चाळिसी…..!
Contents
hide
धड तरुणपण ही नाही आणि म्हातारपण देखिल नाही अश्या वयाचा टप्पा म्हणजे चाळीशी. खर तर म्हणतात महिलांना वय विचारू नये ! परंतु पुरुषांना तरी कुठे वय सांगायची इच्छा असते म्हणा ! जस फोटो काढताना वाढलेली ढेरी लपवण्याचा प्रयत्न पुरुष मंडळी करत असतात तसच वय लपवण्याचा ही प्रयत्न करत असतात बर का..! आहो तरुण दिसन कुणाला आवडत नाही सांगा! मी चौथीत असताना सलमान खानचा सिनेमा आला होता ,मैने प्यार किया! त्यात तो हिरो ,आता मी प्रेम करून अर्धा संसार देखील झाला, मोठी मुलगी BE करतेय तरी सलमान अजून ही हिरो….!
म्हणजे बघा वय किती लपवतात नाही , वास्तवात त्याने आजोबा चे रोल करायला हवेत नाही का? जाऊ द्या भारतीय लोकांना हे असले थोराड” झालेलेच हिरो आवडतात त्याला आपण तरी काय करणार नाही का?
पण खरं सांगू आपण म्हतारे झालो हे आपण कधी मान्यच करत नाही .उगाच आरशात समोर उभे राहून ओठावरील मिशी मध्ये पांढरे केस कात्रीने ,खात्रीने आपण तरुण आहोत ह्या साठी कापतो पण उपयोग शून्य
ते अजून वाढत जातात ,मग काही जण मिशी ला सरळ सरळ कात्री लावतात आणि तरुण दिसण्याचा प्रयत्न करतात. केस तर काळे करतात ही काय लिहायची गोष्ट आहे का ? त्या तर महिला ही करतात.
आता विषय निघाला आहेच तर बोलूनच टाकतो. झालं अस बाजारातून जात असताना मुलीची मैत्रीण भेटली , आजू बाजूला ओळखीच्या जरी नसल्या तरी बऱ्या पैकी महिला होत्या. ती ” हसली मुलीची मैत्रीण बर का..!नाही तर उगाच गैर समज . आणि मला विचारलं.
काका !
तिने काका म्हणताच माझा चेहरा पडला.तिच्या कडे पहात पुन्हा प्रश्न केला.
आहो काका काय झालं…?
काका ते ही आजूबाजूला असणाऱ्या अश्या प्रसन्न वातावरणात मला मारलेली हाक , ऐकून माझ्या तोंडून निघून गेल.
काय नाही ग वय झालं आता.
मी अस म्हणताच मुलीची मैत्रीण तर हसली परंतु आजू बाजूच्या माझ्या नसणाऱ्या मैत्रिणी ही जोर जोरात हसल्या…..मी मात्र मुलीच्या मैत्रिणी ला म्हंटल चल येतो !अस म्हणत निघालो मनात गाणं घोळत होत.
पिकलेल्या दाढीवर हात फिरवला , डोक्यावर उरलेल्या केस नीट सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत
मनात आलेलं गाणं म्हणत निघालो
ना उम्र की सीमा हो
ना जन्म का हो बंधन
जब प्यार करे कोयी
तो देखे केवल मन………
अशोक पवार