Wednesday, December 10

Author: Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.
Gerenal

फर्निचरची खरेदी करताना ….

मुलांच्या खोलीतल्या फर्निचरची खरेदी करताना काही बाबींची नोंद घ्यायला हवी. मुलं सतत धावत-पळत असतात. दंगा करत असतात. हे लक्षात घेता फर्निचर तकलादू नव्हे तर मजबूत असायला हवं. त्यामुळे मुलांकडून त्याचं नुकसान संभवणार नाही.फर्निचरने मुलांच्या खोलीतली कमीत कमी जागा व्यापावी. यामुळे मुलांना खोलीत मोकळेपणाने वावरता येईल आणि धडकून इजा होण्याची शक्यताही कमी होईल. मुलांच्या खोलीतील फर्निचरचे कोपरे गोलाकार आणि गुळगुळीत असावे. त्याचबरोबर दरवाजे, खिडक्या, कपाटं यांच्या खट्ट्या सहज उघडतील अशा असाव्या.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज प्रथम-वेळ खरेदीदारांसाठी फर्निचर खरेदी टिपा......
Gerenal

जोपासा बागकामाची आवड

कामाच्या धबडग्यात आपण आपल्यातील अनेक क्षमता नजरेआड करत असतो. आपले अनेक छंद दुर्लक्षित राहतात. पण ते आवर्जून जपायला हवेत. आता हेच बघा.. अनेकंना बागकामाची आवड असते मात्र, वेळेअभावी ती बाजूला सारावी लागते. तुम्हीही अशाच निसर्गप्रेमींपैकी एक असाल तर बागेचा जेरिस्केपिंग मार्ग अवलंबा. बागकामाचा हा अनोखा मार्ग अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात तुमच्या अंगणात, टेरेसमध्ये अथवा बाल्कनीत हिरवा शेजार फुलवू शकतो.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजगार्डनिंगच्या या पर्यायात मातीऐवजी भुसा, वाळलेलं गवत, भाज्यांचे देठ, फळांच्या साली आदींचा वापर केला जातो. हा पूर्णपणे नैसर्गिक रसायनांवर आधारित पर्याय असल्यामुळे कोणतंही रासायनिक खत घालावं लागत नाही. खत म्हणून सुकलेली पानं अथवा बारीक कापलेलं गवतही वापरता येतं. जेरिस्केपिंग गार्डनिंगद्वारे लावलेल्या रोपांना आलेली फुलं लवकर कोमेजत नाहीत. अशा प्रकारे लावलेल्या रोपांना ...
Story

सातपुड्याच्या कुशीत : पांढऱ्या पायाची

रोज भल्या पहाटेच उठून सडासारवण करणारी, गोठयातले शेण काढून गाई वासरांना चारा टाकून त्यांना मायेने कुरवळणारी लक्ष्मी, आज सूर्य माथ्यावर आला तरी झोपेतून उठली नव्हती.दावणीची वासरे प्रेम पान्ह्या साठी हंबरत होती, पिल्लांच्या हाकेला साद घालणाऱ्या त्या माऊल्यांच्या आवाजाने परिसर दुमदुमला होता.माय लेकरात जणू हंबरण्याची जुगलबंदी चालली असावी, असा भास त्यावेळी होत होता.मात्र लक्ष्मी अजूनही गाढ झोपेतच होती, हा सर्व प्रकार पाहून लक्ष्मीची सासू पार्वती चिडून लक्ष्मीला हाका मारू लागते. लक्षमे, ओ लक्ष्मे....... आज तुले उठा लागतं नाई का वं..! कामं पळ्ळे सारे, ते काय तुवा बाप करीनं काय...? सासूच्या एका शब्दावर नाचणारी लक्ष्मी, आज मात्र सासूचे एवढे रागाचे बोल ऐकूनही उठतं नव्हती. तेंव्हा मात्र पार्वतीचा पारा चढला,आणि ती रागाने लालबुंद होऊन लक्ष्मी जवळ गेली. ओ लक्षमे उठ...! अथी आमच्या जीवाले घोर लावून टरं पसरल...
Gerenal

मोतीबिंदू म्हणजे काय?

डोळा हा शरीरातल्या नाजूक अवयवांपैकी एक आहे. तो एखाद्या कॅमेर्‍याप्रमाणे काम करत असतो. डोळ्यावर पडणार्‍या प्रकाशाचं केंदी्रकरण होऊन ते पाठीमागील पडद्यावर पाडणं आवश्यक असतं. तसं झालं तरच आपण पाहतो त्या वस्तूची स्पष्ट आणि स्वच्छ प्रतिमा पडद्यावर उमटते. या कारणासाठी आपल्या डोळ्यात एक भिंग असतं. ते पारदर्शक असतं. पारदर्शक असल्यामुळे त्यावर पडणारा प्रकाश आरपार जाऊ शकतो. हे भिंग पाण्यासारख्या द्रवपदार्थ आणि प्रथिनं यांनी मिळून बनलेलं असतं.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!त्यातील प्रथिनांच्या रेणूंची रचना पारदर्शिकत्व टिकून राहील अशा प्रकारची असते. उतारवयात मात्र यातल्या प्रथिनांच्या गुठळ्या होतात. तसं झालं की भिंग गढूळतं. ते पूर्वीसारखं पारदर्शक राहत नाही. या गुठळ्या आकारानं लहान असतील किंवा संख्येनं जास्त नसतील तर पूर्वीसारखाच भिंगातून प्रकाश आरपार जाऊ शकतो. मात्र त्या गुठळ्यांमधून व...
Gerenal

सासुगीरी

"माझी सासू किती बोलली, आजही किती बोलणार" मुलाच्या तोंडचे वाक्य. मुलगा बापाला बोलत होता.आनंद त्याचं नाव होतं. आनंदाचा विवाह जुळला होता. त्यात आज त्याचा विवाहही पार पडला होता. सर्वत्र आनंदीआनंद होता. त्यातच या आनंदमय वातावरणात थोडी धावपळ झाल्यानं वडीलाची प्रकृती बरी नव्हती. त्यातच वडील दुस-याच्या घरी झोपून होता. त्याच्या वडीलांना वाटत होतं की थोडासा आराम होईल व आपल्याला बरे वाटेल.आनंदचा विवाह झाला खरा. पण विवाहाला आनंदरावाचे वडील काही गेले नाही. कारण दोनतीन दिवसापासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यातच ते घरी राहिले. मुलगा आनंद काही पाहूण्यासोबत परणू गेला. पण त्यातच घोडं आडवं गेल्यागत आनंदाची सासू ओरडून त्याचेवर दबाव टाकत म्हणाली, "बाप कुठाय. इथं बापाचं काम असतांना आपण बापाला आणलं नाही." सासू थोडीशी खास्टच होती. त्यातच सासू बाप न आल्यानं ओरडली खरी. पण त्याचे उत्तर आनंदानं काही बरोबर दिले नाह...
Gerenal

रक्तदानाबाबत नको संभ्रमावस्था

रक्तदान म्हणजे जीवनदान हे आपण जाणतो. पण याबाबत अनेकांच्या मनात अद्यापही संभ्रम आढळून येतो. तो दूर करायचा तर काही बाबींची स्पष्टता हवी. उदाहरणार्थ रक्तदान करणार्‍या व्यक्तीचं वय १८ ते ६0 वर्षांदरम्यान असावं. व्यक्तीचं वजन ४५ किलोग्रॅमपेक्षा जास्त असावं. रक्तातील हिमोग्लोबनचं प्रमाण १00 मिलीला १२ ग्रॅमहून जास्त असावं. रक्तदात्याला आधीच्या सहा महिन्यांत रक्ताद्वारे पसरतील असे ब व क प्रकारची कावीळ, गुप्तरोग, हवताप, एड्स असे रोग झालेले नसावेत.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजया सगळ्या अटी पूर्ण करणारी कोणतीही व्यक्त रक्तदान करू शकते. रक्तपेढीत गेल्यावर प्रथमत तुमची सर्व माहिती लिहून घेतात. रक्तदान करण्यास तयार असल्याचं एक संमतीपत्र भरून घेतात. मग तुम्हाला रक्तदान कक्षात नेऊन पलंगावर झोपवतात. दंडाभोवती रक्तदाबमापक यंत्राचा पट्टा गुंडाळून त्यातील दाब ६0 ते ७0 मिमीपर्यंत वाढवतात. दंड व हात यातील सां...
Gerenal

कॅल्शियमच्या पर्याप्त पुरवठय़ासाठी..

आजकालच्या अनियमित दिनचर्येत आणि अनियमित आहारपद्धतीत कॅल्शियमची कमतरता ही अनेकांची समस्या बनलेली आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कमी वयातच अनेक शारीरिक समस्या भेडसावू लागतात. वयाच्या तिशीपर्यंत शरीर आहाराद्वारे आपली कॅल्शियम गरज सहज पूर्ण करुन घेतं मात्र त्यानंतर शरीराची क्षमता कमी होते आणि कॅल्शियमच्या अल्प पुरवठय़ाचे परिणाम दिसू लागतात. विशेषत गर्भवती महिलांना आणि स्तनपान देणार्‍या मातांना कॅल्शियमचा पर्याप्त पुरवठा व्हायलाच हवा. त्यादृष्टीने आहारात काही बदल करणं इष्ट ठरेल. एक कप पाण्यात आल्याचा कस घालावा. पाणी निम्म होईपर्यंत उकळावं. हा काढा दिवसातून एकदा घ्यावा. यामुळे कॅल्शियमची कमतरता भरुन निघते.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजरात्री दोन ग्लास पाण्यात दोन चमचे जरे भिजवून ठेवावं. सकाळी हे पाणी उकळून दाट काढा करावा. गाळून दिवसातून एकदा हा काढा घेतल्यासही कॅल्शियमची गरज भागते.कॅल्शियमची कमत...
Gerenal

माणूस घडविणारा ध्येयवेडा शिक्षक…बेंद्रे गुरूजी

मागील महिन्यात बस स्टॅड वर वर्तमान पत्र आणायला गेलो असताना, कडूलिंबाच्या पारावर काही सेवानिवृत्त शिक्षक मंडळी बसलेली दिसली. त्यांना नमस्कार करून घराकडे जात असताना मला अचानक बेंद्रे सरांची आठवण आली. आणि मी घरी न जाता सरांच्या घरी गेलो. सर जेवण करीत होते मला सुद्धा त्यांनी जेवणाचा खूप आग्रह केला पण मी नुकतेच जेवण करूनच निघालो होतो, त्यामुळे मी नकार दिला तसं त्यांना मागील पंधरा दिवसापासून बरे नव्हते. पांढरीशुभ्र दाढी वाढली होती. त्यांनी आता अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं होतं. तरीही जवळपास एक तास त्यांनी माझ्याशी दिलखुलास चर्चा केली. त्यातून जी माहिती मिळाली आणि प्रसंग मला आठवले तेच मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहो.धनंजय उर्फ वसंत शेषरावआप्पाजी बेंद्रे असं त्यांचं पूर्ण नाव. घरची परिस्थिती सामान्यच घरी दहा एकर शेती होती, वडील कारंजा नगर परिषदेमध्ये परिचर पदावर होते. कारंजाला त्यांचे मॅट्रि...
Gerenal

वेळीच रोखा माश्यांचा प्रादुर्भाव

माश्यांद्वारे काही विकारांच्या विषाणूंचा प्रसार होतो, याविषयी आपण ऐकलं आहे वा वाचलं आहे. खरंतर माशी अनेक घातक रोग पसरवण्यास कारणीभूत ठरते. अस्वच्छ जागी घोंघावत असणार्‍या माशा खाद्यपदार्थांवर बसून रोगजंतू पसरवतात. या किटकांमुळे टायफॉइड, हगवण, आमांश, कॉलरा, जंत, पोलिओ, डोळे येणं, खुपर्‍या इत्यादी रोग संक्रमित होतात. प्राण्यांची वा मानवी विष्ठा, कचरा, सडलेली फळे आणिे भाज्या विपुल प्रमाणात असतात तेथे माशांची पैदास होते. त्यांना चावता येत नाही पण त्या कायम चरत राहतात.हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरजत्या सारख्या उलटी आणि संडास करतात. एका जागी न बसता इकडून तिकडे भ्रमंती करतात. रुग्णाची विष्ठा, डोळ्यातील स्त्राव, जखमेतील पू इत्यादींत अनेक जीवजंतू असतात. माशा त्यावर बसतात. नंतर त्याच माशा घरात येऊन अन्नपदार्थावर बसतात. सहाजिकच त्यांच्या पायांना, पंखांना चिकटलेले जीवजंतू अन्न पदार्थांमध्ये मिसळतात. अ...
Gerenal

राखा मूत्रपिंडांचे आरोग्य

मूत्रपिंडांचं आरोग्य उत्तम राखणं खूप आवश्यक आहे. मूत्रपंडांच्या कार्यावर शरीराचं सर्वांगिण आरोग्य अवलंबून असतं. मूत्रपिंडाशी संबंधित अनेक व्याधी आणि आजार आहेत. मूतखडा ही अत्यंत वेदनादायी अशी व्याधी आहे. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी नुकतंच याबाबत एक संशोधन केलं. मूतखड्याच्या रुग्णांमध्ये हाड मोडण्याचा धोका अधिक असतो, असं या संशोधनातून समोर आलं आहे. स्टेनफोर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी हे संशोधन केलं असून यामुळे मूतखडा झाल्यानंतर हाडांची अधिक काळजी घ्यायला हवी, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. २00७ ते २0१५ या कालवधीतल्या ५,३१,४३१ मूतखड्याच्या रुग्णांवर संशोधन करण्यात आलं.यापैकी २३.६ टक्के रुग्णांमध्ये ऑस्टओपोरोसस तसंच फ्रॅक्चरसारख्या समस्या दिसून आल्या. म्हणूनच मूतखड्याच्या उपचारांदरम्यान तसंच त्यानंतरही हाडांच्या घनतेची चाचणी करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या चाचणीमुळे हाडं कमकुवत झाली आहेत...