‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

‘कारुण्यबोध’ चे साहित्यिक यश; वामन निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

गौरव प्रकाशन नाशिक | प्रतिनिधी
नाशिकचे उदयोन्मुख गीतकार व कवी सोमनाथ पगार यांच्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहास ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा’ तर्फे दिला जाणारा प्रा. वामन सुदामा निंबाळकर राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना महामारीच्या भयावह काळातील वास्तवाचे भाष्य करणारा हा कवितासंग्रह एक साहित्यिक दस्तऐवज म्हणून ओळखला जात आहे. महामंडळाच्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, दिनांक ३० मार्च २०२५ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, मधुरम सभागृह, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर येथे झालेल्या भव्य पुरस्कार समारंभात हा प्रदान करण्यात आला.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

या सोहळ्याला उद्घाटक म्हणून महामंडळाचे सरचिटणीस व त्रिपुरा येथील आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रकाश करमाडकर, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य मा. डॉ. राजेश गायकवाड, अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे, प्रमुख अतिथी डॉ. जगन कराडे, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. सुनील रामटेके, डॉ. विजय शेगोकार, डॉ. विलास तायडे, अभिनेत्री बबिता डोळस, उपाध्यक्ष डॉ. रविंद्र तिरपूडे, कायदेविषयक सल्लागार ऍड. भूपेश पाटील, व डॉ. के. पी. वासनिक यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

सोमनाथ पगार हे केवळ कवी व गीतकारच नाही, तर लेखक, ट्रान्सलेटर, युट्युबर, ब्लॉगर आणि समीक्षक म्हणूनही साहित्य क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचे गीतलेखन लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘प्रधानमंत्री’ या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. याशिवाय त्यांनी ‘श्री. संत नारायणनंद काठे महाराज महिमा’ ही भक्तिगीते आणि ‘ऐका हो ऐका माझ्या बळीराज्याची कथा’ ही शेतकरी गीते लिहिली आहेत.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

पुरस्कार स्वीकारताना पगार म्हणाले, “पुरस्कार प्रेरणा देतात. त्यामुळे लिखाणाला बळ तर मिळतेच, शिवाय आपल्या साहित्याचा दर्जा कळतो. या प्रेरणादायी पुरस्कारामुळे मला पुढील साहित्यिक वाटचालीस निश्चित दिशा मिळून अधिक दर्जेदार लिखाण करता येईल.”

या सन्मानानंतर साहित्य, कला, मनोरंजन, सामाजिक व राजकीय क्षेत्रांतून कवी सोमनाथ पगार यांचे भरभरून अभिनंदन होत आहे.

Leave a comment