अशी पाखरे येती.!
अशी पाखरे येती! | प्रतिक्रिया vs प्रतिसाद | सकारात्मक विचारांची प्रेरणादायी कथासायंकाळी टेरेसवर असेच स्वतःसोबत व थोडे निसर्गाशीही हितगुज करताना माझ्यातील विद्यार्थी जागा झाला. समोर झाडावर काही पक्षी दाटीवाटीने आपापसात काहीतरी बोलत होते. त्यातला एक पक्षी मात्र उदास होऊन काहीतरी दुःख चघळत उगाचच फांदीवर हेलकावे खात होता. मला कळेना त्याला नेमके कसले दुःख असावे! इतर पक्षी मात्र भरभरून जगणे अनुभवत होते. त्या दुःखी पक्ष्याचे काय बिनसले होते हे जाणून घ्यावे वाटले.खरेतर मी त्यांच्यासोबत बोलू शकत नव्हते नाहीतर एव्हाना विचारलेही असते. फक्त शांतपणे निरीक्षण करण्याखेरीज पर्याय नव्हता.काही वेळाने लक्षात आले की त्या एकट्या पक्ष्याजवळ हे इतर पक्षी जाऊ लागले, त्याला आपल्यात घेऊ लागले की तो चिडल्यासारखा करायचा. त्याला त्यांच्या स्वच्छंदी जगण्याचा जणू त्रास होत असावा. एकतर तो स्वतःही त्यांच्यात म...
