सुधाकर कांबळे यांना आचार्य पदवी

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

पिंपळखुटा/ स्वाती इंगळे
    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलोडी (दारव्हा) येथील मुख्याध्यापक सुधाकर रा.कांबळे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा नुकताच राज्यशास्त्र या विषयात आचार्य पदवी बहाल केली आहे.

शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीचे डॉ.कुंवरलाल वासनीक यांच्या मार्गदर्शनाखाली “भारताच्या परराष्ट्रीय धोरणात अलिप्तवादी चळवळीचे चिकित्सक अध्ययन” या विषयावर संशोधन करून ही पदवी प्राप्त केली आहे.प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर कांबळे यांनी आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नासिक आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केले आहे.तसेच त्यांनी राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र व इंग्रजी या विषयात प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता नेट सेट या परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केल्या आहेत.डॉ. सुधाकर कांबळे यांच्या या यशाबद्दल विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीचे संचालक डॉ.सतीश माळोदे,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रतिभा भोरजार, डॉ.के.एच.वासनिक,डॉ. सुनील इंगळे,डॉ.प्रमोद तालन,डॉ. पंकज नंदेश्वर,एड.डॉ.पवन तायडे,डॉ.सुमित वाघमारे, श्याम कोरांगे, आशिष गवार यांच्यासह आप्तस्वकीय,मित्र परिवार यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा


    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलोडी (दारव्हा) येथील मुख्याध्यापक सुधाकर रा.कांबळे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा नुकताच राज्यशास्त्र या विषयात आचार्य पदवी बहाल केली आहे. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीचे डॉ.कुंवरलाल वासनीक यांच्या मार्गदर्शनाखाली “भारताच्या परराष्ट्रीय धोरणात अलिप्तवादी चळवळीचे चिकित्सक अध्ययन” या विषयावर संशोधन करून ही पदवी प्राप्त केली आहे.प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधाकर कांबळे यांनी आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नासिक आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली विद्यापीठातून पूर्ण केले आहे.तसेच त्यांनी राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र व इंग्रजी या विषयात प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता नेट सेट या परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केल्या आहेत.डॉ. सुधाकर कांबळे यांच्या या यशाबद्दल विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीचे संचालक डॉ.सतीश माळोदे,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रतिभा भोरजार, डॉ.के.एच.वासनिक,डॉ. सुनील इंगळे,डॉ.प्रमोद तालन,डॉ. पंकज नंदेश्वर,एड.डॉ.पवन तायडे,डॉ.सुमित वाघमारे, श्याम कोरांगे, आशिष गवार यांच्यासह आप्तस्वकीय,मित्र परिवार यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Leave a comment