Tuesday, March 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा
News

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरा

बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मलेरिया दिवस साजरागौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) : बेनोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 25 एप्रिल 2025 जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मलेरिया विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मलेरिया हा आजार कशामुळे होतो, त्याची लक्षणे कोणती, तसेच त्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी लागते याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी हिवताप प्रतिबंधासाठी "गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा" तसेच "क्लोरोकिनची गोळी, करी हिवतापाची होळी" अशी आकर्षक घोषवाक्य फलकांवर लावण्यात आली.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!यावर्षीच्या जागतिक मलेरिया दिनाचे घोषवाक्य होते — “चला हिवताप संपवूया - पुनर्विचार करा, योगदान द्या, पुन्हा सक्रिय व्हा.”कार्यक्रमाच्या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके मॅड...
कामगार दिन: कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान
Editorial

कामगार दिन: कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान

कामगार दिन : कष्टकऱ्यांच्या हक्कांचा सन्मानप्रत्येक वर्षी १ मे हा दिवस 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील कामगारांसाठी विशेष मानला जातो, कारण याच दिवशी कामगारांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला होता. ही केवळ सुट्टी नसून, ही आहे मेहनतीने जग चालवणाऱ्या श्रमिकांना सलाम करण्याची संधी.१८८६ साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी ८ तासांच्या कामकाजासाठी मोठा लढा दिला. त्यावेळी अनेक कामगारांना दररोज १२ ते १६ तास काम करावे लागत होते, पण त्याचे योग्य वेतन मिळत नव्हते. या अन्यायाविरुद्ध हजारो कामगार रस्त्यावर उतरले. काहींना आपला जीव गमवावा लागला, पण त्यांच्या बलिदानामुळेच आज आपल्याला ८ तासांची कामाची वेळ आणि इतर सोयी मिळाल्या. याच संघर्षाची आठवण म्हणून १ मे हा 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणून ओळखला जातो.● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-य...
ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंती
Article

ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंती

ग्राम विकासाचा मंत्र म्हणजे ग्रामजयंतीगावा गावासि जागवा | भेदभाव हा समूळ मिटवा || उजळा ग्रामोन्नतीचा दिवा | तुकड्या म्हणे ||आज 30 एप्रिल म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची जयंती. माझी जयंती ही ग्राम जयंती म्हणून साजरी करा असा आग्रह धरणारे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्म यावली मधील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी ठाकूर तर आईचे नाव मंजुळा देवी होते. वडील शिवणकाम करून तर आई दळणकांडन करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. महाराजांचे जन्म नाव माणिक होते. बाल माणिक इतर मुलांप्रमाणे खेळ न खेळता एकतारी व खंजिरी भजने म्हणून ईश्वर दर्शनाची तळमळ त्यांच्या मनामध्ये दिसून येत होती. प्राथमिक शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यानंतर महाराज शाळेऐवजी शिवमंदिरात, नदीत किंवा शेतात ध्यान पूजन करण्यासाठी वारंवार धाव घेत होते. आणि इथूनच राष्ट्र...
जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवणारे कवी विजय ढाले यांचे परखड भाषण!
News

जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवणारे कवी विजय ढाले यांचे परखड भाषण!

गौरव प्रकाशन खंडाळा (जि. यवतमाळ) : खंडाळा येथे झालेल्या एका सामाजिक जागृती कार्यक्रमात सुप्रसिद्ध विद्रोही कवी विजय ढाले यांनी जिल्हा परिषद शाळांचे संरक्षण, शिक्षणातील बाजारीकरण आणि गावगाड्याच्या शैक्षणिक शोषणाविरोधात परखड मत व्यक्त केले.गावातच शिक्षण देणं म्हणजे संस्कार टिकवणं - ढाले"शेठजी, भटजी, बनिया यांनी शिक्षणाचा बाजार मांडणं समजून घेता येईल, पण ज्या शिक्षकांची संपूर्ण कारकीर्द जिल्हा परिषद शाळांमुळे घडली, त्यांनीच निवृत्तीनंतर कॉन्व्हेंट शाळा सुरू करून शिक्षणावर व्यापार करणं, हे दुर्दैवी आहे," असे ढाले यांनी ठासून सांगितले.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदाशासकीय शाळा बंद करण्यामागे पद्धतशीर षड्यंत्रढाले यांनी आरोप केला की, शाळा दत्तक योजना, शाळा समायोजन धोरण आणि शिक्षण क्षेत्रातील नव्या तथाकथित सुधारणा या गावातील शासकीय शिक्षण नष्ट करण्याचे...
शेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टर
Article

शेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टर

अमरावती जिल्ह्यातील नम्रता ठाकरेशेतकऱ्याची मुलगी झाली कलेक्टरएका शेतकऱ्याच्या मुलीने मनापासून सातत्याने अविरत प्रयत्न केले तर ती देखील कलेक्टर होऊ शकते हे नम्रता ठाकरे यांनी सिद्ध करून दाखविलेले आहे. अमरावती पासून जवळपास 115 किलोमीटरवर तिचे गाव आहे . म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर.अमरावती ते वरुड आणि वरुड ते हातुर्णा असा प्रवास करावा लागतो.नुकत्याच जाहीर झालेल्या आयएएस या परीक्षेमध्ये नम्रता ठाकरे यांनी सुयश संपादन केलेले आहे. तिच्या यशाची बातमी खासदार डॉ. अनिल बोंडे यांना कळताच त्यांनी मुंबईवरून मला फोन केला आणि माझ्या वतीने तुम्ही हातुर्णा येथे जाऊन नम्रताचे अभिनंदन करा व तिला अमरावतीला दोन तारखेला सायंकाळी पाच वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित सत्कार समारंभाचे निमंत्रण द्या असे सुचवले.मी आमचे वरुडचे पत्रकार मित्र श्री गिरीधर देशमुख यांना फोन के...
बिरदेवची चित्तरकथा.!
Article

बिरदेवची चित्तरकथा.!

बिरदेवची चित्तरकथानुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली.बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. जळोची गावातील डाॅ राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी. मुले बिरदेव ची चेष्टा करायची.प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेव ला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिन...
कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टर
Article

कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टर

कोणताही क्लास न लावता अश्विनी झाली कलेक्टरमंगरूळपीर तालुक्यातील अश्विनीची यशोगाथा खरं म्हणजे आजकाल अत्रतत्र सर्वत्र स्पर्धा परीक्षा जे डबल इ नीट या परीक्षांचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होत आहे. मुलांची धाव कोचिंग क्लासकडे आहे. पण विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कोणताही क्लास न लावता कलेक्टर झालेली आहे. त्या मुलीचे नाव आहे अश्विनी धामणकर.अश्विनीने आपल्या आजोबाचे स्वप्न आय ए एस होऊन पूर्ण केले आहे. आपल्या नातीने आयएएस व्हावे असे आजोबांना वाटत होते. आणि त्यांचे जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अश्विनीने जीवाचे रान केले. तिचे शिक्षण वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथेच नाथ विद्यालयात झाले. पुढे बारावी करण्यासाठी ती लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा महात्मा गांधी विद्यालय मध्ये गेली .तिथे तिने बारावी केली. पदवी परीक्षा पास केल्यानंतर ...
पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी 
Article

पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी 

पारदर्शक सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयामध्ये त्यांचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ.श्रीकर परदेशी हे संपूर्ण सनदी अधिकाऱ्यांमध्ये एक पारदर्शक सनदी अधिकारी म्हणून परिचित आहेत. मुंबईच्या मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातच आपण मुख्य सचिव श्री विकास खारगे प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे यांच्या सोबतीला मुख्यमंत्र्यांनी ते उपमुख्यमंत्री असतानाच दिल्लीच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पी एम ओ कार्यालयात कार्यरत असणारे डॉ. श्रीकर परदेशी यांना मुंबईला मंत्रालयात आपल्या कार्यालयात सचिव म्हणून बोलावून घेतले.        डॉ. श्रीकर परदेशी यांचा माझा पहिला परिचय ते जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा पास झाले तेव्हा झाला. आम्ही2000 या वर्षापासून दरवर्षी आय ए एस झालेल्या अधिकाऱ्...
तरुणाईचा आदर्श  : विश्वास नांगरे पाटील 
Article

तरुणाईचा आदर्श  : विश्वास नांगरे पाटील 

तरुणाईचा आदर्श  : विश्वास नांगरे पाटील श्री विश्वास नांगरे पाटील आयपीएस  यांच्या सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड या गावात माझी गाडी शिरल्याबरोबर आम्ही समोर दिसणाऱ्या व्यक्तीला विचारले .विश्वास नांगरे पाटलांचे घर कोणते आहे ?  त्यांनी आम्हाला योग्य ती दिशा दाखवली. आमची गाडी त्यांच्या कुंपणाजवळ जाऊन थांबली. श्री विश्वास नांगरे पाटलांचे बंधू आमचे स्वागत करायला आले. तेव्हा त्यांचे  वडील घरीच होते .आम्ही त्यांचा चरण स्पर्श घेतला. ज्या चर्चा रंगल्या. या गोष्टी झाल्या. जेवण झाले. आमचे  M H 27 ही गाडी पाहून काही आजूबाजूचे लोक पण साहेबांच्या वाड्यावर आले. मला भेटले.      श्री विश्वास नागरे पाटलांनी जा ग्रंथालयात अभ्यास केला ते ग्रंथालय पाहण्याची आमची इच्छा होती. ती त्यांचे बंधू त्यांनी पूर्ण केली. आमदार श्री शिवाजीराव देशमुख यांनी विश्वास ...
आधुनिक लग्न, की लग्नाचा बाजार!
Article

आधुनिक लग्न, की लग्नाचा बाजार!

आधुनिक लग्न, की लग्नाचा बाजार!भारतात एका वर्षात विवाह सोहळ्यांवर खर्च होणारी रक्कम ही अनेक देशांच्या जीडीपीच्या वर गेली लग्न कार्याच्या निमित्ताने सग्यासोयऱ्यांच्या गाठीभेटी होतात, सुख-दुःखाचे वार्तालाप होतात, शेतमालाचे भाव, नवीन जाती, राजकारण, समाजकारण असे दहा- पाच वर्षापूर्वी होत असे. अलीकडे लग्न अडीच- तीन तास उशिरा लागतात, मग शुभमुहूर्त व लग्नतिथी आपण का काढतो हेच कळत नाही. ऑर्केस्ट्रा व डी जे (Orchestra and DJ)  च्या प्रभावामुळे कान बहिरे होतात व हृदयाचे ठोके वाढतात, ना कुणासोबत बोलणे ना ख्यालीखुशाली विचारता येत, ना कुठले फोन घेता येत. अलीकडे सर्व समाजात (मारवाडी, ब्राह्मण, गुजराती व सिंधी समाज याला अपवाद आहे.) चोरपावलांनी नकळत काही विकृत्या घुसल्यात. लग्नकार्यादी प्रसंगातील मांगल्य आणि पावित्र्य पार हरवले आहे. हौसेच्या नावाखाली केवळ उधळपट्टी व फक्त प्रदर्शनाने जागा घेतली.एका स...