म्हातारपणाला दूर सारण्यासाठी..
धकाधकीच्या आयुष्यात लोक वेळेआधीच थकलेले फिल करू लागले आहेत. अशी तर याचे अनेक कारणे असू शकतात पण खरं कारण आहे ते म्हणजे तुमची जीवनशैली व सवयी. विज्ञानाच्या अनुसार रोजच्या जीवनातील काही सवयी आहेत ज्यामुळे तुमचे वय वेळेआधीच वाढते आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अशा बर्याच सवयी असतात ज्या आपल्या त्वचेवर सर्वात प्रथम परिणाम करतात. आपण अनुवांशिकदृष्ट्या आपल्यात असलेल्या गोष्टी बदलू शकत नाही पण तरूण आणि एनर्जेटिक दिसण्यात मदत करणार्या घटकांना नियंत्रित नक्कीच करू शकता.आठ वर्षांपूर्वी केलेल्या एका अभ्यासात हे सिद्ध झाले आहे की सिगारेट ओढल्यामुळे आपले वय जास्त दिसून येते. र्जनल ऑफ प्लॅस्टिक अँड रिकंस्ट्रक्टिव सर्जरीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात, हे सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी ७२ जुळ्या मुलांना समाविष्ट केले. धूम्रपान करणार्या मुलांच्या चेहर्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागली. धूम्रपान करणा...