📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

चाळशीनंतरची काळजी

On: September 24, 2025 4:36 PM
आम्हाला फॉलो करा:
35

वयाच्या चाळशीनंतर आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं ठरतं. मात्र, अनेक महिला या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देत नाहीत. वास्तविक चाळशीनंतर महिलांच्या शरीरात बरेच बदल होतात. चयापचय क्रिया मंदावते आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून या वयातील महिलांनी योग्य आहाराकडे लक्ष द्यावं.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

याबाबतच्या टीप्स..
तशीनंतरच टप्याटप्यानं चयापचय क्रिया मंदावण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे पांढरा ब्रेड किंवा पांढरा भात याऐवजी महिलांनी ब्राउन राईस, व्हट ब्रेड किंवा ओट्स खावेत. यामुळे शरीराला फायबर मिळेल. फायबरमुळे वजन वाढण्याला प्रतिबंध होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. आहारात फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.

गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!

सॅलेड, कोशिंबीरी हा फायबरचा चांगला स्रोत आहे. पालक, गाजर, काकडी, टॉमेटो, संत्री, स्ट्रॉबेरी यांचं सेवन महत्त्वाचं ठरतं. यातून फायबरबरोबर पोटॅशियम, क जीवनसत्त्व, अँटीऑक्सडंट्स विपुल प्रमाणात मिळतात. यामुळे त्वचा चांगली राहून सूर्याच्या अतिनील किरणांपासून तिचं रक्षण होतं.

आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करावं. मीठामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. या वयात जास्त साखरेचं सेवनही धोक्याचं ठरतं.

चाळीशीनंतर ही 5 कामं अवश्य करा…

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment