Thursday, March 12

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!
Article

शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!

शारीरिक शिक्षणाचे महत्त्वशिक्षणाचा अर्थ केवळ पुस्तकातून ज्ञान मिळवणे असा नसून, व्यक्तीच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासाकडेही लक्ष देणे हा शिक्षणाचा उद्देश आहे. आपल्यासाठी जसे शिक्षण महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे शिक्षणात खेळाचेही महत्त्व आहे, चांगल्या आरोग्यासाठी खेळ महत्त्वाचे आहेत, शिक्षणामुळे बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा विकास होतो आणि खेळामुळे आपले शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते.मात्र आजकाल शाळांमध्ये खेळाला कमी प्राधान्य दिले जात असल्याने ज्यांना खेळाची विशेष आवड आहे तेच विद्यार्थी मैदानात जातात. प्रत्येक शाळेत अशा खेळांची व्यवस्था असावी ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी सहभागी होऊन त्याचा शारीरिक व मानसिक विकास करू शकेल.शारीरिक शिक्षणाचा थेट अर्थ म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक श्रमाला महत्त्व देणे. शारीरिक शिक्षण हा शब्द शरीराला सुदृढ बनवण्यासाठी केलेल्या क्रियाकलापांसाठी वापरला...
IFSC कोड बँकेत नेमका का आणि कश्यासाठी असतो..!
Gerenal

IFSC कोड बँकेत नेमका का आणि कश्यासाठी असतो..!

IFSC कोड बँकेत नेमका का आणि कश्यासाठी असतो..!IFSC कोड आपल्या बँकेच्या पासबुकवर छापलेला आपल्याला दिसतो परंतु तो का असतो हे तुम्हाला माहित आहे का ? नसेल तर चला मग जाणुन घेऊ.इंटरनेट आणि संघनक ह्या मुळे बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आले.  त्यात रक्कम इतर खात्यात वर्ग करण्या साठी म्हणा अथवा एका बँकेतून दुसऱ्या बॅंक खात्यात  जर पाठवायची असेल तर पूर्वी ज्या पद्धतीचा वापर होत होता. त्या वेळ खाऊ, तर होत्याच त्याच बरोबर किचकट ही होत्या. त्या पूर्णतः बदल झाला असून आता चुटकी सरशी फँड इकडून तिकडं वर्ग होऊ शकतो.आणि त्याच साठी हा IFSC कोड सर्वात महत्वाची भूमिका  बजावत असतो. तो NEFT  मध्ये काही तासात तर RTGS  व IMPS  मध्ये काही मिनिटात फँड ट्रान्सफर होतो. त्याच साठी दोन्ही ही बॅंका ना हा IFSC कोडRBI ने दिलेला असतो. तो प्रत्येक बँकेला वेगळा असतो. (शाखेलाही) ,त्या मुळे व्यवहार एकदम सुरक्षित ...
स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते…!
Article

स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते…!

स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते   स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....   हेच ते प्रेत जिवंत असताना माझेमाझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय..   जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले-खरे; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते.   जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात १०० एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घा...
शॉट असावा तर असा….
Article

शॉट असावा तर असा….

शॉट असावा तर असा....      कधी कधी सचिन ला आणि मला काहीतरी वेगळं करायची हुक्की येते.. नवरा बायको असलो म्हणुन काय झालं , थोडा रोमान्स टिकवायचा असेल तर बदल हवा काहीतरी हटके हवं मग माझ्या लेखिकेच्या डोक्यात काहीतरी भन्नाट आयडीयाज येतात .. कधीतरी त्या बहरतात कधीतरी फेल जातात..   मुळात रसिकता ठासुन भरलेली असल्याने शब्दावर विनोद सुचतात आणि घरात हास्याचे फवारे उडतात.. इतर नवरा बायको सारखं रटाळवाणं लाइफ नक्कीच नाही.. पण कधीतरी करायला जातो गणपती आणि होतं माकड असही होतं..      काल संध्याकाळी असच काहीसं गमतीशीर घडलं.. सचिन मला म्हणाला , आज शॉट मारायचा का ??.. २५ वर्षानंतरही इश्य असा सहज शब्द तोंडुन आला.. सोनल तु आणि लाजतेस ??.. असा खडुस प्रश्न सचिनकडुन आला आणि मग मात्र मी जरा रागानेच त्याच्याकडे पाहिलं.. आमच्यात साधी धुसफुसही नसते त्यामुळे भांडण व्हायचा प्रश्नच उद्भवत नाही.. लटक्या रागात बेडरुममधे गेल...
महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल?
Article

महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल?

महागडे फोन घेताना नेमका कोणता विचार कराल? आयफोन  किंवा मग सॅमसंग, 60  हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचाफोन विकत घेतल्याने नेमका कोणता जगावेगळा स्टेटस मध्ये फरक  येतो? काही महिन्यांपूर्वी एका  गावात एका पोराने घरचे IPhone घेऊन देत नाहीत, म्हणून आत्महत्या केली. विषेश म्हणजे मुलाचे आईवडील गवंडी काम करतात, पण पोराने आईबापाजवळ नुसता नाद लावला होता आय फोन पाहिजे. शेवटी आई बापाने  पोराच्या हट्टापुढे हात टेकले आणि वडिलांनी दुकानात जाऊन आय फोन घ्यायच ठरवल पण पोराला पाहिजे तो कलर तिथे नव्हता. आणि हट्ट मात्र काही केल्या  कमी करत नव्हता .म्हणून बापाने सरप्राइज द्यायच ठरवल होत, व ते जेव्हा दुपारी घरी आले तोपर्यंत मुलाने मोबाईल घेऊन देत नाही म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  आणि विषेश म्हणजे पोरग पण काही लहान नव्हत  महाविद्यालयात शिकत होत.दुसर ही असच एक पोरग पाहिलं. कॉलेजच राहणीमान अस होत कि बा...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं…
Article

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना नव्हे, तर आम्हाला माणसात आणलं....! गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत.* आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारवाडा जनावरांसारखा राबला. रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक माणसांचे पाय वाकडे झाले. आमच्या माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारे लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्ये...
आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक…!
Article

आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक…!

आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक...! देशात झपाट्याने बेरोजगारी वाढत आहे.शिक्षण महाग होऊन ते तकलादू 'स्वरूपाचे' दिल्या जात आहे. त्यातून बेरोजगाराची 'फौज' निर्माण होत आहे. यावर' ब्र' शब्दही न काढणारी तरुण युवक 'मंडळी' वेगळ्याच स्वाभिमानाच्या, रूढी परंपरेच्या नादी लागून त्यांचे भवितव्य आधीच 'बरबाद' होत असतांना माणसाला 'तिसरा डोळा' प्रदान करणारी जन्म झाल्यापासून पहिल्यांदाच 'अ ब क ड' शिकवून पाया पक्का करणारी आपल्या भाषेतील आपली मराठी सरकारी शाळा देणगीदाराच्या देणगीने 'ठोक्याने' देण्यात येत आहे. यातच 'दारू' विक्रीसाठी गावा गावात परवाना देण्याचं सुनियोजित करण्यात आलं आहे. हे सर्व 'अचंबित' करण्यासारखं वाटत असलं तरीही त्यावर तरुणाई 'आवाज' उठवत नाही. मागचे 'इतिहास 'उकरून काढून तरुणांमध्ये वेगळाच जातीय अभिमान पेरला जात आहे. ही बाब सर्वसमावेशक समतेच्या विचाराचं 'खंडन' करीत एका विशिष्ट विचाराचं ...
मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!
Article

मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!

मानवतावादी विचाराचे पाईक व्हा..!   या पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक 'सजीवाला' भयमुक्त जगण्याचा 'अधिकार'आहे. असा कोणता 'जीव' आहे की,ज्याला जगावसं वाटत नाही..? ज्यांना भावना आहेत, सुखदुःखाच्या संवेदना आहेत, त्या सर्व जीवाला कधीच 'मरावसं' वाटत नाही तर अधिका अधिक जगावसं वाटतं. हे 'जगणं- मरण' नैसर्गिक असतं. कधी ते देहामध्ये आलेल्या सयंत्र बिघाडा मुळे 'तग' धरू शकत नाही. म्हणून कुणाला निर्धारित वेळेपेक्षा 'आधी' जावं लागतं. ही वेळ कुणाच्या आयुष्यात 'कधी' येईल सांगता येत नाही. कधी तर जन्म घेतानांच कुणाकुणाच्या वाट्याला आधीच जाणं येतं. तर कुणी शंभरापेक्षाही जास्त वर्ष जगतं. दगडावर आपटून सुद्धा त्याला मरण येत नाही. अशी ही देहयष्टी आणि काळाची महिमा आहे. जन्म- मरण हे 'निसर्गदत्त' आहे. कुणी कुणाचं 'जगणं' कुणी मग का म्हणून हिसकावून घ्यावं ? का कुणाच्या जगण्याला खंडित करावं? कुणाच्या जीवनामध्ये अडथळा ...
Article

शिक्षण: भ्रम आणि वास्तव

शिक्षण: भ्रम आणि वास्तवशिक्षण मानवाच्या जीवनाला नवा परिवर्तनशील महामार्ग दाखवणारा ऊर्जास्वल आहे. शिक्षण या तीन अक्षरापासून बनलेला हा शब्द मानवाच्या नवनिर्मितीची प्रक्रिया करतो. सुजाण व चांगला माणूस हा जगाचा महत्त्वाचा पाया आहे.आजचे शिक्षण नक्कीच्या या स्वरूपाचे आहे का..? हा प्रश्न देशातील सर्व बांधवांना पडला आहे. शिक्षणावर अनेक प्रयोग करण्याच्या नादात विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळू नये असा घाट काही वर्ग सातत्याने रचत आहेत. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजेत.शिक्षण हे सरकारची जबाबदारी आहे. पण ६२ हजार शासकीय शाळा खाजगी कंपन्याकडे हस्तांतर करण्याचा नियम सरकारने करून खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळेला नेऊन ठेवले आहे. शिक्षण हे सरकारची जबाबदारी आहे. ते त्यांचे संविधानिक काम आहे. पण आज शासन सरकारी क्षेत्र विकून स्वतः काहीच न करण्याचा प्रयत्न करत आहे.आज देशातील शिक्षण व्यवस्था...
बौद्ध देशांतील ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’
Article

बौद्ध देशांतील ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’

...भाद्रपद पौर्णिमेच्यानिमित्ताने..... बौद्ध देशांतील 'पूर्वजांचा स्मृतीदिन' ( Remembering the Ancestors) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ बौद्ध जगतामध्ये सप्टेंबर महिन्यातील पंधरवडा पूर्वजांबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याचा एक सण म्हणून Pchum Ben/ Vu-Lan/ Obon/ Ulambana/ Ancestor Day अशा विविध नावांनी साजरा करतात. आपल्या घरातील पूर्वजांना वंदन करण्याची प्रथा बुद्ध काळातील अडीज हजार वर्षांपासून चालत आलेली होती. अनेक बौद्ध देशांत या पंधरवड्यात पूर्वजांची आठवण म्हणून त्यांना आवडनारे घरगुती पदार्थ तयार करतात. ते तयार केलेले पदार्थ आणि फुले-फळे विहारात, पॅगोडात मांडले जातात. पूर्वजांना व वडिलधाऱ्यानां नमन करतात. भिक्खूंना वंदन करून आशिर्वाद घेतले जातात. त्यांना चिवर दान केले जाते. अशा तऱ्हेने Remembering the Ancestors हा 'सण' म्हणून आनंदाने बौद्ध देशांत साजरा केला जातो.भारतात पाळला जाणारा 'पितृपक्ष' आणि आशिया खंडाती...