Tuesday, March 10

Article

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले
Article

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले(राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन.! त्यानिमित्ताने हा लेख 'भारताचे महानायक महानायिका' पुस्तकातून देत आहे.-  लेखक:रामेश्वर तिरमुखे,जालना 9420705653.- संपादक)महात्मा जोतीराव फुले हे महान क्रांतिकारक होते.जी क्रांती त्यांनी मानवाच्या स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित राष्ट्रनिर्माण,जी क्रांती सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, साहित्यिक सह मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी होती.जोतीराव फुले यांचा जन्म 11एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला.त्यांच्या आई चिमनाबाई तर वडील गोविंदराव होत. जोतीराव रांगत असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.सगुणाबाई क्षीरसागर या मावस बहिणीने जोतीराव यांचा सांभाळ करण्यासाठी मदत केली होती.गोविंदराव शेती आणि फुलांचा व्यवसाय करत होते. वयाच्या 7व्या वर्षी जोतीराव यांना...
पांगलेला गाव.!
Article

पांगलेला गाव.!

पांगलेला गाव.!नदी काठावरून दुरवर नजर जाईल जिकडे तिकडे हायब्रीडच हायब्रीड पेरलेली हिरवीगार शेतं.नदीकाठच्या डबक्या, डबक्यात साचलेल्या पाण्यावर ऑईल इंजिन बसवून वांग्याची ,टमाटयाची हिरवीगार डुंगे बहरलेली दिसायची.तयार होवून निंघालेली वांगी टमाटी विकायसाठी गावच्या आठवडी बजारात शेतकरी लोकं मांडायची.गावात पिक पाणी तसं चांगलं होतं.चांगली आबादानी होती. जो तो आपल्या मेहनतीत व्यस्त रहायचा. शेणपाणी आटपून रंगरावनं गोठ्यातील बैल मोकये सोडून त्याईच्या पाठीवर दोर टाकले. बैलांनी पाणी प्याले सरका नदीचा मार्ग धरले‌ला. बादशाहा भाईच्या नदीपल्याडच्या मईच्या वावरात आज हायब्रीडच्या वावरात डवऱ्याचा फेर होता.कायाभोर मईच्या वावरात कायभोर हायब्रीड चांगलं टोंग्या,मांड्या,बसलं होतं. वावरंही तसं ताकदचं म्हणजे हेल्याचं मस्तकच होतं.साजरं शेणखत व पुराच्या पाण्यामुळे येणारा सुपीक गायवटी भाग असल्यानं व घरच्याच दहा बारा बै...
सप्रेम नमस्कार.!
Article

सप्रेम नमस्कार.!

सप्रेम नमस्कार.!                       खऱ्या अर्थाने निवडणूक म्हणजे एक सोहळा असतो, हे आता दिसून येऊ लागलं असून लोकसभेपेक्षा ही जास्त हा विधानसभेचा निवडणूक सोहळा रंगतदार होणार अस दिसत आहे.मतदार राजा आणि जनतेच्या हिताचे इतके निर्णय धडाधड होत आहेत,की  हे पाहून अस वाटत हेच मुख्यमंत्री"उपमुख्यमंत्री होते की नवीन आलेत. किती धाडसी निर्णय घेत आहेत नाही का ? चीफ तर नाही ना यांच्या मध्ये बसवली धाडसी निर्णय घेण्याची.            तोल जाऊ पर्यंत जनता ओरडून थकली परंतु टोल बंद झाले नाही.परंतु निवडणूक आली असता  न मागता मुंबईत जाणारे  टोल माफ. आणि नवीन किती तरी महामंडळे स्थापन वाह काय वेग पकडलाय नाही सरकारने .खऱ्या अर्थाने गतिमान सरकार  झालंय.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!          इथून मागेच हे निर्णय घेतले असते तर खूप बरं झालं असत . बाकी मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला ते काम मात्...
शाहिरी अभंग गाते.!
Article

शाहिरी अभंग गाते.!

शाहिरी अभंग गाते.!        छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली. स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे. त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत."रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं".रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला.                रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशा...
दिवस आपल्यासाठी उगवतोच.!
Article

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!

दिवस आपल्यासाठी उगवतोच.!     मी सातवीच्या वर्गात असताना माझ्या वर्गात गेल्या सहा वर्षांपासून नापास होणारा एकजण होता.आम्ही त्याला सगळेजण नाना म्हणायचो.तो आमच्याच गल्लीत राहायला होता.आमच्यापेक्षा वयाने खूप मोठा.मिशासुद्धा चांगल्याच वर आलेल्या होत्या.आणि हा नाना अंगाने धिप्पाडच्या धिप्पाड होता.जणू पैलवानच.म्हणजे आमचं मास्तर त्याच्या खांद्याला लागायचं.आणि पोरं त्याच्या गुडघ्याला.अंगाने दणकट असणारा नाना.पण अभ्यासात पार दरिंद्री.नानाला काहीच येत नव्हतं.आणि दरवर्षी नाना नापास व्हायचा.     त्यात आमच्या मास्तरने एक नियम असा केला होता,वर्गात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जो विद्यार्थी बरोबर देईल त्याने वर्गातल्या सगळ्या पोरांच्या मुस्काडीत मारायची.त्यावेळचे मास्तर असा नियम करायचे.आणि यात काय व्हायचं त्या भितीने सगळी पोरं मन लावून अभ्यास करायची.पण नानाच्या डोक्यात काहीच राहत नव्हतं.आणि त्याचा परिणा...
एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!
Article

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!

एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!या एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.मला आणि माझ्या कवितेला ही एस.टी.आमच्या आयुष्याला फार जवळची झाली आहे. महाराष्ट्रभर याच एस.टी.ने मी हिंडत असतो. प्रवासात सगळी सर्व सामान्य माझ्यासारखी माणसं असतात. थोडंस सोशल मीडियामुळे मला बरीच सामान्य लोकं ओळखू लागल्यामुळे अनेकजण मी एस.टी.मध्ये किंवा स्टँडवर दिसलो की माझ्यासोबत सेल्फी वगैरे काढतात. कुणी चहा पाजतात. तर कुणी काहीतरी खायला हमखास देतात. याच एस.टी. मध्ये सामान्य लोकांची वेदना समजून घेता येते. मला वाटतं सगळ्या जाती धर्माची माणसं या एस.टी मध्ये भेटतात. पण, खरं सांगू का? या डब्यात फक्त आणि फक्त माणुसकीचा सुगंध दरवळत असतो. बसायला जागा भेटावी, भेटली तर खिडकीजवळ भेटावी या हट्टाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर इथं भांडण होत नाही.ज्याला आधी जागा भेटलेली असते नंतर तोच प्रवासी उभ्या ...
आमची लक्ष्मी.!
Article

आमची लक्ष्मी.!

आमची लक्ष्मी..!अंगणातल्या चिंचेखाली बांधलेली आमची लक्ष्मी दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की,मी पटकन दप्तर काढून पुस्तक हातात धरून बसायचो.माझ्यासोबत माझ्या चारही बहिणी बसायच्या.तेवढ्यात इतक्या घाईने आमची आई टीव्ही बंद करायची आणि बाहेरच्या छपरात चुलीजवळ जाऊन बसायची.एका क्षणात सुरू असलेला सगळा दंगा बंद व्हायचा आणि जणू काही या घरात सात पिढ्यापासून कसलाच आवाज नाही अशी शांतता व्हायची.ही अंगणात चिंचेखाली बांधलेली आमची लाडकी म्हैस.आणि ही दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की समजून जायचं आमचे वडील आले.वडिलांना आम्ही सगळेच घाबरायचो.त्यांनी कधी माझ्यावर हात उचलला नाही.पण भिती तेव्हा होती ती आजही आहेच.वडील आले की,बाहेरच्या हौदातलं पाणी घेऊन हात पाय तोंड धु पर्यंत लक्ष्मी अक्षरशः हंबरडा फोडून ओरडत राहायची.मग एका बादलीत पाणी भरून ते लक्ष्मी जवळ जायचे.विशेष म्हणजे त्याच बादलीत पाणी दिलं तरच लक्ष्मी प...
पारावरची चालती बोलती पुस्तके.!
Article

पारावरची चालती बोलती पुस्तके.!

पारावरची चालती बोलती पुस्तके.!ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली ... डोळे विझत चाललेली गावाकडची ... ही म्हातारी माणसं म्हणजे .... आयुष्यावरली चालती-बोलती पुस्तकं असतात..!आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला.., सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली.., ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे.., गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे....कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध .... जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का.... नांगर हाकून कमरेला आलेला बाक.... नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा...कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ.... डोईवर पांढरी टोपी.... पायातल्या झिझलेल्या वहाणा दरिद्रीनारायणाची साथ सोबत दर्शवणाऱ्या अशाच. ....डोळ्यांवरचा चष्मा किमान ... दोन-तीन ठिकाणी तरी जोडलेला वा दोरीने बांधलेला... गळ्यात तुळशीची माळ अन कंबरेला करदोडा हीच काय ती संपत्ती....हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जा...
गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!
Article

गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!

गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!बाप गेला, आई गेली. तरीही कष्ट करत, असेल त्यात हार न मानता जगत राहिला. सरळमार्गी स्वप्न बघत राहिला.. कधी कुणाच्या शेतात ओझी उचलत राहिला तर कधी स्वतःच स्वतःची पाहिलेली स्वप्न कुचलत राहिला.. जगण्याच्या आरुडात तो शोधत राहिला मनाला विरंगुळा.. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी.. कधी निवद नारळ खाऊन तर कधी फाटकं तुटकं लेऊन.. आहे त्या परिस्थितीत काहीतरी बदल होईल या आशेवर एकेक दिवस येत होता, जात होता.. तरीही खचला नाही.. ना कुणाच्या वळचणीला गेला, ना कुणाला काही त्रास दिला.. तो चार भिंतीच्या शाळेत कमी अन् भाकरीच्या शोधात जास्त शिकत राहिला.. बरं.. आई बाप गेल्यानंतर त्याचा आधार होता तो त्याच्या पाच बहिणी व आत्याचा.. त्याही रोज जगण्याची लढाई लढत बिकट परिस्थितीतून वाट काढत चाललेल्या.. फाटक्याला तुटक्याचा आधार असेच म्हणता येईल.. पण त्याचे भाचा व भाची त्याला काहीबाही सांगत होती.. शिक...
नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!
Article

नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!

नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!'बंजारा विरासत वस्तुसंग्रहालया'चे उद्घाटन झाले. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च पदावर असलेल्या बड्या मंडळींच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. या समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांचे राजकीय वजन आणि वलय पाहता गर्दी जमविणे आवश्यकच होते. त्यासाठी तांड्यांना लक्ष्य केले गेले. तांडे हे गर्दीचे एकमेव स्रोत होते. कार्यकर्ते जिद्दीला पेटले होते. नेत्याच्या प्रतिष्ठेचा आणि राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्याला गर्दीनेच उत्तर देता येणार होते. त्यामुळे कार्यकर्ते गर्दीसाठी आसूसले होते. रात्रंदिवस एक करून तांडे पालथे घालत होते. एकतर सोयाबीन काढण्यासाठी तांड्यात धावधूप सुरू होती आणि त्याचवेळी नगाराभवनचाही धामधूम सुरू होता. तांड्यांकडे वेळ नव्हता. उन्हापावसात राबराब राबून काळेठिक्कर पडलेल्या त्या थकल्याभागल्या लोकांपुढे सुंदर सुंदर स्वप्ने अंथरली गेली. पोह...