![](https://www.gauravprakashan.com/wp-content/uploads/2024/03/IMG_20240326_092842.jpg)
महाकवी ग्रेस स्मृतिदिन
ग्रेस तुझ्या कविता
म्हणजे दुःखाचा झरा..
वेदनेला आठवून व्हायचा
तुझा प्रतिदिन साजरा..
चंद्र माधवीच्या प्रदेशात
तुझ ते अलगद जाणं
जणू डोळ्यात स्वप्न घेऊन
वाऱ्यावर स्वार होणं..
पावसाची ती रिमझिम
तूच फक्त वर्णावी..
दुःखाची महती शब्दात
तूच फक्त जाणावी..
काळजाच्या तुझ्या कोनाड्यात
अश्रूच होते मुक्कामी…
निसर्ग हाच सखा
वेदनाच तुझ्या आश्रमी..
तुझ ते व्यक्त होणं जणू
शब्दांनाही कोडं पडावं..
क्षितीजा पल्याडच जग
तुझ्या रंगात रंगून जावं
सुजाता पुरी