Saturday, May 2

Blog

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
Article

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदेराज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय ? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? जाणून घेण्याचा हा प्रयत्न…खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत.पहिला अवकर्षण काळ. ज्यात सरासरीपेक्षा १०% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक ...
रावण अर्ध्या संसदेपेक्षा हुशार – सिमी ग्रेवालची दसऱ्यादिवशी वादग्रस्त पोस्ट
News

रावण अर्ध्या संसदेपेक्षा हुशार – सिमी ग्रेवालची दसऱ्यादिवशी वादग्रस्त पोस्ट

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण देशात वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून रावण दहन केला जातो. मात्र यावर्षी (२ ऑक्टोबर)च्या दसऱ्यादिवशी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवालने केलेल्या सोशल मीडिया पोस्टने चांगलाच वाद पेटवला आहे.नेहमी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी सिमी ग्रेवालने तिच्या ‘X’ (माजी ट्विटर) हँडलवर रावणाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले की,“प्रिय रावण, दरवर्षी या दिवशी आपण चांगल्याचा वाईटावर विजय झाल्याचा उत्सव साजरा करतो. पण तांत्रिकदृष्ट्या तुमच्या वर्तनाला ‘वाईट’ न म्हणता ‘थोडं खोडकर’ म्हणायला हवे. तुम्ही सीतेचे अपहरण केले होते, पण तिला सन्मान, निवारा, चांगले अन्न आणि अगदी महिला रक्षकही दिले होते. इतका सन्मान आजच्या समाजातही स्त्रियांना मिळत नाही.”सिमीने पुढे रावणाचे बुद्धिमत्तेचे कौतुक करत लिहिले की, “रावण अर्ध्या सं...
एफवायपासून युपीएससी अभ्यासक्रम : मुंबई विद्यापीठ-ठाणे महापालिकेचा करार
News

एफवायपासून युपीएससी अभ्यासक्रम : मुंबई विद्यापीठ-ठाणे महापालिकेचा करार

मुंबई : युपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना आता पदवी अभ्यासक्रमासोबतच तयारीची संधी मिळणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवारी झालेल्या ऐतिहासिक करारामुळे एफवायपासूनच विद्यार्थ्यांना युपीएससी अभ्यासक्रम शिकता येणार आहे.स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळणे आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित मिळत नसल्याने अपयश येते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने १९८७ मध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था स्थापन केली. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतले असून आता या संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे.या महत्त्वाच्या करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव य...
सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊल
Poem

सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊल

सीमोल्लंघन : परंपरेच्या बंधनातून संविधानाच्या उजेडातले पाऊलहोय आम्ही सिमोल्लंघन केलंयकैक पिढ्याचं वेशीबाहेरचंजगत असलेलं जीणं…आज वेशीच्या आत आलंय ..ओंजळीला ओठ लावूनतहान ओठांची भागवली होतीभेदभावाच्या चढून भिंतीआमचा पुर्वज लढला होतात्याच भिंती भेदून आजहोय आम्ही सिमोल्लंघन केलंय.परंपरेचे फेकून जोखडगळ्यातलं टाकून मडकेकमरेचा फेकून झाडूहाती कासरा घेऊन आलोयसंविधानानं जग जवळ केलयहोय आम्ही सिमोल्लंघन केलंय.-प्रशांत वाघयेवलासंपर्क ७७७३९२५०००हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजhttps://youtu.be/pYW3sHdm0dY?si=6P0c8if1AiI95ivE...
‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?
Article, Story

‘धम्मचक्र प्रवर्तन’ चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?

'धम्मचक्र प्रवर्तन' चुकीचा शब्दप्रयोग – बौद्ध संज्ञांचा योग्य वापर का आवश्यक?          मुळात 'बौद्ध' या संज्ञेत विद्वत्ता, चिकित्सा, आणि शिलसंपन्नता अंतर्भूत आहे; पण दुःखद म्हणजे पारंपरिक अथवा धर्मांतरित बौद्धांमध्ये या तिन्ही बाबींचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसतो. बौद्ध समाजात क्वचित लोक या तिन्ही साच्यात बसणारे आढळतील. पारंपारिक बौद्ध म्हणजे उत्तर-पूर्व (ईशान्य) भारतातील समूहात वज्रयान, तंत्रयान व काही अंशी महायान सिद्धांतांचा प्रभाव असल्याने त्यांच्याकडून आंबेडकरप्रणित धम्म अपेक्षितही नाही, मात्र बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध हा १००% विद्वत्ता, चिकित्सा, व शिलसंपन्नतेचा आग्रह धरत असल्यामुळे बाबासाहेबांसमवेत धर्मांतरित झालेल्या बौद्धांची ही स्वाभाविक जबाबदारी आहे, की आपण आपला सांस्कृतिक इतिहास शुद्ध स्वरूपात रुजवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ...
नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
News

नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नागपूर : नागपूरची ऐतिहासिक दीक्षाभूमी पुन्हा एकदा लाखो अनुयायांच्या उपस्थितीने गजबजून गेली आहे. यंदा ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा होत आहे. दरवर्षी साधारण पाच ते सहा लाख अनुयायी दाखल होतात; मात्र यंदा विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी केली आहे.विक्रमी गर्दीची शक्यताडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून बौद्ध अनुयायांचा ओघ सुरू झाला असून, यंदा १२ ते १५ लाख अनुयायी नागपूरात दाखल होण्याची शक्यता आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तगर्दी नियंत्रणासाठी नागपूर पोलिसांनी विशेष योजना आखली आहे. १२०० पोलीस कर्मचारी व अधिकारी, एसआरपीच्या दोन तुकड्या, २ डीसीपी, ४ एसीपी आणि १०० अधिकारी या ठिकाणी...
मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख
Article

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख

मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेखसध्या मी मिक्स कॉलनीत राहतो. मिक्स कॉलनी ह्यासाठी म्हणालो की, मोठया शहरातून सुद्धा जात- धर्म निदर्शक वसाहती आहेत. माझ्या कॉलनीचे नावही हरिओम नगर आहे. माझा पत्ता मात्र पुष्पगंधा कॉलनी असा आहे कारण माझे घर हरीओम नगरातले शेवटचे आहे आणि माझ्या शेजारच्या  घरापासून पुष्पगंधा कॉलनी सुरु होते. मला हरीओम पेक्षा पुष्पगंधा नाव सोयीचे वाटले. म्हणून माझा पत्ता ‘अशोक थोरात. पुष्पगंधा कॉलनी ’ असा झाला. एकतर मी देव धर्म इत्यादी काही मानत नाही म्हणून हरीओम  नावाची अॅलर्जी, आणि कवी वगैरे असल्यामुळे पुष्पगंधा नावाचे आकर्षण. मला अनेक पत्र ‘ अशोक थोरात. वि.म.वि.  अमरावती ’ एवढयाच पत्यावर येतात. ह्याचा अर्थ मी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे असा नाही तर टपाल भरपूर येत असल्यामुळे पोस्टमन ओळखीचे होऊन जातात आणि वि.म.वि.ला टपाल का...
हे दीक्षाभूमी
Poem

हे दीक्षाभूमी

हे दीक्षाभूमी !हे क्रांती भूमीतू आमच्यासाठी उजेडाचं झाड झालीसविज्ञानवादी विचारांचीप्रज्ञा सावली झालीसतुझ्या कुशीत विसावतांनामाणुसकीची ऊब मिळतेघरी परततांना सोबतप्रज्ञेची शिदोरी मिळतेतुझी प्रेरणा डोक्यात आहेदीक्षाभूमी...सदैव परिवर्तन पेरत राहूसमता,बंधुता,न्यायाच्यामार्गावर आम्ही चालत राहूआता तुच आमची प्रेरणातुच जगण्याची ऊर्जातुच अमुची युद्ध शाळाआणि तुच अमुची क्रांतीज्वाळातुच मुक्तदाती अमुची…..धम्मचक्र असेच गतीमान होत राहोभारत बौद्धमयच्या दिशेने जात राहो !अरूण ह.विघ्नेरोहणा,आर्वी,वर्धाहे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजनागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीचा इतिहास...
पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाई
News

पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाई

पैठणच्या शेतकऱ्याचा KBC मधील पराक्रम : ५० लाखांची कमाईमुंबई : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास कुंटेवाड यांनी कौन बनेगा करोडपती (KBC) या कार्यक्रमात मोठा पराक्रम केला आहे. कैलास यांनी एकही लाईफलाईन न वापरता तब्बल ५० लाख रुपये जिंकले.सोमवारी प्रसारित झालेल्या भागात कैलास यांनी सलग १४ प्रश्नांची बरोबर उत्तरे देत सर्वांना थक्क केले. शेवटी १ कोटी रुपयांसाठी १५ वा प्रश्न समोर आला. त्यांनी लाईफलाईन वापरूनही खात्री न पटल्याने ५० लाखांच्या रकमेसह गेम क्विट केला.कैलास हे व्यवसायाने शेतकरी असून महिन्याला फक्त ३-४ हजार रुपयांचीच कमाई होते. मात्र, त्यांच्या डोळ्यात क्रिकेटचं स्वप्न आहे. स्वतःला क्रिकेटपटू होण्याची संधी न मिळाल्याने आता आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षण देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.अमिताभ बच्...
ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल
News

ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

मुंबई : राज्यभर पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप 'ओला दुष्काळ' जाहीर करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. पण विरोधी पक्षनेते असताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री असताना त्या वेदना होत नाहीत का? मी सत्तेत असताना शेतकऱ्यांचे दु:ख पाहून कर्जमाफी दिली होती. मग आता मात्र शब्दांचा खेळ करून मदत नाकारली जातेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.ठाकरेंनी यावेळी 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र दाखवत फडणवीसांना चिमटा काढला. “तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच मला 'ओला दुष्काळ जाहीर करा' असं पत्र पाठवलं होतं. आज मात्र मुख्यमंत्री झाल्यावर तेच फडणवीस वेगळं बोलतायत. एखादा श...