मुलांच्या खोलीतल्या फर्निचरची खरेदी करताना काही बाबींची नोंद घ्यायला हवी. मुलं सतत धावत-पळत असतात. दंगा करत असतात. हे लक्षात घेता फर्निचर तकलादू नव्हे तर मजबूत असायला हवं. त्यामुळे मुलांकडून त्याचं नुकसान संभवणार नाही. फर्निचरने मुलांच्या खोलीतली कमीत कमी जागा व्यापावी. यामुळे मुलांना खोलीत मोकळेपणाने वावरता येईल आणि धडकून इजा होण्याची शक्यताही कमी होईल. मुलांच्या खोलीतील फर्निचरचे कोपरे गोलाकार आणि गुळगुळीत असावे. त्याचबरोबर दरवाजे, खिडक्या, कपाटं यांच्या खट्ट्या सहज उघडतील अशा असाव्या.
Related Stories
September 3, 2024