📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

On: September 17, 2025 1:31 PM
आम्हाला फॉलो करा:
स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

बैठय़ा कामाचं वाढतं प्रमाण, व्यायामाचा अभाव तसंच आहारातील बदल या प्रमुख कारणांमुळे अलिकडेस्थूलतेची समस्या वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. खरं तर स्थूल असण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.

अनेक प्रकारचे कॅन्सर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, कोलेस्ट्रोल अशा अनेक विकारांचं मूळ स्थूलपणात आहे. भारताबद्दल बोलायचं तर सर्वच वयोगटात स्थूलतेचं प्रमाण वेगाने वाढतंय. जवळपास ३0 लाख भारतीय स्थूलतेने ग्रस्त आहेत. पुढच्या पाच वर्षात हे प्रमाण दुपटीनं वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याबाबत केलेल्या एका संशोधनात जगभरात दर वर्षी पाच लाख लोकांना स्थूलतेमुळे कॅन्सरची लागण होत असल्याचं आढळलं.

या संशोधनात १८४ देशांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २0१५ मध्ये तीन लाख ४५ हजार महिलांना स्थूलतेमुळे कॅन्सर झाला. पुरूषांमध्ये हा आकडा एक लाख ३६ हजार इतका होता. महिलांमध्ये रजोनवृत्तीनंतर होणारा स्तनांचा कॅन्सर, गर्भाशय आणि मोठय़ा आतड्याचा कॅन्सर तर पुरूषांमध्ये किडनी आणि मोठय़ा आतड्याच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलं. १९८0 नंतर जगात प्रौढांमध्ये स्थूलतेचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. म्हणूनच याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.

——————–

आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

-बंडूकुमार धवणे

संपादक गौरव प्रकाशन

जागतिक स्थूलता संकट: कारणे, परिणाम आणि उपाय


📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment