अस्वस्थ मनाची घालमेलं….!
"काही व्यक्तींच्या आक्रमणातून राष्ट्र घडत असेल तर ते राष्ट्र हे राष्ट्रीय आदर्शाचे गुलाम ठरते.त्या माणसाच्या स्वप्नात आणि जीवन धारणात बंदिस्त होते.त्याच्या चिरकाल आशा आणि धर्म संकल्पनाच त्यांना देश वाटतात तेव्हा ते स्वतःच्या विश्वासालाच अप्रमाणिक असतात.शब्द आणि कृतीद्वाराही ते एका आत्मसंतुष्ट आणि परिग्रही प्रवृत्तीला पाठींबा देत असतात त्याचा पाठपुरावा करतात."
वॉल्टर लिपमन
मृग नक्षत्राचे काळे काळे मेघ नभात अवतरले होते.मोसमी वाऱ्याची चाहूल खगाना आली होती.नव्या जीवनाला नवे ऊर्जाबल देण्याचे काम मृग करत असतो.सारा प्रदेश गंधवाहानी मोहरून आला होता.पक्ष्यांची मंजूळ रव कर्णाला सुखावणारी वाटत होती .सारे खग स्वच्छंद गगनात विहार करत होते.काळे मेघ दिसताच त्यांनी आपला थव्याला घरट्याकडे वळवले होते.झाडाच्या पानातून नवं संगीताची धून ऐकू येत होती.निसर्गातील बदलत्या काळातील चक्र अविरत चालू आहे.पण म...