तुका
अगा पंढरीच्या देवा
आता खरं खरं बोला
बया आवलीचा तुका
कैसा वैकुंठासी गेला ?
देह तुकियाची पंढरी
आत्मा होता पांडूरंग
का सांडिलासी विठ्ठला
माझ्या तुकियाचा संग !!
सांग सांग देवा तूच
कैसे आले रे विमान
न सांगताच जनाशी
गेले तुक्यास घेऊन !!
अगा देवा बा विठ्ठला
असे मज गा संदेह
गेला स्वर्गी तुका माझा
असा कसा रे सदेह ?
साऱ्या संसाराचा सार
नामा तुक्याचे अभंग
जन उद्धाराया लागी
हवी तुक्याचिया संग !!
माय माऊली वैष्णवा
तुची वैकुंठीचा राणा
माझ्या तुक्यास एकदा
सदेह ईहलोकी आणा !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सेनि.सपोउपनि महा.पोलिस
अकोला 9923488556