समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतीबा फुले यांचे लेखन कार्य
समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेत ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राजे सयाजीराव गायकवाड, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि एकूणच आपण जेव्हा समाजअग्रणीचा बिचार करतो तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव घेणे व त्यांच्याविषयी जाणून घेणे हे क्रमप्राप्तच ठरते.
भारत देश हा वर्णव्यवस्था, चातुर्वर्ण समाजधिष्ठीत व्यवस्थेचा गुलाम झाला होता आणि त्यामध्ये असणारी जातीयतेची उतरंड यामध्ये खालच्या जातीतून वरच्या जातीत जाण्याची कोणतीच सोय नव्हती. हा देश संपूर्णत: वर्णवादाच्या, वर्णभेदाच्या चौकटीत विलीन झाला होता. या वर्णवादी उतरंडेत अस्पृश्य, स्पृश्य यांच्यात वर्तणूक, चालीरिती, अपमानित करणारी, पदोपदी छळणारी ही अमानवीय वागणूक दिल्या जात होती. अपरिमित उच्चकोटीची छळवणूक त्यांची दाहकता अक्षरश: जातीजातीचा वणवा संपूर्णत: या देशात फेर धरून नाचत होता. ब्राम्हणशाही, पुरोहितशाही पेशवेकालीन काळातील दुसरा बाजीराव पेशवा यांचे काळात तर अत्यंत हीन पातळीची वागणूक होती. त्याला काय म्हणावे, नैसर्गिक अधिकाराचे हनन केल्या जात होते. सार्वजनिक पानवठे, रस्त्याने चालने, स्वतंत्रपणे वावरणे अशी विदारक व्यवस्था भारतामध्ये अस्तित्वात होती. या बाबीचा परामर्श घेतांना महात्मा फुले यांच्या एकूणच कार्यशैलीचा लेखनात्मक प्रभाव समाजमनावर पडताना दृषिक्षेपात येतो. त्यांच्या लिखानाचे चातुर्य अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीत आहे. त्यांची मांडणी अत्यंत यथोचित आहे. त्याबाबत आपण त्यांच्या अर्थात महात्मा फुले यांच्या साहित्याचा लेखाजोखा संक्षिप्त स्वरुपात मांडणी करतो.
महात्मा फुलेंनी जे ग्रंथ लिखाण केले, त्यांच्या लिखानाची भाषाशैली ही तत्कालिन भाषाशैली होती. ज्योतिरावांची भाषा रांगडी, तिखट होती, स्पष्टोक्ती आहे. त्यांच्या भाषेमध्ये क्रांतिकारक तत्त्वाची मांडणी आहे. लेखणी धारदार बोचरी आहे. निबंधमालाकारांच्या त्यांच्या टिकेत मिळते.
महात्मा फुलेंनी तृतीय रत्न नाटक सन १८५५ मध्ये लिहिले. त्यामध्ये त्यांनी रूपकात्मकपणाची निर्मिती केली. जसे जोशीबाई, विदुषक या पात्राद्वोे त्यांनी ब्राम्हणांची खोटे भ्रामक समजुती, भोळ्या भाबड्या लोकांच्या मनावर सतत बिंबवत ठेऊन त्यांची मानसिकता ओळखून अत्यंत हीन दर्जाची लवाडी केली. विदुषक मात्र प्रश्न मांडून ते नाटक सरकवीत पुढे जातो. ब्राम्हणाने इतरशुद्र व अतिशुद्र जातीवर केलेली विद्याबंदी उठवून त्यांना शिकुन शहाने करण्याकरिता ईश्वराने या देशात इंग्रजांना पाठविले आहे.
शुद्रातिशुद्र शिकून शहाने झाल्यानंतर ते इंग्रजांचे उपकार विसरणार नाहीत. मग पेशवाई पेक्षा शंभर पटीने इंग्रजी राज्य पसंद करतील. पण ते पुढे पण मोगलाप्रमाणे इंग्रजलोक या देशातील प्रजेला छळतील तर विद्या शिकून शहाने झालेले अतिशुद्र लोक पूर्वीपेक्षा पूर्वी शुद्रात झालेल्या जहामर्द छत्रपती राजे शिवाजी प्रमाणे आपले शुद्राति राज्य स्थापन करून अमेरिकेतील लोकांप्रमाणे आपला राज्य कारभार पाहतील. पण भटांची ती दृष्टी व नष्ट पेशवाई आता या देशावर कधीच येणार नाही हे या जोशीबुवांनी पक्के ध्यानात ठेवावे. आणि तसेच जी इशवरपरापती भंग झाला नाही हे सुद्धा ते तुम्हा शुद्रास कोठून करून देतील या प्रमाणे जी मंडळी तृतीय रत्न नाटकात येते ती म्हणजे हाया नाटकातील ‘विदूषक’ दुसरा तिसरा कुणी नसून ते प्रत्यक्ष समाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुलेच होत. त्यांनी सांगितले या वेदावर, धर्मावर एकूणच ब्राम्हणी, मनूवादी व्यवस्थेवर ज्यांची दारोमदार आहे त्यांनाच तर ईश्वरप्राप्ती होत नाही मग तुम्ही तर शुद्राती शुद्र आहात. तुम्हास ते ब्राम्हण कसे करून देतील.
यातूनच त्यांनी नाटकाला त्रीसूत्रीत गुंफून ही व्यवस्था ब्राम्हण त्यातला ब्राम्हणांचा खरेखोटेपणा, दांभिकता यातून प्रकर्षाने पहावयास मिळते. विद्येचे द्वार सर्वांना खुले असतांना सुद्धा या ब्राम्हणी लबाड्या या कलीयुगात बाहेर येतीलच. असे ब्राम्हणांना सतत वाटत असे. म्हणून त्यांना इतरांनी विद्या ग्रहन करू नये असा त्यांचा कटाक्ष होता. जोशी बरुवा कसे वेळोवेळी लबाड पद्धतशीरपणे लाटतात. एके ठिकाणी विदूषक म्हणतात त्या बाईच्या नवऱ्यानं बाबा घाबरा होऊ नको, तुम्ही सर्व माळ्या कुणब्यानी पण महार मांगांनी सुद्धा ब्राम्हणांचे किमयी भासवे रूप धरू नये. ईश्वराने तुमच्या देशात इंग्रजांना आणले, तुमच्यावरील संकटे दूर करतील. एकूणच या तृतीय रत्न नाटकातील पात्रे रंगविले आहेत.
पात्रे उभी केली आहेत. ती मोठ्या ताकदीची पात्रे आहेत. समाज परिवर्तनाला अनुरूप अशी मांडणी त्यामध्ये दिसून येते. तसेच या समग्र नाटकात जो विदूषक आहे तो वेळोवेळी बाईच्या नवऱ्याचे उपदेशपर डोस देतो. ते खरे वास्तवरूप नाटकातून अधोरेखित होते. एक शिक्षणाचा संदेश देतो ही ईश््वरव्यवस्था त्यातून कशी केंद्रीत होते. शिक्षणाने माणूस कसा मोठा होतो, इंग्रजांनी शाळा काढल्या. सर्व राज्यात त्या निर्माण झाल्या व त्याचा फायदा सर्व शुद्रातिशुद्रांनी घ्यावा ही सुद्धा त्या मागची संकल्पना नाटकातून मुखत्यारित होताना दिसते.
रात्रीची शाळा प्रौढांकरिता काढणे याचाच अर्थ सर्वांनी शिक्षण घ्यावे, शिक्षणावाचून विकासाचा मार्ग दिसत नाही. हे अज्ञान दूर होणार नाही. याप्रमाणे त्यांनी शैक्षणिक परिवर्तन केले आहे. तसेच महिलांकरिता १८४८ मध्ये जी शाळाकन्यांची ‘काढलीःत्याःशाळेच्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई होत्या. त्या शाळेमध्ये चला असा मोलाचा सहा सुद्धा ता र यानाटकातून मिळतो. बाईचा नवरा या बाबीचा परामर्श घेतांना दिसतो. र प्या छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा पोवाडा सन १८६९ मध्ये महात्मा फुलेंनी लिहिला. या देशात’जगातील सर्व देशांचे इतिहास एकमेकांशी ताडून पाहता हिंदुस्थानात मात्र ब्राम्हणांनी आपल्या मोठ्या दिमाखाने उच्च मानून परंतु कोळंबी, माळी, मांग आणि महार इत्यादी जातीचे हाडवैरी असल्याप्रमाणे त्यांचा मनापासून द्वेषकरून त्यास इतके निच मानण्याचे कारण काय असावे हा मोठा विचार आहे.
महात्मा फुले यांना मात्र बहुजनांचे, सर्व रयतेचे राजे शिवाजी महाराज यांचा पोवाडा लिहून शिवाजी महाराज कसे होते याचे सर्व बांधा, वर्ण, उंच पोशाख सर्व बाजुंबर पोवाड्यात यथोचित मांडणी केली आहे जे की, कुलवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजीचा (सात पोवाड्यात) त्यांनी मांडणी केली. शिवाजींचा पोवाडा १५४९ यामधून जुन्नर, शिवनेरी किल्ल्यात शिवाजीचा जन्म, जिजाबाईचे यामध्ये शिवाजी महाराजांचा हात, पोटापासून एकूण सर्व शरीरबांधाचा उल्लेख पोवाड्यात येतो. तरी पोवाड्याचे सात भाग आहेत. त्यामध्ये शिव राज्यातील घडामोडीवर त्यांच्या प्रजेवर शिवबाची कशी पकड होती. ते प्रामुख्याने दर्शविले. तर ब्राम्हणांची कपटनीती त्यामध्ये दिसून येते अशा अनेक अर्थाने हा पोवाडा शिवाजींचा कालखंड उजागर करतो. त्याचे शौर्य, त्यांची कामगिरी उल्लेखनीयरित्या पोवाड्यात मांडणी आहे. मोगलांनी कसे शहरांना लुटले त्याचे चित्रण पोवाड्यातून दिसते. ‘व्यंकोजी’ हा लोभी होता. हिस्सा देईना, बळाशी आपण आशेने फिरवी पगडीला शिवाजीला मात्र राग येतेच तरी तो भावाला कैद करीत नाही. मोगल काळात लढण्यात शिवाजीचे चातूर्य यामध्ये चित्रीत होताना दिसते. विद्याखात्याचे ब्राम्हण पंतोजी यांचा पोवाडा सन १८६९ ब्राम्हण पंतोजींनी पिढ्या खात्यात पण असतेच. त्याची धार्मिक विद्या तेवढी शाबूत ठेवली. खरे ज्ञान शुद्रातिशुद्रांना दिले नाही. घरी हिशोबाकरीता याचे ज्ञान पणते देत नसून पोवाड्यातील शिक्षणाचा दीप शिकवी काम पंतोजींचे निव्वळ माळ्या कुणब्यांचे दुसरे महार मांगांचे
2 बीस घ्या अनुभवांचे शिक्षण हे फक्त कशा पद्धतीचे होते त्यातून महार॒मांगांनी शुद्रांनी काय बोध घ्यावा अशी मांडणी दिसते आहे. महारीच्या पोरा शिकवीणे विटाळ मांझी इंग्रज शिकले करीती असे पंतोजीचे दुट्टपी धोरण अस्पृश्यता लक्ष ब्राम्हणांचे कसब :-१८६९ साली हे नाटक लिहिले. ब्राम्हणांनी त्यांच्या कपट नितीतून कसे कौशल्य वापरून कोळंबीन शुद्र महार मांग , चांभार यांची कशी अज्ञान असल्यामुळे कशी लुबाडणूक केली व दक्षिणा घेतली याचा परामर्श ब्राम्हणांचे कसब या ग्रंथातून दृष्टिपथास येते. गुलामगिरी १८७३ या ग्रंथात सत्यशोधन करून धर्म व अधर्म कसा त्याचे विस्तृत विश्लेषण, जातीची भांडण, सर्व अर्वांचित दाखले देऊन सत्य बाहेर आणले. त्याची पोलखोल केली. ब्राम्हणांचे कसे कारस्तान होते त्यांना कसा कावा करून आर्य हे लोक अनार्यांना कसे छळत होते. त्यामध्ये कच्छ, मच्छ, द्विज, परशुराम, प्रल्हाद, नरसिंह, महाद्दी यांची मांडणी करून गुलामीचा पर्दापाश केला.
याचप्रमाणे महात्मा फुलेंच्या लिखाणाचा ग्रंथाचा आपण आढावा घेऊन १८७७ : पुणे सत्यशोधक समाजाचा अहवाल :- १८७७ दुष्काळ विषयी विनंतीपत्रक , १८/१०/१८८२ हंटर र कमीशन समोर साक्ष, १८८३ शेतकऱ्यांचा आसूड, १८६४ महात्मा फुले यांचे मलबारीच्या दांड टिप्पण विषयीचे पतन, त मि अ २८६५ संत्सार अक १, १८७५ संत्सार अंक २, १८८४ इशारा, महात्मा फुलेंचा पत्रव्यवहार इत्यादी प्रकारे समाजाकरीता,. र” री र न समाजाच्या ‘सत्यशोधनाकरीता लिखाण करून सर्वहारा गुलामीची जाणीव करून देऊन ब्राम्हणी विषवल्ली कशी समाजात फोफावली होती. ती अग्रणी पुढे आणून एक समाज चेतना, प्रबोधनाचे एक मोठे परिवर्तनशील कार्य त्यांच्या लेखनातून दिसते. एक सामाजिक क्रांतिची दिर्घ ज्योत त्यांनी प्रज्वलीत केली. एक समाजिक क्रांतीचे लेणं म्हणून समाजक्रांतीचे जनक हे नाव सार्थ आहे. ते खरच समाजक्रांतीचे अग्रदूत होत. या महामानवास माझे शतश: विनग्न अभिवादन.
शिवा प्रधान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारेचे अभ्यासक ग संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.
मो.७०५७६०५९६८