Monday, October 27

Tag: Article

मधमाशी चावल्यावर काय होतं?
Article

मधमाशी चावल्यावर काय होतं?

मधमाशी चावल्यावर काय होतं?डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्ती पासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते.तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुई सारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्या बरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो.असं करत ते सुईला कातडी पार करून ...
जागतिक पुरुष दिन…
Article

जागतिक पुरुष दिन…

 जागतिक पुरुष दिन...       खरं तर हा दिन असायलाच हवा.. जरी महिला दिनाइतका त्याचा उदोउदो झाला नाही तरीही प्रत्येक स्त्रीच्या मनात त्याच्या बद्दल आदर हा असायलाच हवा.. आईने आपल्या नवऱ्याचा आदर केला तर मुलगीही तिच्या नवऱ्याचा आदर करेल..  पुरूष वाईटच अशी कुठलीही वक्तव्ये मुलीसमोर करु नयेत नाहीतर लहानपणीच तिच्या मनात पुरुष वाईट ही संकल्पना बिंबवली जाते.. पुरूष वाईट असेल तर मग आपला  मुलगाही वाईटच.. आपला भाऊही वाईटच या सगळ्याचा सारासार विचार करुन आपण घरात किवा समाजात बोलावं..       मी लहानपणापासूनच पुरुषांमधेच वाढले , खेळले , बागडले.. आमच्या घरात पुरूषच पुरूष .. अगदी आजोबा बाबा काका भाऊ सगळेच मित्र.त्यांचे मित्र हेही माझे मित्र.. शाळेतही मित्र आणि कॉलेजमधेही मित्रच.. आणि आता तर मी रोज पुरुषांमधेच असते.. माझ्या आठवणीत एकाही पुरुषामुळे मला एकदाही कसलाही त्रास झाला नाही अगदी सोशल मिडीयावर सुध्दा ...
हिवाळ्यात आवर्जून खा बाजऱ्याची भाकरी
Article

हिवाळ्यात आवर्जून खा बाजऱ्याची भाकरी

हिवाळ्यात आवर्जून खा बाजऱ्याची भाकरी...   हिवाळा हा ऋतु खाण्या-पिण्याची मजा असणारा मानला जातो. या दिवसांमध्ये वेगवेगळे पौष्टिक पदार्थ, फळं-भाज्या खाऊन तुम्ही तब्येत चांगली बनवू शकता. पण हिवाळ्यात आरोग्यासंबंधी अनेक समस्याही होतात. आपलं पचनतंत्र योग्यपणे काम करू शकत नाही. अशात ही समस्या दूर करण्यासाठी एक उपाय करू शकता. हिवाळ्यात तुम्ही नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे...   * पचनक्रिया सुधारते... या थंडीच्या दिवसात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. बाजरीच्या भाकरीने पचनक्रियेत खूप सुधारणा होते. त्याशिवाय अपचन, बद्धकोष्टता आणि पोटदुखीसारख्या समस्याही दूर होतात.   * इम्यूनिटी बूस्ट करा... जर तुम्हाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल तर भाकरी करताना त्यात हिंग, लसूण आणि काळं मीठ टाका....
हिवाळ्यात लहान मुलांना होणारा न्यूमोनिया घातक असू शकतो !
Article

हिवाळ्यात लहान मुलांना होणारा न्यूमोनिया घातक असू शकतो !

हिवाळ्यात लहान मुलांना होणारा न्यूमोनिया घातक असू शकतो !   मुलांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य रोगांपैकी एक म्हणजे न्यूमोनिया (Pneumonia). हा आजार कधीकधी खूप लवकर बरा होतो तर तर कधी कधी हा फार गंभीर होतो. हा आजार कोणत्याही ऋतूत होऊ शकतो, परंतु हिवाळ्यात त्याचा धोका वाढतो. कारण हिवाळ्यात आर्द्रतेमुळे जीवाणू झपाट्याने वाढतात, ज्यामुळे संसर्ग होतो. वेळीच काळजी न घेतल्यास हा आजार लहान मुलांसाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे फक्त सर्दी आहे असे समजून त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.   न्यूमोनिया कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो, परंतु हा आजार ५ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये अधिक धोकादायक असतो. वेळेवर लक्ष न दिल्यास न्यूमोनियामुळे मुलांच्या फुफ्फुसात संसर्ग वाढतो, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी घसरते. अनेक वेळा यामुळे अनेक मुलांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे काही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा...
हिवाळ्यात पांढरे तिळ खाण्याचे फायदे.! 
Article

हिवाळ्यात पांढरे तिळ खाण्याचे फायदे.! 

हिवाळ्यात पांढरे तिळ खाण्याचे फायदे.!    जर तुम्ही थंडीच्या काळात वारंवार आजारी पडत असाल आणि सतत थकवा जाणवत असाल तर तुम्ही पांढरे तीळ नियमित खावेत. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहील. हिवाळ्यातील लोक सर्वात जास्त आजारी पडतात. खरे तर थंडीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेक प्रकारचे मौसमी आजार होतात.   अशा परिस्थितीत उष्ण स्वभाव असलेले पांढरे तीळ हिवाळ्यात खूप फायदेशीर असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पांढरे तीळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत असते तेव्हा सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या समस्या दूर राहतात. पांढरे तीळ पोटासाठी खूप चांगले असल्याचे सांगितले जाते. थंडीच्या वातावरणात पचनक्रियाही कमकुवत होते.   अशा स्थितीत एसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आदी समस्या उद्भवू लागतात. पांढऱ्या तीळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आ...
दिवाळी येता आठवतो मोती साबण.!
Article

दिवाळी येता आठवतो मोती साबण.!

मोती साबण..!   सत्तरच्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने मोती साबणाची निर्मिती केली. हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता. चौकोनी वड्यांच्या आकारात येणाऱ्या साबणांच्या काळात मोती आकाराने मोठा आणि गोल होता. हा आकार त्याला जाणीवपूर्वक देण्यात आला होता. गुलाब, चंदन सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवाती पासून शाही थाट दाखवला. त्याची २५ रु किंमत त्या काळाच्या तुलनेत अधिक होती.   या साबणाने सतत स्वत:ला उच्च आवडी निवडीशी, दिव्यानुभवाशी आणि मोती या संकल्पनेशी जोडून ठेवलं. ऐंशीच्याा दशकातील मोतीच्या छापील जाहिरातीत समुद्रकिनारी भल्यामोठ्या शिंपल्यात विराजमान मोती साबण कित्येकांना आठवत असेल. एकूण हा साबण बऱ्यापैकी लोकप्रिय होता. मात्र १९९३ साली टॉमको कंपनी हिंदुस्थान लिव्हर कंपनीत समाविष्ट झाली आणि हिंदुस्थान लिव्हरने हा साबण विशिष्ट प्रसंगी वापरायलाच हवा अशा मंगल, उत्सवी, पवित्र संकल्पनेशी जोड...
नोकरी आणि कुटुंबाची जडणघडण
Article

नोकरी आणि कुटुंबाची जडणघडण

नोकरी आणि कुटुंबाची जडणघडणसध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. आज वाढलेली भस्मासूर महागाई पती-पत्नी दोघांनाही संसार सुखाचा करण्यासाठी नोकरी करण्यास प्रवृत्त करते. मानवी गरजा वाढल्या आहेत. जीवन सुखी समाधानी असावे या आशेने नोकरी करणे आज काळाची गरज आहे. नोकरी करणारा पुरुष घर सोडून जाताना त्याच्या जबाबदाऱ्या बऱ्याच अंशी घर सोडल्यानंतर संपतात पण, एका स्त्रीला घरात असताना व घरात नसताना दोन्ही ठिकाणी आपल्या जबाबदाऱ्या अगदी सावधगिरीने पूर्ण कराव्या लागतात.घरात वडीलधारी मंडळी सासू-सासरे असले तर त्यांच्या गरजा काय आहेत?  त्या  पूर्ण केल्याशिवाय, स्वयंपाक केल्याशिवाय तिला घर सोडता येत नाही. त्यावेळी तिच्या संयमाची फार मोठी परीक्षा सुरू असते. तिने कितीही मोठा पगार जरी घरात दिला तरी त्या पगाराबरोबर, तिची त्यागी वृत्ती तिला द्यावी लागते. तिला प्रत्येकाच्या गरजांसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. तरच कुटुंब आ...
आरोग्यम धनसंपदा..
Article

आरोग्यम धनसंपदा..

आरोग्यम धनसंपदा..रोजच्या सवयीनुसार साडेपाच वाजता रनींगला निघाले आणि रोजचा रस्ता भयावह दिसला...  रस्त्यावर पडलेले फटाक्यांचे बॉक्सेस , प्लॅस्टिक पिशव्या ,  जळालेले फटाके सगळं पाहुन सफाई कामगार डोळ्यासमोर आले..  आपण चार दिवस सुट्टी घेउन दिवाळी साजरी करणार आणि ते आज आपण केलेली घाण साफ करणार... त्यांच्या सुट्टीचं काय ??त्यांच्या आरोग्याचं काय ??....गणपती , दिवाळी हे सण आपण साजरे करतो आणि त्याचा त्रास प्राणी , पक्षी म्हणजेच पर्यायाने निसर्गाला होतो..प्राणी घाबरून लपुन बसतात .. फटाक्यातुन पडणारं केमिकल्स प्राणी , पक्ष्यांच्या पोटातही जाऊ शकतं.. हजारो रुपयांचा चुराडा आणि एकीकडे अनेक लोक उपाशी किती विरोधाभास..  खरं तर आपण सण साजरे करण्यामागची कारणेच कधी जाणुन घेत नाही.. लक्ष्मी पूजन म्हणजेच धनाची पूजा म्हणजेच आरोग्याची पूजा.. कुटुंब नातेवाईक मित्र परिवार यांनी एकत्र येउन गप्पा ,,शेअरिंग केअरिं...
जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे.!
Article

जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे.!

जाणून घ्या पाणी पिण्याचे फायदे.!उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे आहे. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. अशात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्यायले पाहिजे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्या सोबतच पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.* नियमित पाणी पिण्याचे फायदे ◆ आपण अनेक तास कामाच्या गडबडीत पाणी न पिता राहतो. उन्हाळ्यात अनेकांना प्रचंड घाम येतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवू शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते. प्रत्येकाने सकाळी उठल्यावर विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात पाणी प्यावे, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. ◆ सकाळी उठून सर्वप्रथम पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. तसेच पोटातील आम्ल शांत होण्यास मदत होते आणि स्टोन बनत नाही. ◆ सकाळी उठल्या बरोबर कमीत कमी दोन ग्लास ...
आई-वडील..!
Article

आई-वडील..!

आई-वडील..!मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला...अगं... छान लापशी बनव,तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..! आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली,"बघुया मला दाखवा." इतक्यात,मुलगा पटकन बोलला ,"बाबा तिला कुठे Result दाखवताय?तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!"भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली.मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले,"हो रे...! ते पण खरच आहे."तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुदृढ व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती अशिक्षित होती ना...तुला सकाळी सात वाजता शाळेत जावं लागायचं म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची. अशिक्षित होती ना...तु रात्री अभ्यास करता क...