मुखवटे
कुणा काहीच कळेना
कोण खरे कोण खोटे
सारे घालून फिरती
सभ्यतेचे मुखवटे !!
सातारा लुटून काही
दानं करती पुण्याला
धर्म धर्मात्मा लुटारू
सांगा म्हणावे कुणाला ?
पाषानी प्राण फुंकती
वेदश्री महंत मोठे
शुद्रांचे मुखात यांचे
कमल पद अंगठे !!
रुग्णांची लूट करती
धन्वंतरी मोठं मोठे
कलियुगी हे कसाई
असती हे देव खोटे !!
गाऊ कसे मी कोणत्या
गुणगान त्या गुरुचे
शिक्षण, धार्मिक संस्था
संस्थानिक लुटारुंचे !!
झालेत देशात मोठे
ईमान विकून काही
मतलबी मुखवटे
बदनाम लोकशाही !!
चला शोधूया आपण
हे हरामी मुखवटे
करू बेनकाब सारे
भ्रष्ट, द्रोही मुखवटे !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556