Friday, October 31

Article

गर्दी व्यवस्थापनाचे अपयश चिंताजनक : करूर चेंगराचेंगरीनंतर गंभीर प्रश्न
Article

गर्दी व्यवस्थापनाचे अपयश चिंताजनक : करूर चेंगराचेंगरीनंतर गंभीर प्रश्न

गर्दी व्यवस्थापनाचे अपयश चिंताजनक : करूर चेंगराचेंगरीनंतर गंभीर प्रश्नतामिळनाडूतील करूर येथे विजय थलपती यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन ३३ जणांचा मृत्यू झाला.चेंगराचेंगरीने पुन्हा एकदा गर्दी व्यवस्थापनाचे अपयश उघड केले आहे. प्रशासनाच्या ,पोलिसांच्या व आयोजकांची हलगर्जी जास्त गर्दी, बाहेर काढण्याच्या मार्गांचा अभाव आणि अव्यवस्थित व्यवस्थापनामुळे ही दुर्घटना घडली. मात्र या घटनेला जबाबदार कोण? अलिकडच्या काळात जगभरात नोंदवलेल्या घटनांच्या मालिकेतील नवीनतम घटना आहे जिथे गर्दी नियंत्रणातील त्रुटींचे गंभीर परिणाम झाले आहेत. धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, क्रीडा कार्यक्रम, राजकीय रॅली आणि सांस्कृतिक उत्सव लाखो लोकांना आकर्षित करतात, जिथे गर्दी व्यवस्थापनातील किरकोळ त्रुटी देखील भयानक आपत्तींमध्ये बदलू शकतात. उदाहरणार्थ, २०२२ मध्ये, दक्षिण कोरियातील इटावॉन हॅलोविन उत्सवात गर्दीमुळे १५० हून ...
गवई कुटुंबाचा भांडाफोड.! : आरएसएसशी जवळीक की आंबेडकरी चळवळीशी दगाफटका?
Article

गवई कुटुंबाचा भांडाफोड.! : आरएसएसशी जवळीक की आंबेडकरी चळवळीशी दगाफटका?

गवई कुटुंबाचा भांडाफोड.! : आरएसएसशी जवळीक की आंबेडकरी चळवळीशी दगाफटका?नुकतेच काल-परवापासून एका वृत्तपत्रातील कात्रण सर्वत्र झपाट्याने पसरत आहे ज्यात कमल गवईच्या फोटोसह बाजूला कमल गवई पाहुणी म्हणून आरएसएसच्या कार्यक्रमात जाणार असल्याची एक बातमी पाहायला मिळतेय...आरएसएस ही सर्वार्थाने आंबेडकरी चळवळ व समूहाला कशी व किती मारक असणारी संघटना आहे हे वेगळे सांगावयास नको, आंबेडकरी समूहातील पोरा-सोरांना चळवळीतले काही कळो अथवा न कळो पण आरएसएस आपली शत्रूसंघटना व भाजप आपला शत्रूपक्ष असल्याचे भल्याने कळते, याच धर्तीवर स्वतःला आंबेडकरी चळवळीचे नेते वगैरे असल्याची भलावणं करणाऱ्या गवईविषयी आंबेडकरी चळवळीच्या विसंगत वागत असल्याची बातमी पाहून आंबेडकरी चळवळीतील काही सुजाण लोकांनी समाजमाध्यमांवरून आक्षेप नोंदवायला सुरुवात केली असता, समाजाचा आपल्याविरोधात जाणारा कल पाहून कमल गवईने कमालीची पलटी म...
बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभाग
Article

बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभाग

बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभागबंजारा समाज हा भटक्या जीवनशैलीसाठी परिचित आहे. व्यापारी, पशुपालक,धान्यवाले,वाहतूक करणारे,जंगलातून स्थलांतर करणारे असे विविध व्यवसाय समाजाने इतिहासात केले.ब्रिटिश राजवटीत वसाहती कायद्यांतर्गत त्यांना “गुन्हेगार जमाती”चा शिक्का बसला होता.हा डाग १९५२ नंतर दूर झाला,पण सामाजिक व आर्थिक परिणाम मात्र आजतागायत जाणवत आहेत.बंजारा समाजात शिक्षणाच्या संधींची कमतरता,गावाबाहेर वसाहती,आरोग्याची दयनीय अवस्था,स्त्री-पुरुष दोघांच्याही रोजगारातील मर्यादा या कारणांमुळे बंजारा समाज अजूनही मोठ्या प्रमाणावर वंचित आहे.शिक्षण,नोकरभरती,राजकीय प्रतिनिधित्व या क्षेत्रांत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.म्हणूनच त्यांची मागणी आहे की त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात (एस.टी.) समाविष्ट करावे.महाराष्ट्रातील विविध समाजघटकांनी मागील काही दशकांत...
मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!
Article

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!

मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात आज निधन झाले. जांभळढव्हपासून बिरडं पर्यंतचा प्रवास आज थांबला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हासेगाव येथील ते रहिवासी होते.मराठवाड्याच्या तहानलेल्या मातीला, दुष्काळाने होरपळलेल्या शिवारांना आणि उपाशीपोटीही मुले शिकवणाऱ्या ग्रामीण आईच्या जगण्याला शब्द देणारा सशक्त आवाज आज कायमचा थांबला आहे. ख्यातनाम कथाकार भास्कर तात्याबा चंदनशिव यांच्या निधनाने मराठी साहित्य सजीव कथनकलेचे एक तेज गमावून बसले आहे. त्यांच्या कथांनी केवळ ग्रामीण समाजाचेच नव्हे, तर जातीय, स्त्रीवादी आणि दलित जीवनाचे दु:ख, आशा, संघर्ष आणि मूक करुणा आपल्या समोर उभी केली.१२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगावात जन्मलेल्या संवेदनशील या बालकाने पुढे मराठी साहित्याला कथाकार भास्कर चंदन...
कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक
Article

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिक

कपाळगोंदण: स्त्री जीवनातील संघर्ष आणि सौंदर्य यांचे ललित प्रतिककला ही आत्माविष्काराची पहिली पायरी आहे, प्रत्येक माणसाच्या अंगी एकतरी कला असावी. माणसाला कधीही उपाशी ठेवत नाही. कला निराशामय काळोखातील एक प्रकाशमान बिंदू आहे, जो माणसाला वादळातील पणतीप्रमाणे सतत संघर्ष करत जगण्याची प्रेरणा देतो. अशा सुंदर लालित्यपूर्ण लेखन करणाऱ्या पुसद जि यवतमाळ येथील लेखिका निशा डांगे यांची कपाळ गोंदण ही ललितलेख असलेली साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली. लेखिकेने स्त्री जीवनातील अनेक सुखदुःखाच्या हिंदोळ्यावरील आलेले अनुभव या कलाकृतींमधून मांडले आहेत.कपाळ गोंदण या कलाकृतीतील ललित साहित्याच्या अनुषंगाने मुखपृष्ठावर साकारलेल्या भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका स्त्रीच्या प्रातिनिधिक चित्राने स्त्री जीवनातील अनेक गोष्टींना अधोरेखित केले आहे. ही कलाकृती स्त्री जीवनाला केंद्रस्थानी ठेवून तिच्या भोवती ...
नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह
Article

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह

नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रहअरुण विघ्ने सर  संवेदनशील,आंबेडकर आणि गौतम बुध्द यांच्या विचारचा जबरदस्त पगडा असणारा व त्यांच्या  विचाराचा सुगंध,परिमळ सर्वदूर आपल्या गझलेतून,कवितेतून फैलवणारा निर्मळ मनाचा साहित्यिक. 'नभाला भिडावे निळ्या पाखरांनी' अशी कळकळीची आस असणारा गझलकार, समीक्षक,स्फुट लेखक,व्यक्तीविशेष असा चौफेर लेखन करुन आपल्या वेगळ्या लेखन शैलीचा ठसा उमटविणारा साहित्यिक मित्र.निळ्या पाखरांनी नभाला गवसणी घालत नवे गीत गावे. नव्याचा स्विकार करत असतांना प्रसंगी उपाशी राहून समजदार होत स्वकमाई करुन आपल्या कमाईचा हिस्सा आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी खर्च करावा.स्वाभिमानाने भीमाच्या विचार रथाचे सारथ्य करावे ,आपल्या लेखनीच्या द्वारे जनाचा उद्धार करावा.कारण भीमाचे उपकार आपण कदापी विसरू नये.स्वतः लोकसेवक होऊन बुध्द वचनास जागवावे.हा विचार. रुजवता...
भारतात कर्करोग का वाढतोय? | कारणे व उपाय
Article

भारतात कर्करोग का वाढतोय? | कारणे व उपाय

भारतात कर्करोग का वाढतोय? | कारणे व उपायकर्करोग हा संपूर्ण जगातील सर्वात प्राणघातक आजार आहे आणि त्यामुळे दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत आणि काही कर्करोग टाळता येतात. भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि ती वेगाने वाढत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामने असा अंदाज वर्तवला आहे की देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०२२ मध्ये १४.६ लाखांवरून २०२५ मध्ये १५.७ लाखांपर्यंत वाढेल.आयसीएमआरचा अंदाज आहे की भारतातील अंदाजे नऊ जणांपैकी एका व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात कर्करोगाचे निदान होण्याची अपेक्षा आहे.देशात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये भारतात कर्करोगाच्या रुग्णांची अंदाजे संख्या १५.३३ लाखांपेक्षा जास्त आहे. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ ह...
श्रीमंतांची फॅशन : गरीबांचे जेवण झुणका भाकर
Article

श्रीमंतांची फॅशन : गरीबांचे जेवण झुणका भाकर

झुणका भाकर या शब्दात महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाची सगळी कहाणी दडलेली आहे. शेतकऱ्यांच्या डब्यातला सोपा तुकडा, मजुराच्या पोटाला कळकळीने दिलेले सांत्वन, आणि जत्रा-उत्सवात वाटलेली साधी तृप्ती हे सर्व एका प्लेटमध्ये साठवलेले दिसते. पण आजच्या बदलत्या काळात हा साधा अन्नाचा तुकडा शहरातील बुटीक रेस्टॉरण्टच्या मेन्यूमध्ये ‘ट्रेंड’ म्हणून दिसतो. झुणका भाकरच्या इतिहासापासून त्याच्या सामाजिक व सांस्कृतिक अर्थापर्यंत, आणि या बदललेल्या रूपाचे दुःखद सत्य.झुणका भाकर: साधेपणातला शक्तीपोषक अन्नझुणका म्हणजे बेसन. भाकर म्हणजे ज्वारी, बाजरी किंवा गहूची भाकरी. एकत्रितपणे हे असं अन्न आहे जे कमी खर्चात पौष्टिकता देतं. झुणक्यामध्ये प्रथिने, उर्जा या सगळ्याचं संतुलन साधलं जातं. शेतात राबणाऱ्या लोकांसाठी हे केवळ जेवण नाही ते तन-मनाला टिकवणारे अन्न आहे.गरिबांच्या आयुष्यात झुणका भाकरची भूमिकाशेतक...
पंचनाम्याचं नाटक थांबवा – शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई द्या
Article

पंचनाम्याचं नाटक थांबवा – शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई द्या

पंचनाम्याचं नाटक थांबवा – शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई द्यामहाराष्ट्रात पावसाचा धिंगाणा चालू आहे.पंचायतराज , नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहे. मतदाराना गोंजारण्याचं काम सध्या नेते करत आहे. शेतकऱ्यांचं नुकसान पहाणी करण्यासाठी नेते बांधावर जात आहेत. प्रगत महाराष्ट्रातील प्रगत नेत्याची धावपळ सुरु आहे. नेत्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र एक प्रगत राज्य. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एकच राज्य ;पण याच राज्यात आज शेतकरी ढसाढसा रडतोय. अनेकांची संसार उद्धवस्त झालेली आहेत. कांहीची जणावरे वाहून गेलीली आहेत.काहीजण पूरात वाहून गेलेत.कारण आहे राज्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचं संकट.एक संकट ओसरत नाही,तोवर दुसरं संकट आ वासून उभा राहतोय.येथे कधी अतिवृष्टी,कधी दुष्काळ,तर कधी गारपीट व वादळामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत राहतेय.मग जगाचा पोषिंदा लाचार होव...
अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
Article

अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणीअमरावती : ओबीसी आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत दोन ओबीसी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षण संघर्ष समितीचे चंद्रशेखर देशमुख व तुषार वाढवणकर हे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून त्यांनी शासनाविरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.प्रमुख मागण्या२ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय रद्द करावा – मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करणारा निर्णय मागे घ्यावा.शिंदे समितीच्या ५८ लाख कुणबी नोंदणीची पडताळणी करण्यासाठी उच्चस्तरीय उपसमिती नेमावी.ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सध्याच्या ५० टक्क्यांवरून १०० टक्के करावी.जातीनिहाय जनगणना तात्काळ सुरू करावी.महा-युती सरकारने भरपाई निधी ओबीसी समाजाला उपलब्ध करून द्यावा.संघर्ष समितीचा इशाराराज्य सरकारने या ...