डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरआपल्या भारत देशाचा इतिहास महान आहे. ह्या पवित्र भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशातील बांधवांसाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्या महान कार्याचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा त्या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व आई भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी इंदूर जिल्ह्यातील महू या गावात झाला. रामजी वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले होते. त्यांना स्वतःला वाचनाची आवड असल्याने घरात ग्रंथसंग्रह होते. त्याच बरोबर मुलांना ही चांगली पुस्तके ते आणून द्यायचे. त्या कारणाने बाबासाहेबांना वाचनाची, अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय लागली असावी.हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य ...









