पावसाळ्यात पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.!
पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.. उन्हाळ्याच्या ऋतूनंतर येणारा पावसाळा हा आपल्याला अतिशय आनंद देऊन जातो. परंतु पावसाळ्यात त्वचेवर होणाऱ्या फंगल इन्फेक्शन्सचे प्रमाण हे अधिक असते. पावसाळ्यात पायांची सर्वांत वाईट परिस्थिती होते, त्यामुळे मुख्यत्वे करून पायांची निगा राखणे खूप गरजेचे असते. जर पावसाळ्यात पायांची योग्य निगा राखली नाही तर पायांना अनेक प्रकारचे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात वातावरणात अधिकची आर्द्रता आणि दमटपणा असतो. यामुळेच फंगल इन्फेक्शन्स सारख्या समस्या उद्भवतात. अशा दिवसांत सकाळी अंघोळ करताना पायांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे.इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण या दिवसांत शरीरात, वातावरणाचा, पर्यावरणात खूप बदल होत असतात. पावसाळयात आपले पाय व पावसाचे पाणी यांचा स...







