गुडीपाडवा
साज शृंगार लेवून
शालू,चोळी भरजरी
आज पाडव्याच्या दिनी
गुढी ऊभारली दारी !!
गुढी ऊभारु सत्याची
गुढी ऊभारु प्रेमाची
सर्व धर्म समभाव
गुढी ऊभारु ऐक्याची !!
माझे अंगणी तुळस
दिप रांगोळी सजली
रूप गुढीच घेऊन
माय अंबा घरी आली !!
चैत्र पौर्णीमा पाडवा
देवी नौरात्री बैसली
माया ममता प्रतीक
गुढी प्रेमाची सावली !!
गुढी भक्ति आणि शक्ति
गुढी संकट हारिणी
गुढी दारी ऊभी माझ्या
सुख मांगल्य घेऊनी !!
नव्या सृष्टीचा आरंभ
हेचि पाडव्याच दान
करा विजय साजरा
आज पाडव्याचा सण !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलिस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556