रंगपंचमी
मित्र आवडतो मला जो
माझ्या जीवनात रंग भरतो
पण त्या मित्राचे काय?
जो नेहमी रंग बदलतो?
रंगपंचमी खेळू मित्रा
सहकार्याचा लावू रंग
भाऊ-भाऊ सुद्धा लाजतील
असा ठेवू मैत्रीचा गंध
रंगात भिजतील जग सारे
तुला खुणावतील मैत्री तोडणारे
असे वाहू दे मैत्रीचे वारे
पाहत राहतील जग सारे
हे जातीत वाटतील मैत्री
संपवेल आपले सौख्य
सर्व जातीचा आदर
हेच आपले ब्रीदवाक्य
म्हणून सांगतो मित्रा
रंग लाव तू कितीही
मैत्रीचा सन्मान ठेव
नको रंग बदलू कधीही
-अविनाश गंजीवाले
तिवसा