Sunday, October 26

Tag: Article

आमचाही एक जमाना होता.!
Article

आमचाही एक जमाना होता.!

आमचाही एक जमाना होताबालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.पास / नापास हेच आम्हाला कळत होतं... टक्केचा आणि आमचा संबंध कधीच नव्हता.शिकवणी लावली, हे सांगायला लाज वाटायची.... कारण  "ढ" असं हीणवलं जायचं...पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो, असा आमचा दृढ विश्वास होता...कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं.दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा...वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. आई ...
आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?
Article

आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?

आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?आई-वडीलांना ‘तुम्ही आमच्यासाठी काय केलं ?असा प्रश्न विचारण्याच्या आधी थोडा या गोष्टींचा विचार करा 'आई-वडील' हे दोन शब्द ऐकले की मनात एक वेगळाच भाव उमटतो. आपण कोणत्याही वयाचे असू, कितीही मोठे झालो तरी, आई-वडीलांसाठी आपली जागा कधीही बदलत नाही. परंतु कधीकधी, परिस्थितीच्या रेट्यामुळे किंवा आपल्या धकाधकीच्या जीवनामुळे, आपल्याला असे वाटू शकते की आपल्या आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं? हे विचारताना त्यांच्या कष्टांचा आणि त्यागाचा आपल्याला विसर पडतो.त्यामुळे हा लेख लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे, आपण त्या क्षणांची आठवण ठेवावी आणि त्याचं मोल समजावं. आईच्या पोटातून जन्म घेताना आपल्या आईला किती यातना सोसाव्या लागल्या असतील, आपण तिला काय काय दुःख दिलं, ते आपल्याला कधीच आठवत नाही. पण ती आई, जिचं शरीर, मन, आत्मा आपल्यासाठी पूर्णपणे बदलतं, तिने केलेला तो पहिला त्याग आपण...
तुला नाही जमणार हे गाणं.!
Article

तुला नाही जमणार हे गाणं.!

तुला नाही जमणार हे गाणं.!   तुला नाही जमणार हे गाणं. पंचवीस-तीस चाली झाल्या. आजच्या कोयना एक्सप्रेसने जा तू मुंबईला. मी बघतो या गाण्याचं काय करायचं ते." असा सणसणीत अपमान झेलून त्यांनी कोल्हापूरातला गाशा गुंडाळला आणि मुंबैला जायला निघाले...मनात प्रचंड कल्लोळ-घुसमट-कालवाकालव आणि गाण्याचे बोल... मुंबैला पोहोचेपर्यन्त एक लै भन्नाट चाल सुचली... आल्यापावली परत फिरला हा कलंदर ! परत कोल्हापूर गाठलं आनि दिग्दर्शक शांतारामबापूंना ती चाल ऐकवली...  "दे रे कान्हा S दे रे चोळी अन् लुगडी.." !!! शांतारामबापूंनी खूश होऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली ! तो महान संगीतकार होता 'राम कदम'. चित्रपट , अर्थातच 'पिंजरा' !   आज मी सिनेमा-नाट्यक्षेत्रात काम करतो. आजच्या पिढीतल्या एका सहकलाकारानं मला "किरण माने सर, हे 'राम कदम' कोण?" असं विचारलं होतं, तेव्हा खुप वाईट वाटलं होतं... त्यांच्या एकेका गाण्यात मायणीमधल्या माझ्य...
दुनिया फक्त विश्वासावर चालते.!
Article

दुनिया फक्त विश्वासावर चालते.!

दुनिया फक्त विश्वासावर चालते.!आळेफाटा ते करमाळा प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक मॅडम बसल्या होत्या.चार तासांचा प्रवास होता. लेडीज बाजूला असल्यानंतर जरा अवघडल्यागत होतंच.दोन तास होऊन गेले.छोट्या छोट्या स्टँडवर गाडी थांबत होती.प्रवासी उतरत होते,चढत होते.आणि मला तहान लागली होती.गाडी मिरजगाव स्टँडला थांबली.एक वडापाव विकणारा माणूस खिडकीजवळ येऊन ओरडायला लागला..”गरमा गरम वडापाव.” मला पाणी हवं होतं पण त्याच्याकडे फक्त वडापाव होते.मी त्याला म्हणलं “पाण्याची बाटली नाहीय का दादा?” त्यावर तो बोलला “नाहीय भाऊ.पैसे द्या मी आणून देतो लगेच.” मी पटकन त्याला वीस रुपये दिले.आणि तो वीस रुपये घेऊन गर्दीतून वाट काढत बाटली आणायला निघून गेला.माझ्या बाजूला बसलेल्या त्या मॅडम मोठ्याने हसल्या आणि म्हणाल्या, “गेले तुमचे वीस रुपये.” आणि त्या पुन्हा हसायला लागल्या.मी म्हणलं, “तो पाणी घेऊन येईल.” त्या पुन्हा हसत ...
Article

अनाथांची नाथ बोहणी.!

अनाथांची नाथ बोहणीउत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असा पूर्वीचा काळ होता, काळ बदलत गेला तसं उत्तम नोकरी व कनिष्ठ शेती असा बदल झाला, पण व्यापार तेव्हाही मध्यम होता आणि आजही मध्यमच आहे मग व्यापारी तो कोणताही असो अगदी छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत चहाच्या टपरी पासून ते मोठ्या दुकानदारापर्यंत, रस्त्यावरील भाजीवाल्यापासून ते मोठमोठ्या मार्केटमधील व्यापाऱ्यापर्यंत हा मध्यम दर्जातच येतो. याच प्रत्येक व्यापाऱ्याची दुकानदाराची रोजची कमाई असते त्यांना मासिक पगार नसतो. रोजच्या रोज होणारी कमाई त्यालाच काही लोक ताजा पैसा बोलतात, त्याच ताज्या पैशातून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात रोज सकाळी दुकान उघडलं की देवपूजा करतात अगरबत्ती लावतात देवाला दिवा लावतात, मनोभावे दर्शन घेतात त्यानंतर वाट बघतात ते गिऱ्हाईकाची, पहिले गिऱ्हाईक आले की वस्तू किंवा जो काही माल देतात आणि पैसे घेतात, ते पैसे हातात घेऊन दु...
पिक्चर रस्त्यावरचा…
Article

पिक्चर रस्त्यावरचा…

पिक्चर रस्त्यावरचा...आमच्या मित्राने पडद्यावरच्या पिक्चर संदर्भातील फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 40 वर्ष मागे भूतकाळात गेले.असंख्य आठवणींचा कल्लोळ झाला.साले काय दिवस होते. . माझे जे अनुभव आहेत तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील त्यांच्यासाठी खास हा लेख आमच्या लहानपणी तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्रो हा रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो ते. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. .मुख्य म्हणजे फुकट असायचे मंडळातर्फे खर्च करायचे. दिवसा सायकलवर फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे.आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या.मग तारीख लक्षात ठेऊन जायचो आणि विसरलो की हळहळ वाटायची. एका द...
आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !
Article

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं ! आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ? मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ? पाठीवरून हात कुणी फिरवायचा ? निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची .... थोडक्यात काय तर दोघांपैकी एकजण गेल्यानंतर मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे ! लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतातहे वाचा – पिक्चर रस्त्य...
दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी
Article

दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी

दोस्ती ; रामू आणि मोहन यांची कहाणी दोस्ती हा १९६४ सालचा भारतीय कृष्ण-धवल हिंदी चित्रपट असून सत्येन बोस दिग्दर्शित आहे आणि राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ताराचंद बडजात्या निर्मित आहे. ह्यात सुधीर कुमार सावंत आणि सुशील कुमार सोम्या मुख्य भूमिकेत होते आणि ही गोष्ट आहे दोन मुलांमधील मैत्रीची ज्यात एक अंध आणि दुसरा अपंग आहे. दोस्ती १९६४ सालच्या पहिल्या १० सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याला "सुपर हिट" म्हणून घोषित करण्यात आले. हा ४ थ्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झाला. १९७७ साली हा चित्रपट तेलुगू भाषेत स्नेहमच्या रूपात पुन्हा तयार करण्यात आला होता.दोस्ती ही रामू (सुशील कुमार) आणि मोहन (सुधीर कुमार) यांची कहाणी आहे. रामूचे वडिलांचा कारखान्यात काम करताना अपघातात मृत्यू होतो. जेव्हा कारखानदार नुकसान भरपाई देण्यास नकार देत, त्याच्या आईचा मानसि...
कादरीचा पिंपळ
Article

कादरीचा पिंपळ

कादरीचा पिंपळनारळ फोडले, प्रसाद वाटला, दुकानाचे उद्घाटन झाले, उद्घाटक होते परमपूज्य ब्रह्मानंद स्वामीजी महाराज आणि दुकानाचे नावही त्यांचे दिले होते ते म्हणजे " श्री ब्रह्मानंद स्वामी जनरल स्टोअर्स" दुकानाचे मालक होते जगन्नाथ भिवाजी वाघ, पण त्यांना दोडी गावांमध्ये टोपण नावाने जास्त ओळखले जाते ते म्हणजे 'कादरी'.सुरुवातीला त्यांचा टेलरिंग व्यवसाय होता त्यातून त्यांचं जगणं शिवत गेलं कधी उसवतही गेलं, फाटलेल्या आयुष्याला ठिगळं लावणं आणि ठिगळं लावत आयुष्य जगणं हेच तर टेलरचं खरं आयुष्य असतं, त्यातच मंडपाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला, हळूहळू व्यवसाय मोठा होत गेला, गावोगाव मंडप जाऊ लागला, नाव मोठं होत गेले, त्याकाळी मंडप व्यवसायात जिल्ह्यात मोठे नाव होते ते म्हणजे नाशिक येथील कादरी यांचा मंडप, आता दोडी गावात जगन्नाथ वाघ यांना त्यांचे नाव न घेता कादरीचा मंडप असे बोलले जाऊ लागले.बत्तीस वर्षांपूर्...
वनवाश्या ( वनाश्या )
Article

वनवाश्या ( वनाश्या )

वनवाश्या ( वनाश्या ) दरवर्षी बैल पोळा आला की घरातल्या सर्वांना एकच बैल आठवतो तो म्हणजे "वनाश्या". अजूनही बैलपोळ्याला त्याला बांधत असलेली घुंगर माळ तशीच जपून ठेवली आहे. घुंगरमाळीला आता मात्र गळा वेगळा दिसत असतो. जशी वनाश्याच्या गळ्याला ती घुंगरमाळ शोभायची ना तेव्हढी अजून एकही बैलाला ती शोभली नाही. वाट पाहतोय मी त्या गळ्याची अन त्या वनवाश्याची ही. त्याच्या नावाला कारण ही तसच होतं. तो ज्या परिस्थितीत वाढला त्यानुसारच त्याच नाव "वनवाश्या" ठेवलं होतं आजोबांनी. आजोबांच्या काळात आमच्या घरी खूप गावरान गाया असायच्या. मला आठवतंय तेव्हा पासून तरी कमीतकमी आठ ते दहा गावरान गाया हमखास असायच्या घरी. पण वडील गेल्यापासून त्यांना सांभाळायला कोण नव्हतं म्हणून कमी झाल्या. आत्ता फक्त एकच गावरान गाय राहिली आहे गोठ्यातल्या दावणीला. वनाश्या हा घरच्याच गावरान गाईच्या पोटी जन्माला आलेला. पण दुर्दैवाने काही दिवसातच ...