📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

देवीलाल रौराळे यांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीर

On: May 17, 2026 6:57 PM
आम्हाला फॉलो करा:
अमरावतीचे गझलकार आणि सामाजिक कार्यकर्ते देवीलाल रौराळे यांना विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार जाहीर
अमरावतीचे गझलकार आणि सामाजिक कार्यकर्ते देवीलाल रौराळे यांना विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार जाहीर

देवीलाल रौराळे यांना ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीर

गौरव प्रकाशन न्यूज अमरावती | प्रतिनिधी : अमरावतीतील प्रसिद्ध गझलकार, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते देवीलाल रौराळे यांना विश्वबंधुता साहित्य परिषद, पुणे तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘विश्वबंधुता प्रकाशदूत पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार येत्या २ जून रोजी पुणे येथील एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नविपेठ येथे आयोजित भव्य विश्वबंधुता कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

देवीलाल रौराळे हे अमरावतीचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. ते राईटवे फाउंडेशनचे अध्यक्ष असून सामाजिक, साहित्यिक तसेच व्यसनमुक्ती चळवळीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. गझल लेखनासोबतच उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ‘देवीलाल पब्लिसिटी’चे संचालक म्हणून जाहिरात क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.

हा पुरस्कार सोहळा विश्वबंधुता साहित्य परिषद, काषाय प्रकाशन आणि विश्वबंधुता मूल्य संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. बंधुताचार्य प्रकाशदादा रोकडे यांच्या सत्तरी पदार्पणानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान केला जात आहे.

या काव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कविवर्य चंद्रकांत वानखडे उपस्थित राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. अरुण आंधळे कार्यभार सांभाळणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितीत ॲड. प्रार्थना सदावर्ते, डॉ. वसंत बुगडे, डॉ. अशोककुमार पगाडिया, प्रा. शंकर आठरे आणि संगीता झिंझुरके यांची उपस्थिती लाभणार आहे.

दरम्यान, या पुरस्काराची घोषणा होताच अमरावतीसह विविध सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातून देवीलाल रौराळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

हे वाचा

MPSC परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झालेल्या सुप्रिया आडके

ग्रामीण शाळेपासून MPSCच्या यशापर्यंत; सुप्रिया आडके यांची जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

धामणगाव रेल्वे पंचायत समितीवर प्रलंबित विहीर व घरकुल अनुदानासाठी युवक काँग्रेसचे निवेदन

चार वर्षांपासून विहिरींचे पैसे रखडले; घरकुलाच्या हप्त्यांसाठीही लाभार्थी त्रस्त, युवक काँग्रेसचा पंचायत समितीवर मोर्चा

आर्थिक अडचणी असूनही मुलांचा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणारे वडील

केक नाही, पण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद; वडिलांच्या प्रेमाची कहाणी व्हायरल

तुकाराम मुंढेंना मिसरीबाबत तक्रार करणाऱ्या चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

मुंढेसाहेब, या ‘मिसरी’कडेही लक्ष द्या! चिमुकल्याचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जवाहर रोड अमरावती परकोटाच्या आतील भागात कचरा आणि अस्वच्छता

अमरावतीत वर्धापन दिनाचा उत्साह अन् परकोटाच्या आत कचरा; ‘बाहेरून सजावट, आत अस्वच्छता’चा विरोधाभास.!

दोन वर्षांच्या मुलासह कंपनीचा लॅपटॉप जमा करण्यासाठी गेलेल्या आयटी कर्मचाऱ्याचा व्हायरल अनुभव

कंपनीला कुटुंब समजण्याची चूक करू नका; 2 वर्षांच्या मुलासह लॅपटॉप देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा.!