, त्यानंतर डोळे दुखणे, लाल होणे, डोळ्यांची आग होणे, त्यातून सतत पाणी येणे अशा तक्रारी सातत्याने सुरू होतात. कधी कधी कमी दिसू लागल्याची भावना देखील होते. अश्या वेळी काही घरगुती उपायांनी आपल्या डोळ्यांची निगा राखता येऊ शकते.सकाळी उठल्यानंतर स्वछ पाण्याने चुळा भरून डोळे स्वच्छ धुण्याची शिकवण प्रत्येक लहान मुलाला अगदी लहानपणापासून दिली जाते. या उपायाने श्‍वासाची दुगर्ंधी जाऊन डोळे स्वच्छ होतातच, पण त्याशिवाय तोंडामध्ये पाणी भरून घेऊन, डोळे उघडे ठेऊन त्यांच्यावर पाणी मारल्याने दृष्टीदोष कमी होतो. जर एखाद्या व्यक्तीला चष्म्याचा नंबर जास्त असेल, तर त्यांनी हा...
Gerenal

पायांचे खुलवा सौंदर्य

शारीरिक स्वच्छतेमध्ये दुर्लक्षित राहणारा घटक म्हणजे पाय. बरेचदा पायांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं. परिणाम पायाचा तळपाय, गुडघे, घोटे, टाचा असा भाग काळा दिसू लागतो. तिथे घट्टे पडू लागतात. पायांच्या या काळ्या पडणार्‍या भागांची स्वच्छता करणं बरचं कठीण असतं. पण याकामी येणारा एक घटक म्हणजे बेकिंग सोडा. क्षारीय गुणधर्मांमुळे त्वचेच्या स्वच्छतेसाठी याचा मोलाचा उपयोग होतो.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!तळपायांवर बेकिंग सोड्याने स्क्रब केल्यास अथवा बेकिंग सोड्याची पेस्ट तळपायावर लावल्यास टॅनिंग, पादत्राणांचे व्रण, काळसर डाग निघून जातात आणि त्वचा मऊमुलायम होते. बेकिंग सोड्यामुळे मृत त्वचा दूर होते. सहाजिकच त्वचेतील अशुद्ध तत्त्वं नाहिशी झाल्यामुळे त्वचा कोमल आणि तेजस्वी होते. बेकिंग सोडा, ओटमील आणि खोबरेल तेल ही सामग्री सम प्रमाणात एकत्र करुन तयार होणारी पेस्ट भेगाळलेल्या टाचांवर लावा...
Gerenal

..म्हणून गरज चष्म्याची

दृष्टीदोष असल्यास चष्म्याची मदत घेतली जाते. चष्म्यामुळे हा दोष दूर करता येतो. जवळचं अथवा लांबचं दिसत नसल्यास होणारी अडचण चष्म्यामुळे दूर होते. काहींना लहानपणापासून चष्मा लागतो. पण प्रौढ वयात लागणार्‍या चष्म्याला चाळिशी म्हटलं जातं. वृद्धावस्था यायला लागली की वाचण्यास चष्म्याची गरज पडते. इतर अनेक कारणांमुळे अगदी लहान मुलांपासून चष्मा लागत असला तरी वाढत्या वयाचा परिणाम म्हणूनही अनेकांना चष्मा लागतो. आजकाल हे प्रमाण वाढले आहे हे देखील आपण जाणून घ्यायला हवं.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!आई वडिलांना खूप मोठय़ा नंबरचा चष्मा असेल तर मुलांना अगदी लहान वयातच चष्मा लागतो. डोळ्यांची समोरून मागे अशी लांबी जास्ती वा कमी झाल्यास अनुक्रमे मायनस आणि प्लस अशा नंबरचे चष्मे वापरावे लागतात. म्हातारपणी डोळ्यातील भिंगाची लहान मोठे होण्यासाठीची लवचिकता कमी झाल्याने वाचण्यासाठीचा म्हणजे जवळचा चष्मा ...
Gerenal

केळ्याचे आरोग्यदायी फायदे …

केळ्यामध्ये कॅल्शिअम, लोहाचे प्रमाण अधिक असल्याने नियमित एक केळं खाल्यास हाडांचा ठिसूळपणा म्हणजेच ऑस्टीओपोरॉसीस हा आजार टाळण्यासाठी मदत होते. २) केळ हे शक्तिवर्धक फळ असल्याने केळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील थकवा कमी होऊन शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त होण्यास मदत होते. ३) केळ्याच्या सेवनाने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी केळ योग्य प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरते. ४) केळ नियमित योग्य प्रमाणात खाल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. केळ पचायला सोपे असल्याने पोटाशी संबंधित विकार कमी करण्यास मदत होते. ५) जुलाबाचा त्रास होत असल्यास केळ खाणे फायदेशीर ठरते. जुलाबामध्ये शरीरातील ऊर्जा कमी होते अशावेळी केळं खाल्यामुळे शरीरातील थकवा कमी होऊन नवीन ऊर्जा मिळते आणि शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक केळ्यामधून शरीराला मिळतात. ६) केळ्यामुळे शरीरातील ह...
Gerenal

मुलाखतीत यश मिळवायचे तर..

नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नातली पहिली पायरी म्हणजे मुलाखतीला सामोरं जाणं. मुलाखतीत ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्वाचीही छाप पडते. म्हणूनच इंटरव्हयूला जाताना आपल्या लूककडे विशेष लक्ष द्यायला हवं. यादृष्टीने इंटरव्हूला जाताना नेमकं काय करता येईल याविषयी जाणून घेऊ या. चुकीच्या फिटिंगचे कपडे घालू नका. फार घट्ट किंवा ढगळ कपडे घालू नका. इंटरव्हयूला जाताना भलतंसलतं काहीही घालू नका. असा पेहराव असेल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत. बो टाय, बेडॅझल्ड तसंच मेटॅलिक टाय, पेस्टल किंवा निळ्या रंगाचे सूट असलं काहीही घालू नका. चांगली पँट सापडली नाही तर मुलं पटकन जीन्स निवडतात. त्यातही फॉर्मल पँटसारखी वाटणारी ब्लॅक जीन्स घातली जाते. पण असं करू नका. जीन्स हा कॅज्युअल पेहराव आहे. इंटरव्ह्यूला जीन्स घालून जाणं ही खूप मोठी चूक ठरेल. सँडल्स किंवा स्नकर्सही घालू नका. टॅटू काढले असतील तर ते झाकणारे कपडे घाला. पिअर्सि...
Gerenal

बस्तरवारची गुजरी

आठवडी बाजारासारख्या ग्रामीण अर्थव्यवस्था चक्क हजारो वर्षांच्या मानवी अर्थशास्त्रिय उत्र्कांतीचा परिपाक आहेत. त्या केवळ अर्थव्यवस्था नाहीत तर आपला सांस्कृतीक तानाबाना आहेत. लहानपणी करजगांवात, गुरुवारी आठवडी बाजार भरायचा त्याला "गुजरी" म्हणायचे. जुने जाणते माणसे गुरुवारला बस्तरवार (बृसस्पतीवारचा अपभ्रंश झाला असावा) पण म्हणायचे. बस्तरवार म्हटले की आम्हा लहान्यांना आनंदाची पर्वनी असायची. त्यात घोड्यावर लादून व्यापारी माल आनायचे. गुरुवारचा बाजार झाला की, मग पिपळखुटा, कुपटा, असा व्यापार्याचा प्रवास असे, आम्हा सगळ्या भावंडाना खाऊ साठी बाप पन्नास पैशांचं नाण तर कधी दोन आठं आणे द्यायचे. त्या धातुमिश्रीतच्या नाण्यासाठी एक आठवडाभर गुजरी ची वाट बघावी लागायची.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!करजगावचा बाजार गुरुवारी असल्याने त्या दिवशी मजु-यांचे पैश्याचे वाटप होत होते. काही कास्तकार तर गुरुव...
Gerenal

रोग बरा होण्यासाठी..

व्याधी दूर करण्यासाठी नानाविध उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यात अँलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, सिद्ध वैद्यक, अँक्युप्रेशर, अँक्युपंक्चर, निसर्गोपचार, चुंबकोपचार आदींचा उल्लेख करता येईल. प्रत्येक उपचार पद्धतीचे काही फायदे, काही तोटे असतात. प्रत्येक पद्धतीत सगळ्याच रोगांवर उपचार असतील असंही नाही. सगळ्याच पद्धती शास्त्रीय तपासण्याच्या आधारे पडताळून पाहता येतील असण् नाही, कारण रोग बरा होण्यामागे शारीरिक कारणांखेरीज मानसिक कारणंही महत्त्वाची असतात. बरेच लोक वैद्यकीय संस्थांच्या जाहिराती वाचून तिथल्या डॉक्टरांकडे उपचाराला जातात; पण त्यांच्या पदरी निराशाच येते. काही रोग असाध्य समजले जातात. यात मेंदूच्या कार्यातील वा रचनेतील बिघाड, हातापायाचा लुळेपणा, मतिमंदत्व, मधुमेह, रेबीज आदी रोगांचा समावेश होतो. पुरेशा शास्त्रीय सद्धतेखेरीज कोणीही हे रोग बरे करण्याचा दावा करत असेल तर तो मॅजिक ड्र...
Gerenal

व्हायरल फिवर आहे?

तापाविषयी चर्चा करताना नानाविध कारणांमुळे उद्भवणार्‍या तापाचा विचार करावा लागतो कारण प्रत्येक विकारातल्या तापाची पद्धत वेगवेगळी असते. साधा ताप एक-दोन दिवसात कमी होतो. मात्र व्हायरल फिवरचा ताप लवकर जात नाही. या तापासोबत थंडीही वाजते. या तापावर सर्वसाधारण तापाच्या औषधांचा परिणाम होत नाही. मुख्य म्हणजे हा ताप बराच काळपर्यंत टिकून राहतो. यासोबत सांधेदुखी, डोकेदुखी, उलट्या, चेहर्‍यावर सूज, अंगावर पुरळ उठणं अशी लक्षणंही दिसून येतात. ही लक्षणं दिसली की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वत:च्या मनाने कोणतेही उपचार करू नये. या आजारात घरगुती उपायांवर अवलंबून राहणं अयोग्य आहे. विषाणूजन्य तापाचं निदान झाल्यानंतर आराम करणं गरजेचं आहे. या आजारपणात सूप, तांदळाची खिचडी असा हलका आहार घ्यायला हवा. ताप आला की आपण प्रतिजैवकं घेतो. पण हे अत्यंत चुकीचं आहे. या तापावर साध्या प्रतिजैवकांचा कोणताही परिणाम होत नाही. चुकीच...
Gerenal

ऑफिसमधले फॅशनिस्टा बनताना

मित्रांनो, ऑफिसमध्ये कोणतेही कपडे विशेष करून कॅज्युअल वेअर ऑफिसमध्ये घालून जाणं चांगलं नाही. ऑफिसमधले फॅशनिस्टा बनताना या चुका तर करत नाही ना, जाणून घ्या.. एखाद्या कॉन्सर्टला गेला आहात. तिथे टी शर्ट किंवा जर्सी मिळाली. हा टी शर्ट किंवा जर्सी दुसर्‍या कॉन्सर्टला घालून जाऊ नका. ऑफिसमध्येही असा टी शर्ट घालू नका.ऑफिसमध्ये रिप्ड म्हणजे फाटलेली जीन्स घालून जाऊ नका. ही जीन्स कितीही कूल वाटत असली तरी घालण्याचा मोह टाळा. दाढी वाढवून विस्कटलेले केस घेऊन ऑफिसमध्ये जाऊ नका. ऑफिसमध्ये क्लिन शेव्हड लूकच कॅरी करा. ऑफिसमध्ये शॉर्टस घालू नका. घरी किंवा बाहेरही शॉर्टस घालून फरत असलात तरी ऑफिसमध्ये शॉर्टस अजिबात घालू नका. क्रिकेट खेळताना किंवा कॅज्युअल आउटिंगला कॅप्स चांगल्या दिसतात पण ऑफिसमध्ये हा लूक चांगला दिसत नाही. त्यामुळे कॅप कितीही फंक असली तरी ऑफिसमध्ये घालू नका. ऑफिसमध्ये घातल्या जाणार्‍या कपड्यांन...