Sunday, March 8

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्य
Article

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्य

गावखेड्याची दिवाळी: आठवणींनी उजळलेलं ग्रामीण सणाचं सौंदर्यनवरात्रं पार पडलं की दसरा दणदण करत यायचा.दसऱ्याच्या दिवसी घराला आंब्याच्या पानांची तोरणं दोऱ्यात ओवून बांधायची‌. चार,पाच झेंडूच्या फुलांईचा हार करायचा.आपटयाची पाने तोडायले जाऊन ती घरी आणायची.व संध्याकाळी जेवणं झाली म्हणजे घरातली म्हातारी माणसं प्रशस्त आंगनात सुताचा तडव आथरून दसऱ्याच्या सोनं देण्याची वाट बघायची. बाजूला पानपुळा सुपारी अडकित्ता असायचा.येणाऱ्या, जाणाऱ्यांची ख्यालीखुशाली ईचारून पानसुपारी खाण्याचा आग्रह करायची.किती दिलदार लोकं होती ही.दसरा पार पडला म्हणजे पंधरा दिवसावर दिवाई रोरो करत यायची.आमच्या गावाकडच्या दिवाईत मस्त व आगळीवेगळी मजा होती राजेहो. घरातल्या सगळ्या सातऱ्या वाकया,गोधडया धान्य, मिरच्या साजऱ्या उन्हात वाऊचिऊ घालायचं काम चालायचं.महिन्याभरा पूर्वीच गवंडयाच कुटार गारा करून त्यात तुडवून,कालवून साजरू मूरू द...
बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्र
Article

बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्र

बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्रआपल्या महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या मध्य ते उत्तरार्धादरम्यान पिढ्यानं पिढ्या चालत आलेली बारा बलुतेदार ही वस्तूविनिमय पद्धतीवर आधारलेली पद्धत ग्रामीण जीवनाचा अविभाज्य अंग होती.त्यात मुख्यत: वस्तू किंवा कामाच्या मोबदल्यात धान्याची देवाणघेवाण होत असे.कुंभार, लोहार, सुतार, चांभार, न्हावी, धोबी, महार, माळी, तेली, गुरव, कोळी, मातंग…असे ते बारा बलुतेदार होत.त्यांच्या व्यवसायानुरुप ही नावे पडलेली दिसतात. ज्यांनी मागील शतकात ग्रामीण जीवन अनुभवले आहे त्यांना ही पद्धत माहित आहे. ह्या व्यतिरिक्त ग्रामीण जीवनाचा भाग बनलेली काही व्यवसायिके होती.ती मात्र आपण लक्षात घेत नाही.त्याचाच आढावा घेणारा हा लेख.बेलदारबेलदार समाजातील ही मंडळी कुटुंबकबिल्यासह भटकंती करीत गावोगावी मातीची घरे बांधण्याची कामे करीत होती. मा...
भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!
Article

भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!

भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!भाषा विकासासाठी मराठी ग्रंथालयांची संख्या वाढवणे आवश्यक आहे कारण ते ज्ञान आणि माहितीचे केंद्र आहेत.मराठी भाषेची समृद्धता आणि संवर्धनात ग्रंथालयांची भूमिका फार मोलाची आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयीन ‘ग्रंथालय’ समृद्ध होणे गरजेचे आहे. वाचनामुळे लेखन कौशल्य मुलांना अवगत होते. ग्रंथालयामार्फत शालेय जीवनामध्ये चालवल्या जाणार्‍या वाचन चळवळीमुळे मुलांमध्ये आमूलाग्र बदल होतात. त्यांची भाषाशैली व वैचारीक परिपक्वता सुधारते. ग्रंथालय चळवळ समृद्ध करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.भाषा संवर्धन आणि ग्रंथालये यांचा घनिष्ठ संबंध आहे, कारण ग्रंथालये भाषेचे जतन आणि विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ग्रंथालये माहिती आणि साहित्याचा संग्रह करून भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात, तसेच भाषेच्या अभ्यासासाठी व शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरवतात. यामध्ये सा...
१० रुपयांत दिवाळीचा फराळ!
News

१० रुपयांत दिवाळीचा फराळ!

१० रुपयांत दिवाळीचा फराळ!अंबरनाथ : दिवाळीचा सण लोकांसाठी आनंद आणि गोडी घेऊन येतो. मात्र महागाईमुळे फराळाचे साहित्य अनेक कुटुंबांसाठी परवडणं कठीण झालं आहे. अशा पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये शिवसेनेने एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे — फक्त १० रुपयांत दिवाळी फराळाचे साहित्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ५ ते ६ हजार कुटुंबांची दिवाळी गोड झाली आहे. फराळ साहित्यामध्ये चिवडा, शेव, लाडू, करंजी यांसारखी पारंपारिक दिवाळीची गोडीची वस्त्रे होती.हा उपक्रम माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत “सणाच्या आनंदात गोडी आणणारा” असं शिवसेनेच्या प्रयत्नाचं वर्णन केलं.स्थानिक नागरिकांनी सांगितलं की, “आजच्या काळात फक्त १० ...
न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी  तिसऱ्या मजल्यावरून उडी!
News

न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी तिसऱ्या मजल्यावरून उडी!

न्यायाची २७ वर्षांची प्रतीक्षा; शेवटी तिसऱ्या मजल्यावरून उडी!पुणे : “तारीख पे तारीख…” गेली २७ वर्षे कोर्टात न्यायाची वाट पाहणाऱ्या पक्षकाराने शेवटी मृत्यूचीच निवड केली. पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून नामदेव जाधव (रा. वडकी, पुणे) यांनी आयुष्य संपवलं. या हृदयद्रावक घटनेने न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव गेल्या २७ वर्षांपासून जमीन व्यवहाराशी संबंधित एका वादग्रस्त प्रकरणात न्याय मिळण्याची वाट पाहत होते. प्रत्येक सुनावणीला केवळ “तारीख” मिळत होती, निकाल नव्हता. या सततच्या विलंबामुळे ते नैराश्यात गेले होते. बुधवारी सकाळी त्यांनी पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. म...
काकांवर प्रेमाचा नव्हे, ‘बुक्क्यांचा वर्षाव’!
News

काकांवर प्रेमाचा नव्हे, ‘बुक्क्यांचा वर्षाव’!

काकांवर प्रेमाचा नव्हे, ‘बुक्क्यांचा वर्षाव’!सोशल मीडियावर दररोज काही ना काही मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण हा व्हिडिओ पाहून इंटरनेटवर हशा पिकलाय. कारण यात आहे एक भन्नाट ट्विस्ट जिथे प्रेमाची सफर अचानक बुक्क्यांच्या वर्षावात बदलते!व्हिडिओमध्ये एक काका आणि काकू बाईकवर बसलेले दिसतात. गाडी सुरू होते, पार्श्वभूमीला रोमँटिक गाणं ‘ये वादा रहा’ चालू आहे आणि सगळं अगदी चित्रपटासारखं. पण काही क्षणातच दृश्य बदलतं काकूंचा मूड बिघडतो आणि त्या थेट काकांच्या पाठीवर हात उगारतात! बुक्क्यांचा असा पाऊस सुरू होतो की बाईक थांबवावी की जीव वाचवावा, हे काकांनाही कळेनासं होतं.दिल्ली नंबर प्लेट असलेल्या या बाईकवरील प्रसंगाने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. कुणी लिहिलं, “ही खरी लग्नानंतरची रिअॅलिटी!” तर कुणी म्हटलं, “काकूंचं प्रेमही ‘ॲक्शन पॅक...
नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा छापा; बनावट गुडनाइट उत्पादनांचा जाळा उध्वस्त
News

नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा छापा; बनावट गुडनाइट उत्पादनांचा जाळा उध्वस्त

नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा छापा; बनावट गुडनाइट उत्पादनांचा जाळा उध्वस्तमुंबई : घरगुती कीटकनाशक ब्रँड गुडनाइटची बनावट उत्पादने तयार करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्यावर नागपूर पोलिसांनी मोठा छापा टाकला आहे. ही कारवाई गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (जीसीपीएल) आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.स्थानिक पोलिस आणि जीसीपीएलच्या तपास यंत्रणेच्या मदतीने ह्या कारखान्याचा शोध लावला गेला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात बनावट गुडनाइटची सामग्री जप्त करण्यात आली आहे. जप्त वस्तूंपैकी 10,937 रिकामे गुडनाइट बॉक्स, 2,641 बनावट स्टिकर्स, 7 रिकामे कार्टन आणि 2 तयार बनावट गुडनाइट उत्पादने समाविष्ट आहेत.या कारवाईत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा 2023 च्या कलम 318 (4) अंतर्गत FIR नोंदवण्यात आली आहे. पोलिस आता या रॅकेटशी संबंधित संपूर्ण पुरवठा नेटवर्क व संपर्कां...
टॅक्स भरतो, पण रस्त्यावर थुंकतो; पुण्यातील रिक्षावाल्याचा व्हायरल व्हिडीओ
News

टॅक्स भरतो, पण रस्त्यावर थुंकतो; पुण्यातील रिक्षावाल्याचा व्हायरल व्हिडीओ

टॅक्स भरतो, पण रस्त्यावर थुंकतो; पुण्यातील रिक्षावाल्याचा व्हायरल व्हिडीओपुणे : सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असते, पण काही वेळा काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. पुण्यातील एक रिक्षाचालक रस्त्यावर थुंकताना पकडला गेला. पण जाब विचारल्यावर त्यानं आपली चूक मान्य करण्याऐवजी “मी टॅक्स भरतो” असं उत्तर दिलं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.सामाजिक माध्यमांवर हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. स्वच्छतेसंदर्भात रस्त्यांवर पाट्या लावल्या आहेत, कायदे आहेत आणि प्रत्येक नागरिकाचा कर्तव्य आहे की तो सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळेल. मात्र काही लोक अजूनही या नियमांकडे दुर्लक्ष करतात, जे समाजासाठी धोकादायक ठरू शकते.सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहता, अशा लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावण्यासाठी शाळांपासूनच जनजागृती करणे, सामाजिक मोहिमांचा विस्तार...
११७ वर्षांचा मतदार, ४० वर्षांचा मुलगा ; जयंत पाटलांचा बाण, आयोग झाला हैराण!
News

११७ वर्षांचा मतदार, ४० वर्षांचा मुलगा ; जयंत पाटलांचा बाण, आयोग झाला हैराण!

११७ वर्षांचा मतदार, ४० वर्षांचा मुलगा ; जयंत पाटलांचा बाण, आयोग झाला हैराण!मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना मतदार यादीतील घोळांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (१४ ऑक्टोबर) मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. बैठकीत मतदार यादीतील विसंगती, चुकीची नावे, पत्त्यांतील गोंधळ आणि अपूर्ण माहिती यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर तुफान हल्ला चढवला.जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मतदार यादीत इतका गोंधळ आहे की ११७ वर्षांच्या व्यक्तीला ४० वर्षांचा मुलगा दाखवला आहे. काही ठिकाणी एकाच घरात अनेक लोक दाख...
‘मनाचे श्लोक’चा झाला ‘तू बोल ना’! वाद मावळला, सिनेमा उजळला!
News

‘मनाचे श्लोक’चा झाला ‘तू बोल ना’! वाद मावळला, सिनेमा उजळला!

मनाचे श्लोक'चा झाला 'तू बोल ना'! वाद मावळला, सिनेमा उजळला!मुंबई : मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा नावाच्या वादावरून चर्चा रंगली होती. अभिनेत्री व दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित “मनाचे श्लोक” या चित्रपटाच्या नावावरून धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला होता. संत समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथाशी साधर्म्य असल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत होता. परिणामी पुण्यातील काही चित्रपटगृहांमध्ये शो थांबवण्यात आले आणि आंदोलनही झालं.परंतु, अखेर सर्व वाद मिटवत चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय आता हा चित्रपट “तू बोल ना” या नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.10 ऑक्टोबर रोजी “मनाचे श्लोक” या नावाने रिलीज झालेल्या चित्रपटाचा प्रवास सुरुवातीला खडतर ठरला होता. परंतु, आता सर्व गैरसमज दूर करून 16 ऑक्टोबर रोजी “तू बोल ना” या नव्या नावाखाली चित्रपट पुन्हा प्रदर्शित ह...