📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

On: August 16, 2026 8:30 PM
आम्हाला फॉलो करा:
तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या भेसळखोरांविरोधातील कारवाईमुळे चर्चेत आहेत. राज्यातील विविध ठिकाणी भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई होत असताना आता एका चिमुकल्याने थेट मुंढे साहेबांकडे आपल्या गावातील एका वेगळ्याच समस्येची तक्रार केली आहे. या चिमुकल्याचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये हा मुलगा तोंडाला लावल्या जाणाऱ्या मशेरी किंवा मिसरीकडे लक्ष देण्याची विनंती तुकाराम मुंढे यांना करताना दिसतो. आपल्या गावातील महिलांचा उल्लेख करत तो अगदी निरागस आणि मजेशीर पद्धतीने म्हणतो की, बायका तोंडात मिसरी भरतात आणि त्यानंतर गावभर लोकांची ‘मापं’ काढत फिरतात.

चिमुकल्याच्या बोलण्याची शैली आणि त्याचा आत्मविश्वास पाहून हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. namdev.patil.5015 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओमध्ये तो म्हणतो, “तुकाराम मुंढे साहेब… त्या मिसरीकडे सुद्धा लक्ष द्या. अहो, बायका तोंडामध्ये बुकणा भरतात मिसरीचा आणि मग सगळ्या गावाची मापं काढत बसतात.”

मशेरी म्हणजे नेमकं काय?

गावाकडील भागात काही ठिकाणी तंबाखू भाजून तयार केलेली पावडर दात घासण्यासाठी वापरली जाते. या पदार्थाला मशेरी किंवा मिसरी असे म्हटले जाते. काही लोक आजही टूथपेस्टऐवजी अशा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात.

मात्र तंबाखूजन्य पदार्थांचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे.

‘मुंढे साहेब, मुलाची तक्रार ऐका!’

अवघ्या 30 सेकंदांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही जणांनी चिमुकल्याच्या तक्रारीची गंमतीने दखल घेतली, तर काहींनी त्याच्या निरागस बोलण्याचे कौतुक केले.

“मुंढे साहेब, या मुलाच्या तक्रारीकडे लक्ष द्या,” अशा मजेशीर प्रतिक्रिया व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. तर काहींनी ‘गावातील बायका लाटणं घेऊन मागे लागतील’, अशी मिश्कील टिप्पणीही केली आहे.

भेसळविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर एका चिमुकल्याने थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केलेली ही मजेशीर मागणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!

अमरावतीतील ‘हर घर तिरंगा’ रॅलीत तिरंगा हातात घेऊन सहभागी झालेले विद्यार्थी, नागरिक आणि मान्यवर

अमरावतीत ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत भव्य तिरंगा रॅली; हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

कार आणि बाईक विमा क्लेमवर कडक तपासणी आणि बनावट विमा फसवणुकीविरोधातील कारवाई

कार-बाईक मालकांनो सावधान! बनावट विमा क्लेमवर आता कडक नजर; इन्शुरन्स कंपन्यांचा मोठा निर्णय.!

दूध भेसळखोरांवर मोक्का कारवाईच्या एकनाथ शिंदेंच्या सूचना

दूध-खाद्यपदार्थांत भेसळ करणाऱ्यांना मोठा इशारा! मोक्का कारवाईच्या सूचनेने भेसळखोरांचे धाबे दणाणले.!

कर्जतच्या कोंदिवडे गावात छत्रीचा माईक घेऊन रस्त्यांची पाहणी करणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनी

छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या ‘रिपोर्टर’; कर्जतच्या रस्त्यांची अशी केली पोलखोल.!