आई नावाच हाॅटेल
आई नावाच हाॅटेल
कायम उघड असत..
बिलाची भानगड नाही…
टिपही द्यायची नाही…..
शरीर आणि बुद्धीच्या
पोषणाची गॅरंटी..
संस्काराची वाॅरंटी
आपोआप मिळते..
पदराची चादर
पांघरायला मिळते..
मांडीच्या पलंगावर
शांत झोप येते..
आई नावाच हाॅटेल
कधी बंद नसत…
बंद पडल्यानंतर
आठवणीच्या कुशीत
घेऊन बसत…
“आई” नावाच्या हाॅटेलची
कुठे जाहिरात येत नाही..
आई नावाच हाॅटेल
स्पर्धेत असत नाही.
(संकलित)